शनिवार, १ ऑगस्ट, २०१५

अभंग ०७

गाथा अभंग ०७

नये जरी तुज मधुर उत्तर । दिधला सुस्वर नाहीं देवें ॥१॥

नाहीं तयाविण भुकेला विठ्ठल । येइल तैसा बोल रामकृष्ण ॥ध्रु.॥

देवापाशीं मागें आवडीची भक्ति । विश्वासेंशीं प्रीति  भावबळें ॥२॥

तुका म्हणे मना सांगतों विचार । धरावा निर्धार दिसेंदिस ॥३॥

अर्थ -: देवाने गोड स्वर दिला नसला, गोड गळ्याने तुझे स्वर गाता येत नसले (मी तुझे गीत गाइन) ।।1।।

विठ्ठल त्या वाचून भेकेला नाही. जसा जमेल तसा "राम कृष्ण" हा मंत्र जप ।।ध्रु।।

श्रद्धेने, निष्ठेच्या बळाने व प्रेमाने देवाची भक्तिपूर्ण आळवनि कर ।।2।।

तुकाराम महाराज म्हणतात, की त्या ठिकाणी हरीकृपेची छाया वळते।।3।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा