शनिवार, २८ डिसेंबर, २०१९

४७१ पुरविले आळी

४७१ पुरविले आळी

पुरविली आळी । जे जे केली ते ते काळीं ॥१॥

माय तरी ऐसी सांगा । कृपाळुवा पांडुरंगा ॥ध्रु.॥

घेतलें नुतरी । उचलोनि कडियेवरी ॥२॥

तुका म्हणे घांस । मुखीं घाली ब्रम्हरस ॥३॥


अर्थ :- पांडुरंगा आम्ही बालकांनी केलेले हट्ट तू वेळोवेळी पुरविले ll१ll

माझ्या विठाई सारखी आई दुसरी कीं आहे, सांगा llध्रुll 

एकदा कडेवर उचलून घेतल्यावर , स्वीकार केल्यावर ती पुन्हा कडेवरून (आम्हाला) खाली उतरवत नाही. त्याग करीत नाही ll २ll

तुकाराम महाराज म्हणतात , माझी माऊली मला ब्रह्मरासाचा घास भरवते  ll३ll