सोमवार, २६ ऑक्टोबर, २०१५

२३६वरता वेंघोनि घातली उडी

मृदंग पाट्या

गाथा अभंग २३६

वरता वेंघोनि घातली उडी । कळंबाबुडीं यमुनेसी ॥१॥

हरि बुडाला बोंब घाला । घरचीं त्यांला ठावा नाहीं ॥ध्रु.॥

भवनदीचा न कळे पार । काळिया माजी थोर विखार ॥२॥

तुका म्हणे काय वाउग्या हाका । हातींचा गमावुनियां थिंका ॥३॥

अर्थ :- यमुना तीरी असलेल्या कदंब वृक्षावर श्रीकृष्ण चढला व तेथून त्याने यमुनेत उडी मारली  ।।1।।

'श्री हरी बडाला' अशी तेव्हा चहुकडे ओरड झाली. त्याच्या घरच्या लोकांनातर कोनालाच काळाले नाही ।।ध्रु।।

तिच्या पात्रात विषारी कालिया आहे ।।2।।

तुकाराम महाराज म्हणतात, हती असलेला हरी सड़ता आणि आता उगाच हाका मारता आणि का रडत बसता ? ।।3।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा