रविवार, २० सप्टेंबर, २०१५

१५०मेळउनि सकळ गोपाळ

विटीडांडू

गाथा अभंग१५०

मेळउनि सकळ गोपाळ । कांहीं करिती विचार ॥१॥

चला जाऊं चोरूं लोणी । आजि घेऊं चंद्रधणी ।

वेळ लावियेला अझुणी । एकाकरितां गडे हो ॥ध्रु.॥

वाट काढिली गोविंदीं । मागें गोपाळांची मांदी ॥२॥

अवघा चि वावरे । कळों नेदी कोणा फिरे ॥३॥

घर पाहोनि एकांताचें । नवविधा नवनीताचें ॥४॥

रिघे आपण भीतरी । पुरवी माथुलियाच्या हरी ॥५॥

बोलों नेदी म्हणे स्थिर । खुणा दावी खा रे क्षीर ॥६॥

अर्थ :- कृष्णने सर्व गोपाळ सवंगडिंना गोळा केले. सारे मिळून विचार करू लागले ।।1।।

गोपाळांनो, चला, गौळणीच्या घरी जाऊन मन तृप्त होईपर्यंत लोनी चोरून खाऊ. मित्रांनो, तुम्ही काय करीत आहात? विलंब का लावतात ? लवकर चला ।।ध्रु।।

कृष्णने वाट धकविलि. त्याचा माघे सारे गूपाल निघाले ।।2।।

जो देव आपले स्वरुप दिसून डेत नाही, तोच देव सर्वत्र सांच्यार करात आहे. स्वेच्छेने सर्व प्रकारचे खेळ खेळत आहे।।3।।

ज्या ठिकाणी नवविधि भक्तीचे नवनीत आहे, असे एकांटाचे घर पाहू ।।4।।

त्याने स्वतः माजघरात शिरुण भांड्याचा शोध घेतला. नवविधा भक्तीच्या लोण्याने भरलेली भांडी गोपाळांकडे दिली ।।5।।

खाताने तो कुणालाही बोलू देत नव्हता. 'गप्प रहा' असे सांगत होता, भक्तिरूपि लोनी खा आणि त्यावर ज्ञानरूपी दूध प्या अश्या कहना टी9 करात आहे ।।6।।

तुकाराम महाराज म्हणतात, भक्तिरूपि लोनी मीही खाल्ले आहे आणि मी भगवंताची सेवाहि करीत आहे ।।7।।

१४९कृष्ण गोकुळीं जन्मला

विटीदांडू अभंग

अभंग१४९

कृष्ण गोकुळीं जन्मला । दुष्टां चळकांप सुटला ॥१॥

होतां कृष्णाचा अवतार । आनंद करिती घरोघर ॥ध्रु.॥

प्रेम नाम वाचें गाती । सदा आनंदें नाचती ॥२॥

तुका म्हणे हरती दोष । आनंदानें करिती घोष ॥३॥

अर्थ :- कृष्ण गोकुळात जन्माला आहे, हे ऐकून दृष्ट कंसाला चळकाप सुटला ।।1।।

कृष्णनाचा अवतार झाला आणि सर्व लोक आनंदी झाले ।।ध्रु।।

ते सारखे मयखाने त्याचे नाव घेऊ लागले व आनंदाने नाचू लागले ।।2।।

तुलाराम महाराज म्हणतात, आनंदाने कृष्णचे नामघोष केल्याने सर्व दोष नाहीस होतात ।।3।।.

१४८अनंत ब्रम्हांडे उदरीं

१४८

अनंत ब्रम्हांडे उदरीं । हरि हा बाळक नंदा घरीं ॥१॥

नवल केव्हडें केव्हडें । न कळे कान्होबाचें कोडें ॥ध्रु.॥

पृथ्वी जेणें तृप्त केली । त्यासि यशोदा भोजन घाली ॥२॥

विश्वव्यापक कमळापती । त्यासि गौळणी कडिये घेती ॥३॥

तुका म्हणे नटधारी । भोग भोगून ब्रम्हचारी ॥४॥

अर्थ :- अनंत ब्रम्हांडनचा जाने उधार केला आहे, जो अनंत ब्रम्हांदांचा हरी आहे. असा हा श्रीकृष्ण नंदाघरि बालरूप घेऊन खेळतो आहे ।।1।।

या बालहारीचे मोठे नवल आहे, याचे कोढे काही केल्या सुटत नाही ।।ध्रु।।

जो सर्व पृथ्वीला तृप्त करो.   त्याला सगुन रुपात , गोकुलात यशोदा भोजन देते ।।2।।

हां कमलापति सर्व विश्वाला व्यापूण राहिला आहे; परंतु गौळणी याल सगुन रुपात आपल्या कडेवर घेतात ।।3।।

तुकाराम महाराज म्हणतात, हा मोठा नतधारि आहे. गोपिणसंगे सर्व सुख भोग भोगनही आपण ब्रम्हचारी राहिला आहे, हे केवधे आच्छर्य आहे ! ।।4।।

१४७जीवशिवाच्या मांडूनि हाला

सुतुतू - अभंग १

१४७

जीवशिवाच्या मांडूनि हाला । अहं सोहं दोन्ही भेडती भला ॥१॥

घाली हुतुतू फिरोनि पाही आपुणासि । पाही बळिया तो मागिला तुटी पुढिलासि ॥ध्रु.॥

खेळिया तो हाल सांभाळी । धुम घाली तो पडे पाताळीं ॥२॥

बळिया गांढ्या तो चि खेळे । दम पुरे तो वेळोवेळां खेळे ॥३॥

हातीं पडे तो चि ढांग । दम पुरे तो खेळिया चांग ॥४॥

मागें पुढें पाहे तो जिंके । हातीं पडे तो चि आधार फिके ॥५॥

आपल्या बळें खळे रे भाई । गडियाची सांडोनि सोई ॥६॥

तुका म्हणे मी खेळिया नव्हें । जिकडे पडें त्याचि सवें ॥७॥

अर्थ (संक्षेप्त) :- जीवाशिवाची हद्द ठरवून आत्मा व प्रमात्म्याचे डॉन गट पाडून हतुतु खेळ आरंभला तर काय होईल ? बलवान आहे, अखंड सावधान आहे आणि हरिचे ज्याला भान आहे, तोच या खेळात जिंकेल. कुठे जायचे आहे आणि कुठे परतायचे आहे, याचे भान ज्याला नाही, तो सहजच पकडला जातो; पण मी काही उत्तम खेळाडू नव्हे. या खेळात जिंकायचे असेल तर माला गुरु मार्गदर्शन घ्यावे लागेल, ऎसे तुकोबा म्हणतात ।।1 ते 8।।

१४६बळें डाईं न पडे हरी

हाल अभंग 2

गाथा अभंग १४६

बळें डाईं न पडे हरी । बुद्धि करी शाहणा तो ॥१॥

मोकळें देवा खेळों द्यावें । सम भावें सांपडावया ॥ध्रु.॥

येतो जातो वेळोवेळां । न कळे कळा सांपडती ॥२॥

तुका म्हणे धरा ठायींच्या ठायीं । मिठी जीवीं पायीं घालुनियां ॥३॥

अर्थ :- परमेश्वर ऐसा दुराग्रहात सापदनार नाही. आपल्या बुद्धिकौशल्याने जो वागेल, तो शहाना ।।1।।

देवाला मुक्तपने खेळूद्यावे तो सर्वव्यापी आहे; त्यामुळे भावाने तो सापड़तो ।।ध्रु।।

तो वारंवार येतो आणि जातो. त्याला शोधन्याची उक्ति उगांयुगे कोणाला सापडली नाही. तो आवतारकार्याने येतो आणि तेथिक कार्य संपले की नव्या आवतारात प्रविष्ट होतो ।।2।।

तुकाराम महाराज म्हणतात, तुमच्या जीवाची मीठी त्याच्या पायावर घाला आणि आहे तिथे त्याला धरा ।।3।।.

१४५यमुनेतटीं मांडिला खेळ । म्हणे गोपाळ गडियांसि

हाल - अभंग २
हाल - अभंग 1
गाथा अभंग१४५

यमुनेतटीं मांडिला खेळ । म्हणे गोपाळ गडियांसि ॥१॥

हाल महाहाल मांडा । वाउगी सांडा मोकळी ॥ध्रु.॥

नांवें ठेवूनि वांटा गडी । न वजे रडी मग कोणी ॥२॥

तुका म्हणे कान्हो तिळतांदळ्या । जिंके तो करी आपुला खेळ्या ॥३॥

अर्थ :- यमुनाकाठि वाळवंतात खेल मांडला. श्रीकृष्ण सवंगड्यांना म्हणाला, ।।1।।

बाबांनो कोटा खेळ खलायचा हे नीच्छित करा. त्याचे नियम ठरवा मागच्या खेळा. मोकातापने स्वैराचारि खेळण्यात काय माझ्या आहे ? ।।ध्रु।।

या गड्यांपाकि मुमुक्षु कोण. मुक्त कोण, विषयी कोण, पापी कोण हे त्यांच्या लक्षणांवरुन ठरवा, त्याना ताशी नावे आणि गाड़ी वाटून दया म्हणजे ते रडी जाणार नाहीत ।।2।।

तुकाराम महाराज म्हणतात, कामक्रोधादि रूपातील तिला-तांदळाला जो जिंकून घेतो, त्यालाच श्रीकृष्ण आपल्याबरोबर खेलनारा गड़ी मानतो ।।3।।

१४४गडी गेले रडी । कान्हो नेदीस तूं चढी

काला अभंग

गाथा अभंग १४४

गडी गेले रडी । कान्हो नेदीस तूं चढी ॥१॥

आम्ही न खेळों न खेळों । आला भाव तुझा कळों ॥ध्रु.॥

न साहावे भार । बहु लागतो उशीर ॥२॥

तुका आला रागें । येऊं नेदी मागें मागें ॥३॥

अर्थ :- सवंगड़यांनि रड़ी खाल्ली आणि आरडाओरड केलि की हे कान्होबा, तू आम्हाला कढ़ी चढण्याची संधि देत नाहीस ।।1।।

आम्ही आता तुझ्याशि खेलनार नाही. तू स्वार्थी आहेस. तुझा भाव आम्हाला समजला आहे ।।ध्रु।।

आता तुझा भार आम्हाला सहन होत नाही. आम्हाला उशीर होतो आहे ।।2।।

तुकाराम महाराज म्हणतात, मलाड3खिल राग आला म्हणून मी कान्होबाला माझ्या बरोबर येऊ दिल नाही ।।3।।

१४३आतां ऐसें करूं । दोघां धरूनियां

काला अभंग

गाथा अभंग१४३

आतां ऐसें करूं । दोघां धरूनियां मारूं ॥१॥

मग टाकिती हे खोडी । तोंडीं लागली ते गोडी ॥ध्रु.॥

कोंडूं घरामधीं । न बोलोनि जागों बुद्धी ॥२॥

बोलावितो देवा । तुका गडियांचा मेळावा ॥३॥

अर्थ :- आपण आता त्या नंदाच्या मुलाला आणि तुक्याका चांगला मार देऊ ।।1।।

मगच ते ही चोरिकरन्याची वाइट खोड टाकून देतील. त्याना दही-दुधाची चटक लागली आहे ।।ध्रु।।

ते छोटी कन्यासाठी घरात आले की आपण त्याना कोंडुन ठेउ ।।2।।

तुकाराम महाराज म्हणतात, की मी साऱ्या सवंगद्याना गोळा केले आहे आणि देवाला बोलावल आहे ।।3।।

१४२ पाहाती गौळणी

काला अभंग

गाथा अभंग १४२

पाहाती गौळणी । तंव पालथी दुधाणी ॥१॥

म्हणती नंदाचिया पोरें । आजि चोरी केली खरें ॥ध्रु.॥

त्याविण हे नासी । नव्हे दुसरिया ऐसी ॥२॥

सवें तुका मेळा । त्याणें अगुणा आणिला ॥३॥

अर्थ :- दुधाची सर्व भांडी पालथी घालून ठेवलेली गौळणीनी पाहिली ।।1।।

त्या म्हणाल्या, नंदाच्या। मुलाचे हे काम आहे. त्यानेच ही चोरी केलि ।।ध्रु।।

दुधाची अशी नासाड़ी दूसरे कुणी करणार नाही ।।।2।।

तुकाराम महाराज म्हणतात, हां मेला तुक्या त्यांच्याबरोबर होता, त्यानेच निर्गुण अश्या इश्वराला बरोबर आणले असले पाहिजे ।।3।।.

१४१धालें मग पोट । केला गड्यांनी बोभाट

काला अभंग

गाथा अभंग१४१

धालें मग पोट । केला गड्यांनी बोभाट ॥१॥

ये रे ये रे नारायणा । बोलों अबोलण्या खुणा ॥ध्रु.॥

खांद्यावरी भार । तीं शिणती बहु फार ॥२॥

तुकयाच्या दातारें । नेलीं सुखी केलीं पोरें ॥३॥

अर्थ :- हे भगवंता, आमचे पॉट भरले. आता पुरे झाले, ऐसा बोभाता गोपाळानी सुरु केला ।।1।।

नारायणा, आपल्याला ज्या विषयी बोलने अवडत आहे, अश्या वस्तुच्या खुनांनविषयी बोलुया, ये रे, त्या साथी ये ।।ध्रु।।

खांद्यावर ज्यानी भार घेतला ती फार तकली होती ।।2।।

माझ्या दात्याने त्यां सर्व पोराणां आपल्या सोबत  नेउन त्याना आपल्यासारखेच सुखी केले ।।3।।

१४०पळाले ते भ्याड

काला अभंग

गाथा अभंग १४०

पळाले ते भ्याड । त्यांसि येथें जाला नाड ॥१॥

धीट घेती धणीवरी । शिंकीं उतरितो हरी ॥ध्रु.॥

आपुलिया मतीं । पडलीं विचारीं तीं रितीं ॥२॥

तुका लागे घ्यारे पायां । कैं पावाल या ठाया ॥३॥

अर्थ - जे घाब्रट होते, ते पळून गेले. त्यांचा भित्रेपना त्यांच्या हिताच्या आड़ आला ।।1।।

हरिन शिंकाळी उतरिवाली. जे धाडसी होते, त्यांना भरपूर मिळाले ।।ध्रु।।

जे स्वतः च्या बुध्दीने विचारा करात बसले, ते उपाशी राहिले ।।2।।

तुकाराम महाराज म्हणतात, अरे' तुम्ही 'दूध घ्या ते पुन्हा इथे मिळणार नाही ।।3।।

१३९ शिंकें लावियेलें दुरी

काला अभंग

गाथा अभंग१३९

शिंकें लावियेलें दुरी । होतों तिघांचे मी वरी ॥१॥

तुम्ही व्हारे दोहींकडे । मुख पसरूनि गडे ॥ध्रु.॥

वाहाती त्या धारा । घ्यारे दोहींच्या कोंपरा ॥२॥

तुका म्हणे हातीं टोका । अधिक उणें नेदी एका ॥३॥

अर्थ :- गोरसाचे शिंकाळ फार उंच लावले आहे. त्यात हात घालन्यास मी तुम्ह तिघांच्या खांद्यावर चढतो ।।1।।

गड्यांनो, तुम्ही आपले दोन बाजूंना तोड़ उघडून नीट उभे रहा ।।ध्रु।।

दोन्ही कोपर्यातून शिंक्यातिल धारा वहतील, त्या धारा नीट तोंडात घाला ।।2।।

तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या हाताकडे लक्ष दया. सर्वांना मी सारखे देणार  आहे ।।3।।

१३८याल तर या रे लागें

काला अभंग १३८

याल तर या रे लागें । अवघे माझ्या मागें मागें ॥१॥

आजि देतों पोटभरी । पुरे म्हणाल तोंवरी ॥ध्रु.॥

हळू हळू चला । कोणी कोणाशीं न बोला ॥२॥

तुका म्हणे सांडा घाटे । तेणें नका भरूं पोटें ॥३॥

अर्थ :- तुम्ह सवंगड्यांना यायच असेल तर माझ्या मगोमाग या ।।1।।

तुम्ही 'पुरे' म्हणोपर्यंत मई तुम्हाला पोटभर जेवण देतो ।।ध्रु।।

मात्र मझ्याबरोबर हळूहळू चला, एकमेकांशी बोलू नका ।।2।।

तुकाराम महाराज म्हणतात, संसाररूपी कच्या कन्या टाकून दया. त्यांनी पोट भरू नका ।।3।।.

१३७उपजोनियां पुढती येऊं

काला अभंग १३७

उपजोनियां पुढती येऊं । काला खाऊं दहींभात ॥१॥

वैकुंठीं तों ऐसें नाहीं । कवळ कांहीं काल्याचें ॥ध्रु.॥

एकमेकां देऊं मुखीं । सुखीं घालूं हुंबरी ॥२॥

तुका म्हणे वाळवंट । बरवें नीट उत्तम ॥३॥

अर्थ :- दहिभाटाचा काला खान्यासाथी आम्ही पुन्हा जन्म घेऊ ।।1।।

हा मधुर काला वैकुंठाताहि मिळत नाही ।।ध्रु।।

आम्ही हे काल्याचे घास एकमेवांच्या मुखात घालुत्यापासून मिळणाऱ्या आनंदात हुंबरि घालू ।।2।।

तुकाराम महाराज म्हणतात, यासाठी वाळवंट हे स्तन उत्तम आहे ।।3।।

१३६शुद्ध दळणाचें सुख सांगों काई

दळण - अभंग १

गाथा अभंग १३६

शुद्ध दळणाचें सुख सांगों काई । मानवित सईबाई तुज ॥१॥

शुद्ध तें वळण लवकरी पावे । डोलवितां निवे अष्टांग तें ॥ध्रु.॥

शुद्ध हें जेवितां तन निवे मन । अल्प त्या इंधन बुडा लागे ॥२॥

शुद्ध त्याचा पाक सुचित चांगला । अविट तयाला नाश नाहीं ॥३॥

तुका म्हणे शुद्ध आवडे सकळां । भ्रतार वेगळा न करी जीवें ॥४॥

अर्थ :- हे सईबाई, शुद्ध आचरणपूर्वक  हरिनामरूपी दळणाचे सुख किती व कसे असते म्हणून सांग ? ते आम्हाला मानवले नाही ।।1।।

असे शुद्ध दळन लवकर होते, दलनात अंग डोलू लागते, त्यामुळे उष्टांग शांत होते ।।ध्रु।।

जेवन शीजवतांना इंधन कमी लागते. ते जेवण तन- मन शांत करते ।।2।।

जेवण (स्वयंपाक) शुद्ध व चांगला झालेला आहे. ते अविट आहे. त्याचा नाश नाही ।।3।।

तुकाराम महाराज म्हणतात, जे शुद्ध असते ते सर्वांना आवडते. शुद्ध पाक तैयार करणाऱ्या स्त्रीला तिचा नवरा प्रेमपूर्वक, जीवाभावाने आपलेसे करतो, कधीच दूर लोटत नाही ।।4।।.

१३५शुद्धीचें सारोनि भरियेली पाळी

आडसण दळण - अभंग १

गाथा अभंग १३५

शुद्धीचें सारोनि भरियेली पाळी । भरडोनि वोंगळी नाम केलें ॥१॥

आडसोनि शुद्ध करीं वो साजणी । सद्धि कां पापिणी नासियेलें ॥ध्रु.॥

सुपीं तों चि पाहें धड उगटिलें । नव्हतां नासिलें जगझोडी ॥२॥

सुपीं तों चि आहे तुज तें आधीन । दळिल्या जेवण जैसें तैसें ॥३॥

सुपीं तों चि संग घेइप धडफुडी । एकसा गधडी नास केला ॥४॥

दळितां आदळे तुज कां न कळे । काय गेले डोळे कान तुझे ॥५॥

सुपीं तों चि वोज न करितां सायास । पडसी सांदीस तुका म्हणे ॥६॥

अर्थ :- एका स्त्री ने परमार्थाचे शुद्ध दळन बाजूला ठेऊन मन_बुद्धिरूपी जात्याची पाळी विषयांना  भरून टाकली व ते विषय भरडुन परमार्थ नष्ट केला ।।1।।

हे पाहुन एक सुआहानि बाई तिला म्हणते, हे सखे, अंग, दळण निवाडायच, पाखडायचं असत. हे पापिनी, सिद्ध वस्तुंचा नाश तू का केलास ? ।।ध्रु।।

जो पर्यन्त तुझ्या हातात नरदेहाचे सुप आहे, तो पर्यन्त विचार कर. जसे दळन दळले जाईल, तसे खायला मिळेल . पंचक्रोशाचे फहोलपत वेगळे झाले नसता शुद्ध पर्मार्थाचा नाश का मकेलास ? ।।2।।

पुन्यात्मक कर्माचे दळन द्ळलेस तर सुखाचे जेवण मिळेल ।।3।।

परदेहाचे सुप जवळ असतांना संतसंगति कर. पर्मार्थाचा एकदम नाश का बारे केलास? ।।4।।

जोपर्यंत नारदेहाच सुप तुझ्या जवळ आहे, तोपर्यंत विचारपूर्वक अडसर (पाखड़ने) कर, नाहीतर नाश होईल ।।5।।

तुकाराम महाराज म्हणतात, जोपर्यंत (नारादेहरूपि) सुपात तुझा वास आहे, तोपर्यंत पर्मार्थाचे प्रयत्न कर; नाहीतर तू जन्ममृतुच्या सान्दी-कोपर्यात अडकून पदशील ।।6।।.

१३४सावडीं कांडण ओवी नारायण

कांडण अभंग 02

गाथा अभंग१३४

सावडीं कांडण ओवी नारायण । निवडे आपण भूस सार ॥१॥

मुसळ आधारीं आवरूनि धरीं । सांवरोनि थिरीं घाव घालीं ॥ध्रु.॥

वाजती कांकणें अनुहात गजरें । छंद माहियेरे गाऊं गीति ॥२॥

कांडिता कांडण नव्हे भाग शीण । तुजमजपण निवडे तों ॥३॥

तुका म्हणे रूप उमटे आरिसा । पाक त्या सरिसा शुद्ध जाला ॥४॥

अर्थ :- नारायणा, ओवी गात कांडन करा. त्यातले आत्मारूपी भुस आणि आत्मारूपी सार यांची स्वतः निवड करा ।।1।।

विवेकाचे मूसल घट्ट धरून, मन बुद्धि स्तिर ठेऊन वैराग्याचे सारखे घाव घाला ।।ध्रु।।

अनाहत नावाचे कंकण वाजत आहेत. त्या नादात गाने गात बाहर जाऊ ।।2।।

'तुझे माझे' हां भाव बाज7ला राहील तो पर्यंत कांडत असताना थाकायला होणार नाही ।।3।।

तुकाराम महाराज म्हणतात, जसे आरश्यात आपले रूप प्रकट होते, तशी या कांडनासोबत पाकसिद्धि झाली ।।4।।

१३३सिद्ध करूनियां ठेविलें कांडण

कांडण - अभंग २

कांडण - अभंग 1

गाथा अभंग१३३

सिद्ध करूनियां ठेविलें कांडण । मज सांगातीण शुद्ध बुद्धि गे ॥१॥

आठव हा धरीं मज जागें करीं । मागिले पाहारीं सेवटिचा गे ॥ध्रु.॥

सम तुकें घाव घालीं वो साजणी । मी तुजमळिणी जंव मिळे ॥२॥

एक कशी पाखडी दुसरी निवडी । निःशेष तिसडी ओज करी ॥३॥

सरलें कांडण पाकसद्धि करी । मेळवण क्षिरीसाकरेचें ॥४॥

उद्धव अक्रूर बंधु दोघेजण । बाप नारायण जेवणार ॥५॥

तुका म्हणे मज माहेरीं आवडी । म्हणोनि तांतडी मूळ केलें ॥६॥

अर्थ :- हे कांडन मी सिद्ध करून ठेवले आहे. कांडायला मदत करणारी निष्काम कर्म-भक्ती यांचे संस्कार असलेली सीध बुद्धि, तय बुद्धिला मि अगिदरच सांगून ठेवले आहे, की ।।1।।

तू मागील प्रहार स्मरणात ठेव आणि शेवटच्या प्रहरात जागे कर ।।ध्रु।।

हे साजणी, कांडत असताना समतव्हाचा एक घाव घायल म्हणजे तुला माझी प्राप्ति होईल ।।2।।

स्थूलदेह पाखडून त्याला आत्मयापासून दूर कर. नंतर लिगदेहाला निवड त्यानंतर कारण देहाला मात्र 'मी ब्रम्ह आहे' ऐशी वृत्ति देखील शिल्लक न ठेवता चांगले सडून काढ़ ।।3।।

सखे, कांडन संपल आहे. आता ब्रम्ह रसाचा स्वयंपाक कर. त्यात प्रेमरूपी दूध आणि भक्तीरूपी साखर घालून पक्कन्ने तयार कर ।।4।।

उद्धव आणि अक्रूर हे दोघे भाऊ जेवायला येणार आहेत. बाप नारायण त्यांच्या बरोबर आहेच ।।5।।

तुकाराम महाराज म्हणतात, मला माहेरचि फार आवड आहे, म्हणून त्याना तातडीने आमंत्रण पाठविले ।।6।।

१३२आम्हां घरीं एक गाय दुभता हे

गाई - अभंग १

गाथा अभंग१३२

आम्हां घरीं एक गाय दुभता हे । पान्हा न समाये त्रिभुवनीं ॥१॥

वान ते सांवळी नांव ते श्रीधरा । चरे वसुंधरा चौदा भुवनें ॥ध्रु.॥

वत्स नाहीं माय भलत्या सवें जाय । कुर्वाळी तो लाहे भावभरणा ॥२॥

चहूं धारीं क्षीर वोळली अमुप । धाले सनकादिक सिद्ध मुनी ॥३॥

तुका म्हणे माझी भूक तेथें काय । जोगाविते माय तिन्ही लोकां ॥४॥

अर्थ :- आमच्या घरी एक गाय, आहे व ती दूध देते. तिने पाणा सोडलाकि त्या दुधाने त्रिभुवन भरून जाते; त्रिभुवनातहि ते मावत नाही ।।1।।

अशी ती गाय सावळ्या रंगाची असून तिचे नाव श्रीधरा असे आहे. पृथ्वी सह चौदा भुवनांत ती चरत असते ।।ध्रु।।

तिला एकहि वासरु नाही. ती कोनाबरोबरही जाते. भावपूर्वतेने जो कुणी तिला कुरवाळेल. त्याला ती पोटभर दूध देते ।।2।।

चारही सडांतून धारा सोडून अमाप दूध देते. ते दूध पिउन ऋषि मुनि तृप्त झाले आहेत ।।3।।

तुकाराम महाराज म्हणतात, अशी ही गाय त्रैलोक्यल तृप् करू शकते . त्यापुढे माझी भूक ती कितिशी अशनार? ।।4।।

१३१सिद्ध करूनियां ठेविलें कांडण

कांडण - अभंग २

कांडण - अभंग 1

गाथा अभंग१३१

सिद्ध करूनियां ठेविलें कांडण । मज सांगातीण शुद्ध बुद्धि गे ॥१॥

आठव हा धरीं मज जागें करीं । मागिले पाहारीं सेवटिचा गे ॥ध्रु.॥

सम तुकें घाव घालीं वो साजणी । मी तुजमळिणी जंव मिळे ॥२॥

एक कशी पाखडी दुसरी निवडी । निःशेष तिसडी ओज करी ॥३॥

सरलें कांडण पाकसद्धि करी । मेळवण क्षिरीसाकरेचें ॥४॥

उद्धव अक्रूर बंधु दोघेजण । बाप नारायण जेवणार ॥५॥

तुका म्हणे मज माहेरीं आवडी । म्हणोनि तांतडी मूळ केलें ॥६॥

अर्थ :- हे कांडन मी सिद्ध करून ठेवले आहे. कांडायला मदत करणारी निष्काम कर्म-भक्ती यांचे संस्कार असलेली सीध बुद्धि, तय बुद्धिला मि अगिदरच सांगून ठेवले आहे, की ।।1।।

तू मागील प्रहार स्मरणात ठेव आणि शेवटच्या प्रहरात जागे कर ।।ध्रु।।

हे साजणी, कांडत असताना समतव्हाचा एक घाव घायल म्हणजे तुला माझी प्राप्ति होईल ।।2।।

स्थूलदेह पाखडून त्याला आत्मयापासून दूर कर. नंतर लिगदेहाला निवड त्यानंतर कारण देहाला मात्र 'मी ब्रम्ह आहे' ऐशी वृत्ति देखील शिल्लक न ठेवता चांगले सडून काढ़ ।।3।।

सखे, कांडन संपल आहे. आता ब्रम्ह रसाचा स्वयंपाक कर. त्यात प्रेमरूपी दूध भक्ती

१३०हमामा रे पोरा हमामा रे । हमामा घालितां ठकलें पोर । करी येरझार चौर्‍याशीची

हमामा अभंग 2
गाथा अभंग १३०

हमामा रे पोरा हमामा रे । हमामा घालितां ठकलें पोर । करी येरझार चौर्‍याशीची ॥१॥

पहिले पहारा रंगासि आलें । सोहं सोहं सें बार घेतलें । देखोनि गडी तें विसरलें । डाई पडिलें आपणची ॥ध्रु.॥

दुसर्‍या पहारा महा आनंदें । हमामा घाली छंदछंदें । दिस वाडे तों गोड वाटे । परि पुढें नेणे पोर काय होतें तें ॥२॥

तिसर्‍या पहारा घेतला बार । अहंपणे पाय न राहे स्थिर । सोस सोस करितां डाईं पडसी । सत्य जाणें हा निर्धार ॥३॥

चौथ्या पहारा हमामा । घालिसी कांपविसी हातपाय । सुर्‍यापा टिलाचा पोर यम । त्याचे पडलीस डाईं ॥४॥

हमामा घालितां भ्याला तुका । त्यानें सांडिली गड्याची सोई । यादवांचा मूल एक । विठोबा त्यासवें चारितो गाई ॥५॥

अर्थ :- पोरा, हमामा रे हमामा. हमामा खेळतांनी जर तू फसलास तर चौरयांशी लक्ष योन्यांची एरझार तू करीत राहशील ।।1।।

गर्भावस्थेचा पहिल्या प्रहरात रंगातयेउन  'सो..हं 'सो..हं चा छंद घेतलास, नंतर संसारातले गाड़ी दिसले तेव्हा सो..हं विसरलास आणि स्वत्: होऊन त्या दावात पड़लास ।।ध्रु।।

बालपनाच्या दुसऱ्या प्रहरात महानंद छद घेऊन तू हामामा घालू लागलास. दिवस जाट होते तस तसे गोड वाटत होते; पण पुढे काय होणार,  हे कळत। नव्हते ।।2।।

तारुण्याच्या तिसऱ्या प्रहरात अहंपनात छद लागला व् त्यामुळे एकठिकानि पाय स्तिर राहिना. प्रपंच्याचा हव्यस करता करता दावत पडशील, हे मात्र नक्की समज ।।3।।

म्हातारपनाच्या चौत्या प्रहरात हमामा करतांना हात पाय लटपाटू लागले. सूर्यदेव पाटलाचा यम हां पोरगा आहे. त्याच्या डावाट पडशील रे बाबा! ।।4।।

तुकाराम महाराज म्हणतात, हा हामामा घालतानि भीउन मी फया गड़याची संगत सोडली. आणि यादवाचे पोर विठ्ठल, याच्या संगतिने गाई चारु लागलो ।।5।।

१२९मशीं पोरा घे रे बार । तुझें बुजीन खालील द्वार

हमामा - अभंग २

गाथा अभंग १२९

मशीं पोरा घे रे बार । तुझें बुजीन खालील द्वार ॥१॥

पोरा हमामा रे हमामा रे ॥ध्रु.॥

मशीं हमामा तूं घालीं । पोरा वरी सांभाळीं खालीं ॥२॥

तरी च मशीं बोल । पोरा जिव्हाळ्याची ओल ॥३॥

मशीं घेतां भास । जीवा मीतूंपणा नास ॥४॥

मज सवें खरा । पण जाऊं नेदी घरा ॥५॥

आमुचिये रंगीं । दुजें तगेना ये संगीं ॥६॥

तुक्यासवें भास । हरी जीवा करी नास ॥७॥

अर्थ :- पोरा,माझ्याशी एकदा हमामा ( विशिष्ट प्रकारचा खेळ ) खेळ म्हणजे तुझे खालचे अधोगतीचे दार मिटऊंन टाकिन ।।1।।

ए पोरा, अरे हमामा-हमामा खेळ ।।ध्रु।।

माझ्याशी हमामा खेळताना तू खाली-वर सांभाळ ।।2।।

पोरा, अरे, तुझ्या आत जिव्हाळ्याचा ओलावा असेल, तरच माझ्याशी बोल ।।3।।

माझ्याशी बोलताना तुझ्या मी- तुपनाचा नाश होईल ।।4।।

तू मझायाबरोबर आहेस खरा, पण तुला प्रपंच्याकडे फिरु देणार नाही ।।5।।

आमच्या रंगाच्या संगतित दुसरा कुणी टिकट नाही ।।6।। तुकाराम महाराज म्हणतात, माझ्याशी भाषण केले तर मी जीवाचे हैरान करतो व त्याचा नाश करतो ।।7।।