शुक्रवार, ७ ऑगस्ट, २०१५

८१हो का पुत्र पत्नी बंधु । त्यांचा तोडावा संबंधु

अभंग ८१

हो का पुत्र पत्नी बंधु । त्यांचा तोडावा संबंधु ॥१॥

कळों आलें खट्याळसें । शिवों नये लिंपों दोषें ॥ध्रु.॥

फोडावें मडकें । मेलें लेखीं घायें एकें ॥२॥

तुका म्हणे त्यागें । विण चुकीजेना भोगें ॥३॥

अर्थ :- परमार्थामध्ये पत्नी, पुत्र, बंधू यांचा संबंध जर अडथळा निर्माण करीत असेल तर तोडून टाकावा ।।1।।

या नातेवायिकांना आपल्यापासून दूर केले असता त्याचा दोष आपल्याला  लागत नाही ।।ध्रु।।

एखाद्या नातलगाचा मृत्यु झाला म्हणजे मडके फोड़न्याचा संकेत आहे, त्याप्रमाणे सार्या नातेवाइकांचा संमंध तोडूंन टाकावा ।।2।।

तुकोबा म्हणतात, सर्वस्वाचा त्याग केल्याशिवाय प्रपंचिक भोग संपत नाही ।।3।।

1 टिप्पणी: