शुक्रवार, ३० ऑक्टोबर, २०१५

२९३शिकल्या बोलाचे सांगतील वाद

गाथा अभंग २९३

शिकल्या बोलाचे सांगतील वाद । अनुभव भेद नाहीं कोणा ॥१॥

पंडित हे ज्ञानी करितील कथा । न मळिती अर्था निजसुखा ॥२॥

तुका म्हणे जैसी लांचासाठीं ग्वाही । देतील हे नाहीं ठावी वस्तु ॥३॥
  

अर्थ :- शास्त्रार्थ पठन केलेले पंडित शब्दार्थ संगतील, पण अनुभवाचे बोल अनुभविचा जानतील ।।1।।

पंडित, ज्ञानी हे ब्रह्मज्ञान अंतर्बाह्य परमेस्वराशि एकरूप झाला आहे ।।2।।

तुकोबा म्हणतात, पैशाने विकत घेतलेल्या साक्षीदारांना खरी परिस्तिति माहित असेलच असे नहीं ।।3।।

२९२मायबापें जरी सर्पीण बोका

गाथा अभंग २९२

मायबापें जरी सर्पीण बोका । त्यांचे संगें सुखा न पवे बाळ ॥१॥

चंदनाचा शूळ सोनियाची बेडी । सुख नेदी फोडी प्राण नाशी ॥२॥

तुका म्हणे नरकीं घाली अभिमान । जरी होय ज्ञान गर्व ताठा ॥३॥

अर्थ :- मायबाप सर्पिंन आणि बोक्याप्रमाने असतील तर मुलाला त्यांच्या सहवासात सुख वाटत नाही ।।1।।

चंदन लाकडाचा चंदनाचा सुळ असला तरी जीव घेणार आणि सोन्याची बेड़ी असली तरी पायांना ती दुःखदायक भासनार ।।2।।

तुकोबा म्हणतात, एखादा मनुष्य ज्ञानी असेल आणि त्याच्या ठिकाणी गर्व, ताठा, अहंकार असेल तर तो नरकातच जाणार ।।3।।

२९१मन करा रे प्रसन्न

गाथा अभंग २९१

मन करा रे प्रसन्न । सर्व सिद्धीचें कारण । मोक्ष अथवा बंधन । सुख समाधान इच्छा ते ॥१॥

मनें प्रतिमा स्थापिली । मनें मना पूजा केली । मनें इच्छा पुरविली । मन माउली सकळांची ॥ध्रु.॥

मन गुरू आणि शिष्य । करी आपुलें चि दास्य । प्रसन्न आपआपणास । गति अथवा अधोगति ॥२॥

साधक वाचक पंडित । श्रोते वक्ते ऐका मात । नाहीं नाहीं आनुदैवत । तुका म्हणे दुसरें ॥३॥

अर्थ :- मानवी जीवनातील ईच्या-आकांक्षा, सुख-समाधान, मोक्ष, सर्व सिद्धि मिळविन्याचे प्रमुख साधन म्हणजे प्रसन्न, समाधानी मन होय ।।1।।

मनानेच देवाची स्तपना करून त्याची मानस पूज्या कली असता सर्व ईच्या पूर्ण होतात; कारण मन हे मातेप्रमाने आहे ।।ध्रु।।

मानाचा गुरु आणि शिष्य , दास-दासी आहे, प्रसन्न मन परमार्थात रामल्याने मोक्ष लभतो; पण उद्विग्न असेल तर अधोगति ठरलेली आहे ।।2।।

हे साधका, वाचका, पंडित, विद्वान, लोकाहो, समाधानी मांसासारखे दूसरे दैवत नाही, असे तुकोबा म्हणतात ।।3।।

२९०चंदनाचे हात पाय ही चंदन

गाथा अभंग २९०

चंदनाचे हात पाय ही चंदन । परिसा नाहीं हीन कोणी अंग ॥१॥

दीपा नाहीं पाठीं पोटीं अंधकार । सर्वांगें साकर अवघी गोड ॥ध्रु.॥

तुका म्हणे तैसा सज्जनापासून । पाहातां अवगुण मिळे चि ना ॥२॥

अर्थ :- चंदनवृक्षाची पान, फांद्या, मूळ, खोड सर्व चंदनाचे असते, ताशी परिसाची कोनतीच् बाजू हिन् नसते ।।1।।

दिव्याचा सर्व बाजूला प्रकाश पसरलेला असतो, ताशी साखर सर्व बाजूंनी गोड लगते ।।ध्रु।।

तुकोबा म्हणतात, सज्जनहि तसेच असतात, त्यांच्या मध्ये अवगुण शोधून सापड़नार नाही ।।3।।

२८९न लगे चंदना सांगावा परिमळ

गाथा अभंग २८९

न लगे चंदना सांगावा परिमळ । वनस्पतिमेळ हाकारुनी ॥१॥

अंतरीचें धांवे स्वभावें बाहेरी । धरितां ही परी आवरे ना ॥ध्रु.॥

सूर्य नाहीं जागें करीत या जना । प्रकाश किरणा कर म्हुन ॥२॥

तुका म्हणे मेघ नाचवी मयूरें । लपवितां खरें येत नाहीं ॥३॥

अर्थ :- अरन्यातील चंदनवृक्षाला आपल्यातील चंदनाचा पुरावा इतर वृक्षाणां द्यावा लागत नाही ।।1।।

अतःकरणातील सत्य आपोआप बाहर पड़ते, हा त्याचा स्वभाव आहे ।।ध्रु।।

सूर्य जगाला 'जागा हो' असे म्हणत नाही किव्हा सूर्य किरणे तसे सांगत नाही, उगावने हां त्यांचा मूळ स्वभाव आहे ।।2।।

तुकोबा म्हणतात, आकाशात मेघांची दाटि झाली की मोर त्याचा आनंद लपवून ठेउ शकत नाही, नाचू लागतात. त्याप्रमाणे सत्य लपत नाही ।।3।।

२८८मांडे पुर्‍या मुखें सांगों जाणे मात

गाथा अभंग २८८

मांडे पुर्‍या मुखें सांगों जाणे मात । तोंडीं लाळ हात चोळी रिते ॥१॥

ऐसियाच्या गोष्टी फिक्या मिठेंविण । रुचि नेदी अन्न चवी नाहीं ॥ध्रु.॥

बोलों जाणे अंगीं नाहीं शूरपण । काय तें वचन जाळावें तें ॥२॥

तुका म्हणे बहुतोंडे जे वाचाळ । तेंग तें च मूळ लटिक्याचें ॥३॥

अर्थ :- काही लोक मांडे, पुर्या यांच्या चविचे नुसते वर्णन करुण हात नाचावतात ।।1।।

अश्या लोकांचे वक्तव्य मीठ नसलेल्या भोजनाप्रमाणे बचव असते ।।ध्रु।।

अंगी किंचितहि शौर्य नसताना नुसत्या बढ़ाया मारून काय उपयोग ? ।।2।।

तुकोबा म्हणतात, नुसती बड़बड़ करणारी मानसे ढोंगी असतात, खोटरडी असतात ।।3।।

२८७कुंभ अवघा एक आवा

गाथा अभंग २८७

कुंभ अवघा एक आवा । पाकीं एकीं गुफे डावा ॥१॥

ऐसे भिन्न भिन्न साटे । केले प्रारब्धानें वांटे ॥ध्रु.॥

हिरे दगड एक खाणी । कैचें विजातीसी पाणी ॥२॥

तुका म्हणे शिरीं । एक एकाची पायरी ॥३॥

अर्थ :- एकाच आव्यात मातीची मडके तयार होतात; पण त्यातील काही स्वयंपाकासाठी वापरतात, तर काही घान भरण्यासाठी वापरतात ।।1।।

त्याप्रमाणे प्रारब्धाने प्रत्येकाची वेगवेगळी काम ठरवून दिली आहेत ।।ध्रु।।

हीरा आणि दगड एकाच खानित सापड़त असले तरी दोन्हींचि योग्यता मात्र एक नसते ।।2।।

तुकोबा म्हणतात, हीरा राजमुकुटात विराजमान होतो, तर दगड पायरीला बसतो ।।3।।

२८६हनुमंत महाबळी

गाथा अभंग २८६

हनुमंत महाबळी । रावणाची दाढी जाळी ॥१॥

तया माझा नमस्कार । वारंवार निरंतर ॥ध्रु.॥

करोनी उड्डाण । केलें लंकेचें दहन ॥२॥

जाळीयेली लंका । धन्य धन्य म्हणे तुका ॥३॥

अर्थ :- महाबलवंत, महापराक्रमी अशा हनुमंतानि रावनाची दाढी जाळली होती ।।1।।

त्याला मी वारंवार, निरंतर नमस्कार करतो ।।ध्रु।।

महान अश्या समुद्रावर उड्डाण करुण लंकेचे निरिक्षण केले ।2।।

तुकाराम महाराज म्हणतात, महापराक्रमी रावनाची लंका ज्याने जाळली, त्या मारुतिरायाचा पराक्रम धन्य होय ।।3।।

२८५काम घातला बांदोडी

गाथा अभंग २८५

काम घातला बांदोडी । काळ केला देशधडी ॥१॥

तया माझें दंडवत । कपिकुळीं हनूमंत ॥ध्रु.॥

शरीर वज्रा ऐसें । कवळी ब्रम्हांड जो पुच्छे ॥२॥

रामाच्या सेवका । शरण आलों म्हणे तुका ॥३॥

अर्थ :- देवा, ज्या मारुतिरायाने कामाला जिंकून बंदीवासात ठेवले, कळाला बेडया ठोकल्या ।।1।।

त्या कपिकुळातील हनुमंताला माझा दंडवत असो! ।।ध्रु।।

ज्याचे शारीर वज्रा सारखे आहे, आपल्या शेपटीने जो बेमहंदाला वेढा घालू शकतो  ।।2।।

अश्या रामरायाच्या सेवका, तुला मी शरण आलो आहे, असे तुकाराम महाराज म्हणतात ।।3।।

२८४केली सीताशुद्धी

गाथा अभंग २८४

केली सीताशुद्धी । मूळ रामायणा आधीं ॥१॥

ऐसा प्रतापी गहन । सुरां सकळ भक्तांचें भूषण ॥ध्रु.॥

जाऊनि पाताळा । केली देवाची अवकळा ॥२॥

राम लक्षुमण । नेले आणिले चोरून ॥३॥

जोडूनियां कर । उभा सन्मुख समोर ॥४॥

तुका म्हणे जपें । वायुसुता जाती पापें ॥५॥

अर्थ :- मूळ रामायानाच्या प्रारंभी मारुती रायाने सितेचा सोध केला, ही कीर्ति वर्नीलि आहे ।।1।।

ऐसा हा हनुमंत महान पराक्रमी असून भक्तांचे भूषण आहे ।।ध्रु।।

पातळात् जावून त्याने देवीची फजीती केली ।।2।।

अहिरावण-महिरावण या राक्षसानी रामलक्ष्मनांचा चोरून नेले होते; त्या दृष्टांचा वध करुन मारुतीरायाने राम-लक्ष्मण याना सोडवून आणले ।।3।।

तो हनुमंत रामा समोर हात जोडून उभा आहे ।।4।।

तुकाराम महाराज म्हणतात, या वायुसुताचा जप केला तर पाप नहीशी होतात ।।5।।

२८३शरण शरण जी हनुमंता

हनुमंतस्तुति - अभंग ४

२८३

शरण शरण जी हनुमंता । तुज आलों रामदूता ॥१॥

काय भक्तीच्या त्या वाटा । मज दावाव्या सुभटा ॥ध्रु.॥

शूर आणि धीर । स्वामिकाजीं तूं सादर ॥२॥

तुका म्हणे रुद्रा । अंजनीचिया कुमरा ॥३॥

अर्थ :- हनुमंता, तुम्ही प्रभु राम चंद्रांचे सेवक आहात. म्हणून मी तुम्हाला शरण आलो आहे ।।1।।

हे श्रेष्ट वीरा, भक्तीच्या वाटा कोणत्या आहेत, त्या आम्हाला दाखवा ।।ध्रु।।

तुम्ही शुर वीर धैर्यवान आहात. पुरुषार्थ करने तुम्हीच जानता व स्वामीची तत्परतेने सेवा करता ।।2।।

तुकाराम महाराज म्हणतात, हे रुद्र, तुम्ही अंजनिमातेचे सुपुत्र आहात ।।3।।

२८२आणिकांच्या घातें

गाथा अभंग २८२

आणिकांच्या घातें । ज्यांचीं निवतील चित्तें ॥१॥

ते चि ओळखावे पापी । निरयवासी शीघ्रकोपी ॥ध्रु.॥

कान पसरोनी । ऐके वदे दुष्ट वाणी ॥२॥

तुका म्हणे भांडा । धीर नाहीं ज्याच्या तोंडा॥३॥

अर्थ :- दुसर्याचा घात झालेला पाहुन ज्यांना आनंद होतो असे लोक पापी संजावे ।।1।।

शीघ्रकोपि मनुष्य अंती नरकाला जातात ।।ध्रु।।

ज्याला परनिंदा, वाइट बोलने ऐकायला, बोलायला आवडते, तोहि पापी आहे ।।2।।

तुकोबा म्हणतात, भंगखोर मनुष्यही असाच पापी असतो ।।3।।

२८१मागें नेणपणें घडलें तें क्षमा

गाथा अभंग २८१

मागें नेणपणें घडलें तें क्षमा । आतां देतों सीमा करूनियां ॥१॥

परनारीचें जया घडलें गमन । दावीतो वदन जननीरत ॥ध्रु.॥

उपदेशा वरी मन नाहीं हातीं । तो आम्हां पुढती पाहूं नये ॥२॥

तुका म्हणे साक्षी असों द्यावें मन । घातली ते आण पाळावया ॥३॥

अर्थ :-  मागे अजांतेपनाने तुमच्याकडून गुन्हा घडला असेल तर आता पश्चातापाने प्रायश्चित्त घेऊन भक्तिमार्ग धरल्यास आम्ही तुमच्या सर्व चुका माफ़ करतो ।।1।।

पुन्हा जर अशी परस्त्री अभिलाषा धरल्याचे पाप केले तर पातेशी संग केल्याचे पाप लागेल ।।ध्रु।।

चांगला उपदेश केल्यानंतरहि जो सुधारना करत नाही, त्याचे तोंडहि पाहण्याची आमची ईच्या नाही ।।2।।

तुकोबा म्हणतात, आम्ही केलेले उपदेश पालान्याची शपत तुम्ही स्वतःचे मन साक्षी ठेवून घ्या ।।3।।

२८०करणें तें देवा

गाथा अभंग २८०

करणें तें देवा । हे चि एक पावे सेवा ॥१॥

अवघें घडे येणे सांग । भक्त देवाचें तें अंग ॥ध्रु.॥

हें चि एक वर्म । काय बोलिला तो धर्म ॥२॥

तुका म्हणे खरें । खरें त्रिवाचा उत्तरें ॥३॥

अर्थ :-देवाला ज्या प्रकारची भक्ति, सेवा आवडते त्या प्रकारची भक्ति, सेवा मनुष्याने करावी ।।1।।

कारण भक्त हा त्या परमेस्वराचा अंग आहे ।।ध्रु।।

देवाला आपल्याप्रमाने भक्त पूजा केलेली आवडते , हेच धर्माचे रहष्य मी सांगत आहे ।।2।।

तुकोबा म्हणतात, हेच सत्य मी त्रिवार सांगत आहे ।।3।।

२७९संताचा अतिक्रम

गाथा अभंग २७९

संताचा अतिक्रम । देवपूजा तो अधर्म ॥१॥

येती दगड तैसे वरी । मंत्रपुष्पें देवा शिरीं ॥ध्रु.॥

अतीतासि गाळी । देवा नैवेद्यासी पोळी ॥२॥

तुका म्हणे देवा । ताडण भेदकांची सेवा ॥३॥

अर्थ :- संतांचा अनादर करुण जो देवाची पूजा करतो तो अधर्मचरण करतो ।।1।।

देवांवर मंत्रपठन करुण ताकलेली फुले दगडा प्रमाणे आहे ।।ध्रु।।

दारात आलेल्या भुकेल्या अतिथिला अन्न न देता देवाच्या नैवेद्याल पुरनपोली करतो ।।2।।

तुकोबा म्हणतात, अश्या प्रकारची देवाची सेवा करने म्हणजे देवाला दिलेली एकप्रकारचि शिक्षाच् आहे ।।3।।

२७८तान्हेल्याची धणी

गाथा अभंग २७८

तान्हेल्याची धणी । फिटे गंगा नव्हे उणी ॥१॥

माझे मनोरथ सिद्धी । पाववावे कृपानिधी ॥ध्रु.॥

तूं तों उदाराचा राणा । माझी अल्प चि वासना ॥२॥

कृपादृष्टीं पाहें । तुका म्हणे होईं साहे ॥३॥

अर्थ :- तहानलेल्याने गंगेचे पानी पिल्याने गंगाजल कमी होत नाही ।।1।।

हे कृपानीधी, माझे मनोरथ सिद्ध पावु देत ।।ध्रु।।

तू उदार राजा आहेस आणि माझे मागने अगदी थोड़े आहेत ।।2।।

तुकोबा म्हणतात, तू फक्त माझ्याकडे कृपादृष्टि पहा आणि माला मदत कर ।।3।।

२७७आणिकांची स्तुति आम्हां ब्रम्हहत्या

गाथा अभंग २७७

आणिकांची स्तुति आम्हां ब्रम्हहत्या । एका वांचूनि त्या पांडुरंगा ॥१॥

आम्हां विष्णुदासां एकविध भाव । न म्हणों या देव आणिकांसि ॥ध्रु.॥

शतखंड माझी होईल रसना । जरी या वचना पालटेन ॥२॥

तुका म्हणे मज आणिका संकल्पें । अवघीं च पापें घडतील ॥३॥

अर्थ :- आम्ही एका पांडुरंगाशिवाय इतरांची भक्ति केलि तर ब्रह्महत्येचे पातक लागेल ।।1।।

आम्ही विष्णुदास पांडुरंगाचे एकनिष्ठ भक्त आहोत, म्हणून अन्य देवतांना मानत नाही ।।ध्रु।।

या वचनामध्ये मी जर खोट बोललो असेल तर माझ्या जिभेचे शंभर तुकडे होतील ।।2।।

तुकोबा म्हणतात,  एका पांडुरंगाशिवाय इतर संकल्प माझ्या मनात प्रवेश करतील तर जगातील सर्व पापे मला लागतील ।।3।।

२७६अधमाची यारी

गाथा अभंग २७६

अधमाची यारी । रंग पतंगाचे परी ॥१॥

विटे न लगतां क्षण । मोल जाय वांयां विण ॥ध्रु.॥

सर्पाचिया परी । विषें भरला कल्हारीं ॥२॥

तुका म्हणे देवा । मज झणी ऐसे दावा ॥३॥

अर्थ :- हीन मनोरुत्तीच्या मनुष्याचे प्रेम पतंगाच्या अल्पावधी चमकणाऱ्या रंगाप्रमाणे असतो ।।1।।

थोड्याच् काळात ते रंग नश्ट होतात आणि त्याला दिलेले मोल वाया जाते ।।ध्रु।।

हिन् मनोरुत्तीच्या मनुष्याच्या अन्तःकरणात सरपाप्रमाने विष भरलेले असते ।।2।।

तुकोबा म्हणतात, मला असे प्रेम, भक्ति आवडत नाही ।।3।।

२७५जेणें मुखें स्तवी

गाथा अभंग २७५

जेणें मुखें स्तवी । तें चि निंदे पाठीं लावी ॥१॥

ऐसी अधमाची याती । लोपी सोनें खाय माती ॥ध्रु.॥

गुदद्वारा वाटे । मिष्टान्नांचा नरक लोटे ॥२॥

विंचु लाभाविण । तुका म्हणे वाहे शीण ॥३॥

अर्थ :- तोंडावर एखाद्याची स्तुती व पाठीमागे पाठीमागे निंदा करणारा हिन मनोरुत्तिचा आहे ।।1।।

तो स्वतःजावळील सोन्यासारखे अन्न लपवून माती खानारा आहे ।।ध्रु।।

जसे सुग्रास भोजन गुद्द्वारातुन नरक बनून बाहर पड़ते ।।2।।

तुकोबा म्हणतात, विंचवाला विशाचा काही उपयोग नसतानाही तो आपल्या नांगित विष सांभाळतो ।।3।।

२७४पूज्या एकासनीं आसनीं आसन

गाथा अभंग २७४

पूज्या एकासनीं आसनीं आसन । बैसतां गमन मातेशीं तें ॥१॥

सांगतों ते धर्म नीतीचे संकेत । सावधान हित व्हावें तरी ॥ध्रु.॥

संतां ठाया ठाव पूजनाची इच्छा । जीवनीं च वळसा सांपडला ॥२॥

तुका म्हणे एकाएकीं वरासनें । दुजें तेथें भिन्न अशोभ्य तें ॥३॥

अर्थ :- पुण्यवान संताना ज्या आसनावर बसवून आपण त्यांची पूजा करतो, त्या आसनावर स्वतः बसु नये; नाहीतर मातेशी संग केल्याचे पाप लागते ।।1।।

ऐसा आपल्या हितासाठी असलेला धर्माचा संकेत सावध होउन एकावा ।।ध्रु।।

संतांप्रमाणे आपलिहि पूजा केली जावी, अशी ईच्या सामान्य मनुष्याने करने म्हणजे जिवंसागाराच्या भोवर्यात अडकल्यासारखे आहे ।।2।।

तुकोबा म्हणतात, अश्या संतांच्या आसनावर बसनारा सामान्य मनुष्य त्या जागी शोभून दिसत नाही ।।3।।

२७३रडोनियां मान

गाथा अभंग २७३

रडोनियां मान । कोण मागतां भूषण ॥१॥

देवें दिलें तरी गोड । राहे रुचि आणि कोड ॥ध्रु.॥

लावितां लावणी । विके भीके केज्या दानी ॥२॥

तुका म्हणे धीरा । विण कैसा होतो हिरा ॥३॥

अर्थ :- रडून, भृकुन जर मान मागितला आणि समाजाने तो अनिच्छेने दिला, तर त्याला महत्त्व नाही ।।1।।

दीवाने जे दिले आहे तेच गोड मानून समाधिनि वृत्तिने पाहतो ।।ध्रु।।

शेतातील धान्याचे दान आणि भिक मागून आणलेल्या धन्याचे दान यामध्ये फरक आहे ।।2।।

तुकोबा म्हणतात, जीवनात धीर, संयम धरल्यास हिर्याप्रमाने मोल प्राप्त होते ।।3।।

२७२कपट कांहीं

गाथा अभंग २७२

कपट कांहीं एक । नेणें भुलवायाचें लोक ॥१॥

तुमचें करितों कीर्त्तन । गातों उत्तम ते गुण ॥ध्रु.॥

दाऊं नेणें जडीबुटी । चमत्कार उठाउठी ॥२॥

नाहीं शिष्यशाखा । सांगों अयाचित लोकां ॥३॥

नव्हें मठपति । नाहीं चाहुरांची वृत्ति ॥४॥

नाहीं देवार्चन । असे मांडिलें दुकान ॥५॥

नाहीं वेताळ प्रसन्न । कांहीं सांगों खाण खुण ॥६॥

नव्हें पुराणिक । करणें सांगणें आणीक ॥७॥

नेणें वाद घटा पटा । करितां पंडित करंटा ॥८॥

नाहीं जाळीत भणदीं । उदो म्हणोनि आनंदी ॥९॥

नाहीं हालवीत माळा । भोंवतें मेळवुनि गबाळा ॥१०॥

आगमीचें कुडें नेणें । स्तंभन मोहन उच्चाटणें ॥११॥

नव्हें यांच्या ऐसा । तुका निरयवासी पिसा ॥१२॥

अर्थ :- लोकांना भुलाविन्यासाठी मी कोणतेही कपतकृत्य करीत नाही ।।1।।

फक्त तुमचे उत्तम गुण गातो आणि नामस्मरण करतो ।।ध्रु।।

लोकांना भूल पादन्यासाठी मी जड़ीबूटीचा चमत्कार दाखवित नाही ।।2।।

माझी याचना न करणारी वृत्ती पसरवीणारी माजी शिष्यमंडळी नाहीत ।।3।।

मी मठपति नाही, मला जमिनींची देणगी मिळालेली नाही ।।4।।

दूकान मांडावे तसे देवाची पूज्याआर्च्या करण्याचे असे उघड़ प्रदर्शनहि मी मंडलेले नाही ।।5।।

भुत-वेताळाला वष करुण लोकांचे भविष्य जाणनारा मी नाही ।।6।।

लोकांना सांगणारा एक आणि कारनारा एक, असा मी दांभिक आणि पुराणिकही नाही ।।7।।

मी अंबाबाईचा भूत्याही नाही ।।8।।

उदो, उदो म्हणत नाचनारा भावाविन कोरडया भक्तिचा वेदांत सांगणारा करंटा पंडितही नाही  ।।9।।

हातातील जपमाळ् हलवुन, भोवती पाखंड़यांचा मेळा जमावनारा मी नाही ।।10।।

आपले महत्त्व वाढविण्यासाठी स्तंभन, मोहन, उच्चाटनासारखे खोते उपचारही मी करीत नाही ।।11।।

तुकोबा म्हणतात, एका विठ्ठलभक्तिवाचून मी कोणतेही उपचार जानत नाही ।।12।।

२७१याचा कोणी करी पक्ष

गाथा अभंग २७१

याचा कोणी करी पक्ष । तो ही त्याशी समतुल्य ॥१॥

फुकासाठीं पावे दुःखाचा विभाग । पूर्वजांसि लाग निरयदंडीं ॥ध्रु.॥

ऐके राजा न करी दंड । जरि या लंड दुष्टासि ॥२॥

तुका म्हणे त्याचें अन्न । मद्यपाना समान ॥३॥

अर्थ :- पापी मनुष्याची बाजू घेणारा पापिच आहे ।।1।।

असा मनुष्य पापी माणसांची सांगत करुण पितरांना नरकवास भोगायला लावतो ।।ध्रु।।

अश्या पापी मनुष्याला जर राज्याने देखील शिक्षा केली नाही तर तो राजाहि पापी ठरतो ।।2।।

तुकोबा म्हणतात, अशा पापी मनुष्याचे अन्न सेवन करू नये; कारण ते मद्यपानासमान आहे ।।3।।

२७०ब्रम्हहत्या मारिल्या गाई

गाथा अभंग २७०

ब्रम्हहत्या मारिल्या गाई । आणीक काई पाप केलें ॥१॥

ऐका जेणें विकिली कन्या । पवाडे त्या सुन्याचे ॥ध्रु.॥

नरमांस खादली भाडी । हाका मारी म्हणोनि ॥२॥

अवघें पाप केलें तेणें । जेणें सोनें अभिळाषिलें ॥३॥

उच्चारितां मज तें पाप । जिव्हे कांप सुटतसे ॥४॥

तुका म्हणे कोरान्न रांड । बेटा भांड मागे ना कां ॥५॥

अर्थ :-  ब्रह्महत्या, गोहत्या यांसारखि पापे केली ।।1।।

एकान कन्येचा सौदा केला ।।ध्रु।।

त्याचे पान नारमांस भक्षण केल्याप्रमाने आहे ।।2।।

सोन्याची अश्या धरली ।।3।।

आशा प्रकारच्या पापी लोकांचा उच्चार करतांना माझी जीभ कापते ।।4।।

तुकोबा म्हणतात, अशा प्रकारची पापे करण्यापेक्षा त्याने व त्याच्या बायकोने भिक मागून पोट भरावे ।।5।।

२६९दिवट्या वाद्यें लावुनि खाणें

गाथा अभंग २६९

दिवट्या वाद्यें लावुनि खाणें । करूनि मंडण दिली हातीं ॥१॥

नवरा नेई नवरी घरा । पूजन वरा पाद्याचें ॥ध्रु.॥

गौरविली विहीण व्याही । घडिलें कांहीं ठेवूं नका ॥२॥

करूं द्यावें न्हावें वरें । ठायीचें कां रे न कळे चि ॥३॥

वर्‍हाडियांचे लागे पाठीं । जैसी उटिका तेलीं ॥४॥

तुका म्हणे जोडिला थुंका । पुढें नरका सामग्री ॥५॥

अर्थ :- दिवट्यांचि आरास करुण, वाद्ये लावून, सुग्रास भोजन देवुन सुंदर मुलगी (वस्त्रालंकाराने नटलेली) वराला अर्पण करतात ।।1।।

आपल्या मुलीला घरी घेऊन जाणार म्हणून वराचे पाय धुतात ।।ध्रु।।

व्याही, विहिनीचा मानसन्मान करतात, काही कमी पडू देत नाहीत ।।2।।

वराकडिल मंडळी काशीही वागली तरी वाइट वाटून घेवू नये ।।3।।

विहीन रागाऊन वर्हाडापाठीमागे धावते ।।4।।

तुकाराम माहाराज म्हणतात, लोकांचे आशे अचण म्हणजे नरकात जान्याची व्यवस्ता आहे ।।5।।

२६८साळंकृत कन्यादान

गाथा अभंग २६८

साळंकृत कन्यादान । करितां पृथ्वीसमान ॥१॥

परि तें न कळे या मूढा । येइल कळों भोग पुढां ॥ध्रु.॥

आचरतां कर्म । भरे पोट राहे धर्म ॥२॥

सत्या देव साहे । ऐसें करूनियां पाहें ॥३॥

अन्न मान धन । हें तों प्रारब्धा आधीन ॥४॥

तुका म्हणे सोस । दुःख आतां पुढें नास ॥५॥

अर्थ :- मिलीचे सलंकृत कन्यादान हे पृथ्वीदानाइतके महत्वाचे पूण्य आहे ।।1।।

या मुर्खाला कन्येसाठी हुँडा दिल्याने होणारे पाप आज कळत नसले तरी पुढे ते पाप भोगताना कळते ।।ध्रु।।

धर्माचारणामुळे पोटहि भरते आणि धर्महि घड़तो ।।2।।

सत्याने वाग्णाऱ्या मनुष्यास देवहि सहाय्य करतो ।।3।।

अन्न, धन, मानसन्मान प्रत्येकाला त्याच्या त्याच्या नाशिबाप्रमाने मिळतो  ।।4।।

तुकोबा म्हणतात, कोणतीही अभिलाषा दुःखदायक आहे, त्याचा शेवतहि दुःखकारकच आहे ।।5।।

२६७हातीं होन दावी बेना

गाथा अभंग २६७

हातीं होन दावी बेना । करिती लेंकीच्या धारणा ॥१॥

ऐसे धर्म जाले कळीं । पुण्य रंक पाप बळी ॥ध्रु.॥

सांडिले आचार । द्विज चाहाड जाले चोर ॥२॥

टिळे लपविती पातडीं । लेती विजारा कातडीं ॥३॥

बैसोनियां तक्तां । अन्नेंविण पिडिती लोकां ॥४॥

मुदबख लिहिणें । तेलतुपावरी जिणें ॥५॥

नीचाचे चाकर । चुकलिया खाती मार ॥६॥

राजा प्रजा पीडी । क्षेत्री दुश्चितासी तोडी ॥७॥

वैश्यशूद्रादिक । हे तों सहज नीच लोक ॥८॥

अवघे बाह्य रंग । आंत हिरवें वरी सोंग ॥९॥

तुका म्हणे देवा । काय निद्रा केली धांवा ॥१०॥

अर्थ :- कलियुगामध्ये विवाहास पात्र झालेल्या मुलीचा बाप मुलाकडिल लोक मुलीला पाहायला आले तर प्रथम धनासाठी सौदा करतात ।।1।।

त्यामुळे अधर्म वाढत आहे, पूण्य कमी आणि पाप वाढत आहे ।।ध्रु।।

ब्रह्मानांनी आपला आचारधर्म सोडून दिला असून ते चोरी, चहाडी करू लागले आहेत ।।2।।

कपाळी टिळा लावन्याचे, पंचांग पाहन्याचे सोडून वीजार, कातडि पटटे घालू लागले आहेत ।।3।।

सत्तास्तानि बसून सामान्य लोकांवर अन्याय करू लागले आहेत ।।4।।

स्वयंपाक घरात तेल, तूप, सबनाचा हिशेब करतात ।।5।।

हीन लोकांची चाकरी करुण राजे मार खात आहेत ।।6।।

राजे लोक प्रजेला पीड़ा देतात ।।7।।

वैश्य-शूद्रादि ह्लकया वृत्तिचे लोक अधर्माने वागतात ।।8।।

बाह्यात्कारि सज्जनाचे सोंग करून अंतःकरणात विषारी विचार असतात ।।9।।

तुकोबा म्हणतात, कलियुगात ही परिस्तिति पाहुन हे विठ्ठला, निद्रा सोड आणि त्वरित धावत ये ।।10।।