शुक्रवार, ७ ऑगस्ट, २०१५

७८भक्ताविण देवा । कैंचें रूप घडे सेवा

अभंग ७८

भक्ताविण देवा । कैंचें रूप घडे सेवा॥१॥

शोभविलें येर येरां । सोनें एके ठायीं हिरा ॥ध्रु.॥

देवाविण भक्ता । कोण देता निष्कामता ॥२॥

तुका म्हणे बाळ । माता जैसें स्नेहजाळ ॥३॥

अर्थ :- भक्तावाचुन देवाची सगुन भक्ति कोण करेल? भक्तामुळे भगवंताला महत्व प्राप्त होते ।।1।।

हीरा सोन्याच्या कोंदनातच शोभून दिसतो तसा भक्त व भगवंताचा परस्पर  संबंध आहे ।।ध्रु।।

देवाशिवाय भक्ताला निष्कामभक्ति शिकविनारा कोणी नाही ।।2।।

यासाठी तुकोबा माय-लेकराच उदाहरण देतात ।।3।। 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा