शुक्रवार, ४ सप्टेंबर, २०१५

१२५ फुगडी फू फुगडी घालितां उघडी राहे । लाज सांडोनि एक एकी

फुगड्या - अभंग २

अभंग १५०

फुगडी फू फुगडी घालितां उघडी राहे । लाज सांडोनि एक एकी पाहे ॥१॥

फुगडी गे अवघें मोडी गे । तरीच गोडी गे संसार तोडी गे ॥ध्रु.॥

मागें जें शिकली होतीस पोटीं । तें चि विचारूनि आतां उच्चारी ओठीं ॥२॥

त्रिगुणांची वेणी तुझे उडते पाठीं । सावरूनि धरी घाली मूळबंदीं गांठी ॥३॥

आगळें पाउल जिंके एकाएक । पावसी मान हे मानवती तिन्ही लोक ॥४॥

तुका म्हणे तुजमजमध्यें एक भाव । सम तुकें बार घेऊं पावों उंच ठाव ॥५॥

अर्थ :- संसाराची फुगड़ी खेलतांना (प्रपंचिक क्रिया) मोकळी, मुक्त रहा. सर्व लाज सोडून एकांतत एकालाच पहा ।।1।।

अगं, सर्व संसाराची फुगड़ी 'फु' करून मोडून टाक. तू जर संसार तुडुन टाकला तर खेळात खरी गोडी आहे ।।ध्रु।।

मातेच्या पोटात असताना जे काही शिकलिस, ते आठव, त्यचा उच्चार कर ।।2।।

तुझ्या पाठीवर त्रिगुणवृत्तिचि वेणी उड़त आहे. तिला सावरुं धर. मुलबंधाजवळ तिची गाठ बांध ।।3।।

पुढे पायल टाकत एक- एक भूमिका जीनकुं घे, म्हणजे तेथे तुला मान मिळेल. तिन्ही लिकांत तुला माण मिळेल. ।।4।।

तुकाराम महाराज म्हणतात, तुझ्या-माझ्यात एकच भाव आहे, अशा सम स्तितिमध्ये आपण उच्य पोहचु ।।5।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा