गुरुवार, २८ जानेवारी, २०१६

४२७आंधळ्यापांगळ्यांचा एक विठोबा दाता

आंधळा

गाथा अभंग ४२७

आंधळ्यापांगळ्यांचा एक विठोबा दाता । प्रसवला विश्व तो चि सर्व होय जाणता ।

घडी मोडी हेळामात्रें पापपुण्यसंचिता । भवदुःख कोण वारी तुजवांचुनि चिंता ॥१॥

धर्म गा जागो तुझा तूं चि कृपाळू राजा । जाणसी जीवींचें गा न सांगतां सहजा ॥ध्रु.॥

घातली लोळणी गा पुंडलीकें वाळवंटीं । पंढरी पुण्य ठाव नीरे भीवरे तटीं ।

न देखे दुसरें गा । जाली अदृश्यदृष्टी । वोळला प्रेमदाता केली अमृतवृष्टी ॥२॥

आणीक उपमन्यु एक बाळ धाकुटें । न देखे न चलवे जना चालते वाटे ।

घातली लोळणी गा हरिनाम बोभाटे । पावला त्याकारणें धांव घातली नेटें ॥३॥

बैसोनि खोळी शुक राहे गर्भ आंधळा । शीणला येरझारी दुःख आठवी वेळा ।

मागील सोसिलें तें ना भीं म्हणे गोपाळा । पावला त्याकारणें । लाज राखिली कळा ॥४॥

न देखे जो या जना तया दावी आपणा । वेगळा सुखदुःखा मोहो सांडवी धना ।

आपपर तें ही नाहीं बंधुवर्ग सज्जना । तुकया ते चि परी जाली पावें नारायणा ॥५॥

अर्थ :- आंधळ्या-पांगळ्यांना दाता एक विठोबाच आहे. तो विश्वाचा निर्माता असून सर्वज्ञ आहे. ज्याच्या त्याच्या पापपुण्याला अनुसरुण तो क्षणात भोगांच्या घडामोडी करतो. तुझ्यावाचुन संसारातील दुःख, चिंता कोण दूर करेल ? ।।1।।

भक्तांवर अनुग्रह करण्याचा तुझा धर्म जागृत राहो. तू कृपाळु राजा आहेस. काही न सांगता आमच्या अंत:करणातील सारे सहज जानतोस ।।ध्रु।।

चंद्रभागेच्या तिरावर पंढरी क्षेत्र आहे. तेथे पुंडलिकाने वालवंटात लोळण् घेतले व अनुष्ठान केले. जगाला पाहण्याची त्याची दृष्टी मावळली. त्याची अशी भक्ति पाहुन प्रेमदाता भगवंत तेथे आला व त्याने त्याच्यावर अमृताचा वर्षाव केला ।।2।।

उपमन्यु नावाच्या लहान बाळाने राजाच्या घरी दूध प्यायले होते. घरी आल्यानंतर त्याने आइकडे दूध मागितले. गरीबीमुळे दूध मिळतच नव्हते. आईने त्याला पाण्यांत पीठ कालवुन दिले; परंतु चव वेगळी होती. उपमन्युने दुधाचा हट्ट धरल्यावर आई त्याला म्हणाली, ''बाळा, देवाची कृपा असली तरच तसे दूध मिलते, नाहीतर नाही;'' ते एकूण उपमन्युने देवाचा ध्यासच घेतला. हरिनामाने देवाचा धावा केला. देव तेथे धावून आला ।।3।।

'जग पाहू नये' या बुद्धिने आंधळा होवून शुक आईच्या पोटात बारा वर्ष दडून बसला होता. जन्म-मरणाच्या एरझार्याच्या दुःखने तो येथे राहिला. देवाने 'भिउ नकोस' असे सांगून त्याचा देहाभिमान दूर केला आणि त्याची लाज राखलि ।।4।।

तुकोबाराय म्हणतात, जे सुखदुःखापासून व मोहापासून वेगळे होऊन द्रव्याची आठवनहि करत नाहीत, ईतरेजनांनकडे पाहत नाहीत आणि ज्यांना बंधुवर्ग, आपला परका असा भेदभाव नाही, अशांना देव दर्शन देतो. देवा, माझ्यावर कृपा कर ।।5।।

४२५देखत होतों आधीं । मागें पुढें सकळ

४२५

देखत होतों आधीं । मागें पुढें सकळ । मग हे दृष्टी गेली । वरी आले पडळ ।

तिमिर कोंदलेंसें । वाढे वाढतां प्रबळ । भीत मी जालों देवा । काय ज्याल्याचें फळ ॥१॥

आतां मज दृष्टी देई । पांडुरंगा मायबापा । शरण आलों आतां । निवारूनियां पापा ।

अंजन लेववुनी । करीं मारग सोपा । जाईन सिद्धिपंथें । अवघ्या चुकती खेपा ॥ध्रु.॥

होतसे खेद चित्ता । कांहीं नाठवे विचार । जात होतों जना । मागें तोही सांडिला आधार ।

हा ना तोसा ठाव जाला । अवघा पडिला अंधार । फिरलीं माझीं मज । कोणी न देती आधार ॥२॥

जोंवरि चळण गा । तोंवरि म्हणती माझा । मानिती लहान थोर देहसुखाच्या काजा । इंद्रियें मावळलीं ।

आला बागुल आजा । कैसा विपरीत जाला । तो चि देह नव्हे दुजा ॥३॥

गुंतलों या संसारें । कैसा झालोंसें अंध । मी माझें वाढवुनी । मायातृष्णेचा बाध।

स्वहित न दिसेचि । केला आपुला वध । लागले काळ पाठीं । सवें काम हे क्रोध ॥४॥

लागती चालतां गा । गुणदोषाच्या ठेंसा । सांडिली वाट मग । जालों निराळा कैसा ।

पाहातों वास तुझी । थोरी करूनी आशा । तुका म्हणे वैद्यराजा । पंढरीच्या निवासा ॥५॥

४२३पांगुळ जालों देवा नाहीं हात ना पाय

पांगुळ

गाथा अभंग ४२३

पांगुळ जालों देवा नाहीं हात ना पाय । बैसलों जयावरी सैराट तें जाय ।

खेटितां कुंप कांटी । खुंट दरडी न पाहे । आधार नाहीं मज कोणी । बाप ना माये ॥१॥

दाते हो दान करा । जातें पंढरपुरा । न्या मज तेथवरी । अखमाचा सोयरा ॥ध्रु.॥

हिंडतां गव्हानें गा । शिणलों दारोदारीं । न मिळे चि दाता कोणी । जन्मदुःखातें वारी ।

कीर्ति हे संतां मुखीं । तो चि दाखवा हरी । पांगळां पाय देतो । नांदे पंढरपुरीं ॥२॥

या पोटाकारणें गा । जालों पांगीला जना । न सरे चि बापमाय । भीक नाहीं खंडणा ।

पुढारा म्हणती एक । तया नाहीं करुणा । श्वान हें लागे पाठीं । आशा बहु दारुणा ॥३॥

काय मी चुकलों गा । मागें नेणवे कांहीं । न कळे चि पाप पुण्य । तेथें आठव नाहीं ।

मी माजी भुललों गा । दीप पतंगासोयी । द्या मज जीवदान । संत महानुभाव कांहीं ॥४॥

दुरोनि आलों मी गा । दुःख जालें दारुण । यावया येथवरी होतें । हें चि कारण ।

दुर्लभ भेटी तुम्हां । पायीं जालें दरुषन । विनवितो तुका संतां । दोन्ही कर जोडून ॥५॥

अर्थ :- देवा, मी पांगळा झालो आहे. माला हातपाय नाहीत. ज्यावर मी विसंगुण आहे ते मन सैरावैरा धावत आहे. कुंपनाला, काटयाला खेटत आहे. खूंट-दरडी यांचाही विचार ते करीत नाही. त्या परिस्तितित माला कोणाचाच आधार नाही ।।1।।

पंधारीला जाणाऱ्या दात्यांनो, संतांनो, माला मदत करा. माला पंधारीला न्या. हो! तुम्ही आणि पुंडलिक आंधळ्या-पांगळ्या लोकांचे सोयरे आहेत ।।ध्रु।।

प्रपंचाच्या हातात एरझार व्हालुन, हिंडून मी शिनून गेलो आहे. जन्माचे दुःख निवारनारा कोन्हि डाटा आजपर्यंत माला भेटला नाही. संत ज्यांचे गुण गातात तो हरी माला भेटावा. पंगुला पाय देणारा देव पंढरित राहत आहे ।।2।।

पोटासाठी मी लोकाधीन बनालो आहे. प्रत्येकाला मायबाप म्हणावे लागते. माझे भिक मागने संपत नाही. पुढारी म्हणावणाऱ्या कित्येक लोकांना माझी दया येत नाही. आशारूपि मोठे कुत्रे माझ्यापाठी लागले आहे ।।3।।

संतम्हणतांनी आता माला जीवदान द्यावे. पतंग ज्या प्रमाणे दिव्यावर पडतो, तासा मी देहादि उपाधिनमध्ये गुंतून पडलो आहे ।।4।।

तुकोबा म्हणतात, संतजनाहो,  दोन हात जोडून , जन्मापासून भटकत भटकत मी तुमच्या पर्यंत येवून पोहचलो आहे . माला फार दुःख झाले आहे. तुमची भेट दुर्लभ आहे;  पण आज तुमचे दर्शन झाले आहे. इथवर एण्याचे हेच कारण होते. दोन्ही हात जोडून माझी तुम्हाला विनंती आहे, की माला पांडुरंगाचे दर्शन घडवा ।।5।।

४२२अंगीं देवी खेळे । कां रे तुम्हासी न कळे

डाकेचे अभंग

गाथा अभंग ४२२

अंगीं देवी खेळे । कां रे तुम्हासी न कळे । कोणाचे हे चाळे । सुख दुःख न मनितां ॥१॥

मीं तों आतां येथें नाहीं । ओळखी वचनाच्या ठायीं । पालटाचा घेई । भाव खरें लोपे ना ॥ध्रु.॥

आपुलाले तुम्ही पुसा । सोवा एव्याच सरिसा । थिरावल्या कैसा काय । जाणों विचार ॥२॥

तुका म्हणे लाभकाळ । तेथें नसावें शीतळ । मग तैशी वेळ । कोठें जाते सांपडों ॥३॥

माझ्या अंगात देव खेळते हे तुम्हाला कसे समझले नाही? माला सुख-दुःख यांची जाणीव नाही, म्हणजे हे चाळे दूसरे कुणाचे असनार ? ।।1।।

माला अता भान उरलेले नाही. माझा भाव पालटला आहे. तो झाकल जाणार नाही ।।ध्रु।।

आपल्या मनातील गोष्टीनचा विचार आपण करावा. वृत्ति स्तिरावल्यावर विचार कसा कळणार ? ।।2।।

तुकाराम माहाराज म्हणतात, ज्या वेळी हा लाभ होतो, त्या वेळी थंड राहु नये. तशी संधी परत कशी मिळणार ? ।।3।।

४२१जाली झडपणी खडतर देवता

डाकेचे अभंग

गाथा अभंग ४२१

जाली झडपणी खडतर देवता । संचरली आतां निघों नये ॥१॥

मज उपचार झणी उपचार झणी आतां करा । न साहे दुसरा भार कांहीं ॥ध्रु.॥

नेऊनियां घाला चंद्रभागे तिरीं । जीवा नाहीं उरी कांहीं आतां ॥२॥

तुका म्हणे कळों आलें वर्तमान । माझें तों वचन आच्छादलें ॥३॥

अर्थ :- खडतर अशा या विठ्ठल देवतेने मला झडपले आहे. ही देवता अंगात संचारली आहे. ती आता निघु शकत नाही ।।1।।

माझ्यावर कोनात्याच् औषध-उपचारांचा परिणाम होणार नाही. माला ते काही सहन होणार नाही ।।ध्रु।।

माझ्या जीवनाचा आता काहीही भरवसा नाही. मला फक्त चंद्रभागेच्या तिरावर देवाच्या चरणी नेवून घाला ।।2।।

तुकाराम महाराज म्हणतात, हे वर्त्तमान तुम्हाला कळेल, की माझे बोलने संपले ।।3।।

४२०देवी देव जाला भोग सरला यावरी

डाकेचे अभंग

गाथा अभंग ४२०

देवी देव जाला भोग सरला यावरी । सांगाया दुसरी ऐसी नाहीं उरली ॥१॥

हरिनाम देवनाम तुम्ही गाऊनियां जागा । पेंठवणी मागा नका ठेवूं लिगाड ॥ध्रु.॥

शेवटीं सुताळी बरवी वाजवावी डांक । ताळा घाली एक सरलियाचे शेवटीं ॥२॥

गुंडाळा देव्हारा मान देती मानकरी । तुका म्हणे बरीं आजि कोडीं उगविलीं ॥३॥

अर्थ :- सर्वच देवी, देव आले, त्यामुळे भोग संपूण गेले. आता दूसरे काही शिल्लक राहिले नाही ।।1।।

हरिनाम, देवनाम गात तुम्ही सतत जागे राहा. आपल्या सरमानुसार धन मागा; त्याबद्दलचि कटकट ठेवू नका ।।ध्रु।।

अखेरच्या वेळी चांगली टाळी वाजवावी. एक संपले की अखेरीस जिव-ब्रह्म यांच्या एक्यानुभवाचा चांगला मेळ घालावा ।।2।।

तुकोबाराय म्हणतात, आज मानकार्याणि आपला मान नेला. आज सर्वांच्या अडचणी नष्ट झाल्या. आता हां चौक देव्हारा गुंढळून ठेवावा ।।3।।

४१९खेचर खडतर । काळ कांपती असुर

डाकेचे अभंग

गाथा अभंग ४१९

खेचर खडतर । काळ कांपती असुर । नांदे भीमातीर । पंढरपुर पाटणीं ॥१॥

आतां करी कां रे हाकारा । सहस्र नामें एकसरा । दवडिते खेचरा । अंगसंगें धरूनी ॥ध्रु.॥

सीते जाली झडपणी । राहाणे वासुगीच्या बनीं । पावली जननी । झोंटि मोकळिया केशी ॥२॥

लाविलें कावरें । प्रल्हादा म्हैसासुरें । आली येकसरें । दांत खात रंगासी ॥३॥

वसुदेवाचीं बाळें । सात खादलीं ज्या काळें। आली भोगवेळे । तया कारणें तेथें ॥४॥

पांडवें बापुडीं । वाज केलीं फिरती वेडीं । धांवोनियां काढी । अंगसंगें त्राहाविलीं ॥५॥

नामाचें चिंतन । तेथें धांवते आपण । न विचारितां हीण । भाव देखे जयाचा ॥६॥

कुळीची कुळदेवता । तुका म्हणे आम्हां माता । काय भय भूतां । काळ यमदूताचें ॥७॥

अर्थ :- भीमा नदीच्या काठी, पंढधपुर नगरात एक मोठे दैवत आहे. त्याच्या धाकामुळे असुर, काळ, खेचर ई. थरथर कापतात ।।1।।

विष्णूच्या सहस्त्र नामाचा जप केला, की तो आपल्याला जवळ घेतो व प्रपंच्यरूपी भुताला पळवून लावतो ।।ध्रु।।

रावण नावाच्या भूतान सीतला झड़पले होते. परिणाम तिला अशोक वनात राहावे लागले; परंतु ही सीतामाई त्या भूतांचा नाश करण्यासाठी स्वतःचे केस मोकळे सोडून निर्भयपने तेथे गेली ।।2।।

हिरण्यकशपु नावाच्या आसुराने कोठे आहे तुझा देव, असे विचारुण बाळ प्रल्हादाला त्रासुन सोडले. त्याचा भयंकर धळ केला, परंतु नारसिंहरुपात आई खांब फोडून प्रकट झाली ।।3।।

कंस नावाच्या भूताने वासुदेवाची सात बाळ खाल्ली, त्याचा संहार करण्यासाठी कृष्णई अवतारालि ।।4।।

पांडवाना कौरवांनी देशोधड़ीला लाउन वनवन फिरायला लावले. तेव्हा कृष्णइने त्याना जवळ केले व सन्मानाने त्यांचे राज्य मिळवून दिले ।।5।।

तिचा नामघोष जिथे होतो, तेथे ती स्वतः प्रकट होते. भक्तांचा भक्तिभाव पाहते. भक्तांमध्ये लहान-थोर ऐसा भेदभाव करत नाही ।।6।।

तुकाराम महाराज म्हणतात, पंढरपुर वासिनी माता आमचे कुलदैवत आहे; त्यामुळे आम्हाला काळिकालाचे, यमदुतांचे वा भूतांचे भय नाही ।।7।।

४१७पुढें येते देवी । तिची जती चालों द्यावी

डाकेचे अभंग

गाथा अभंग ४१७

पुढें येते देवी । तिची जती चालों द्यावी । मागील झाडावी । झाडा मान आसडी ॥१॥

एकवीरा आली अंगा । आतां निवारील रोगा । माझ्या भक्तापाशीं सांगा । पूजा भावें करावी ॥ध्रु.॥

मेंढा मारावा लोवाळ । पूजा पावली सकळ । तुम्हीं केलें बळ । मग मी ठायीं न पडें ॥२॥

तुका म्हणें मुळीं । लागली ते आली कुळीं । वंदुनी सकळीं । जीवें भावों ओवाळा ॥३॥

अर्थ :- पुढे देवी येणार आहे. तिची यात्रा करावी. मागील सारे नवास-सायास फेडून टाकावेत ।।1।।

एकविरा अंगात  संचारली आहे. ती आता रोग निवारण करील. ती आपल्या भक्तांना सांगते, की श्रध्येने माझी पूजा करा ।।ध्रु।।

केसाळ मेंढी मारा म्हणजे मला पूजा पावेल. तुम्ही बळाने काही करू जाल, तर मी सापड़नार नाही ।।2।।तुकाराम महाराज म्हणतात, ही देवी आमच्या कुळात आलेली आहे. तिला वंदन करुण तिची मनापासून आरती करा ।।3।।

४१६माझा देव्हारा साचा

डाकेचे अभंग 

गाथा अभंग ४१६

माझा देव्हारा साचा । नाहीं आणीक कोणाचा । त्रिभुवनीं याचा । ठसा न लगे पुसावें ॥१॥

या रे लोटांगणीं । कांहीं करा विनवणी । करील झाडणी । भूत काढी संसार ॥ध्रु.॥

पडिले विषयांचे गोंधळीं । ते त्रिगुण आकळी । हरिनाम आरोळी । कानीं पडतां ते उठी ॥२॥

घेतला अहंकार । काम क्रोध या मत्सरें । पळती प्रेमभरें । अवघे ठाव सांडुनी ॥३॥

घेतलासे पुरा । माया ममता आसरा । अवघ्या एक सरा । पळती रंग देखोनी ॥४॥

तुका म्हणे द्यावा भाव । फिटेल मनिचा संदेह । आणीक न लगे ठाव । कांहीं कोठें हिंडावें ॥५॥

अर्थ :- माझा देव्हारा सत्य, सुंदर आहे. इतर कुणाचाच असा नाही. या देवाची कीर्ति त्रैलोकात पसरली आहे, म्हणून माझ्या देव्हार्यात  कोणता देव आहे, हे कोणालाही विचारायला नको ।।1।।

तुम्ही या. लोटांगण घाला, विनंती करा म्हणजे तो झाडनी करुण भुत काढून टाकिल ।।ध्रु।।

जे विषयांच्या गोंधळात पडले आहेत, त्रिगुणांनी बांधले गेले आहेत, ते होरिनामाची अरोळी एकताच उठून बसतील ।।2।।

जे काम, क्रोध, मत्सर, अहंकार या भूतांनी झपातलेले आहेत, त्यांनी अंत:करणात जर हरिनामाचे प्रेम साठवून ठेवले तर ती भूते पळून जातील ।।3।।

माया, ममता यांचा ज्यांनी आसरा घेतला ते हरिनामाचा रंग पाहिल्यावर लगेच पळून जातील ।।4।।

तुकोबा म्हणतात, तुम्ही भाव अर्पण करा, म्हणजे मनातील संदेह फ़िटेल आणि तुम्हाला इतरत्र भटकाव लागणार नाही ।।5।।

४१५विनति घातली अवधारीं

डाकेचे अभंग

गाथा अभंग ४१५

विनति घातली अवधारीं । मज देई वो अभय करीं । पीडिलों खेचरीं । आणीक वारी नांवांची ॥१॥

रंगा येई वो एकला रंग वोडवला । हरिनाम उठिला गजर केला हाकारा ॥ध्रु.॥

देवांचे दैवते । तुज नमिलें आदिनाथे । ये वो कृपावंते । भोगा माझ्या धांवति ॥२॥

न लवीं आतां वेळ । आइत सारिली सकळ । तुका म्हणे कुळ । आमुचिये दैवते ॥३॥

अर्थ :- हे जगदंबे, मी तुला विनावितो आहे, ती विनवनी एकूण  ज्या अनेक पिशाचाणी मला फार त्रासुन सोडले आहे. त्यांचा बंदोबस्त कर ।।1।।

हे श्रीरंगा, गरज करुण मी तुला हाक मारली. त्या गजराने श्रीरंग उठला. माझ्या ठिकाणी रंग भरला आहे. तू माझ्याकडे ये ।।ध्रु।।

कृपावंता, तू सर्व देवांचे दैवत आदिनाथ आहेस. तुला माझा नमस्कार असो. माला या भोगातून सोडविन्यासाठी तू धाव घे ।।2।।

तुकाराम महाराज महानता, हे कुलदेवते, तुजासामुग्री सिद्ध केलि आहे. आता येथे येण्यास उशीर करू नकोस ।।3।।

४१४साच माझा देव्हारा

डाकेचे अभंग

गाथा अभंग ४१४

साच माझा देव्हारा । भाक ठेवा भाव खरा । त्रिगुणाचा फुलवरा । आणा विनति सांगतों ॥१॥

माझें दैवत हें रंगीं । नाचे वैष्णवांच्या संगीं । भरलें मग अंगीं । निवाड करी दोहींचा ॥ध्रु.॥

तुझें आहे तुजपासीं । परि तूं जागा चुकलासी । चिवडुनियां नासी । तुझ्या घरिच्यांनीं केली ॥२॥

आतां न पडे ठावें । वांचूनियां माझ्या देवें । अंधकार व्हावें । नासु ठाव शोधावा ॥३॥

आंधळ्यासी डोळे । देते पांगुळासी पाय । वांजा पुत्र फळे । नवस पुरविते विठाई ॥४॥

उगविलीं कोडीं । मागें कितेकांचीं बापुडीं । तुका म्हणे घडी । न लगे नवस द्या आधीं ॥५॥

अर्थ:- माझा देवहारा खरा असल्याचे मी प्रतिज्ञापूर्वक सांगतो.माझ्या देवहारातील देवांवर शुध्द, सात्विक भाव ठेवा. त्रिगुणांनचा फुलोरा आना असे मी विनावित आहे ।।1।।

माझा देव सज्जनांमध्ये माचतो. हे दैवत अंगात संचारले की ते दोहोंचा निवडा करते ।।ध्रु।।

तुझे तुझ्याजवाळच आहे, पण तू जागा चुकला आहेस. तुझ्यातील विकारांनी तुझा सर्वनाश केला आहे ।।2।।

आता माझ्या देवाशिवाय खरे सुख कोठे आहे, हे तुला कळणार नाही त्यासाठी प्रथम अंधार दूर सारावा व योग्य ठिकाण शोधावे ।।3।।

आमची विठाइ आंधळयास डोळे , पांगळ्यास पाय, वांझेला पुत्र देते. सार्यांचे नवास पूर्ण करते ।।4।।

तुकाराम महाराज म्हणतात, आता पर्यंत तिने अनेक गरीबांचे संकटे निवारलि आहेत. त्यासाठी तुम्ही नवस करा; मग तो पूर्ण होण्यास विलंब होणार नाही ।।5।।

४१३चौक भरियेला आसनीं पाचारिली कुळस्वामिनी

डाकेचे - अभंग ८

गाथा अभंग ४१३

चौक भरियेला आसनीं पाचारिली कुळस्वामिनी । वैकुंठवासिनि ये धांवोनी झडकरी ॥१॥

रंगा येई वो विठाई सांवळिये डोळसे । तुझें श्रीमुख साजिरें तें मी केधवां देखेन ॥ध्रु.॥

रजतमधुपारती । पंचप्राणांची आरती । अवघी सारोनी आइती । ये धांवती झडकरी ॥२॥

मन मारोनियां मेंढा । आशा मनसा तृष्णा सुटी । भक्तिभाव नैवेद्य ताटीं । भरोनि केला हाकारा ॥३॥

डांका अनुहात गजरे । येउनि अंगासी संचरे । आपुला घेउनी पुरस्कार । आरोग्य करीं तुकयासी ॥४॥

अर्थ :- अंत:करणरूपी आसनांनवर पंचज्ञानेंद्रिये, पंचकर्मेंद्रिये, पंचप्राण आणि चित्तचतुष्ट यांचा चौक करुण कुलस्वामिनीला प्राचारन केले. हे वैकुंठवासिनी, लवकर धावून ये ।।1।।

हे विठाइ, श्रीरंगे तुझे सावळे आणि साजरे असे श्रीमुख मी केव्हा पाहिन , असे झाले आहे ।।ध्रु।।

राजतन यांची धुपारती, पंचप्राणांची आरती अशी सारी तुझ्या पुजेची सामुग्री तयार करुण मी तुझी वाट पाहत आहे. हे जगदंबे, लकवकर धाव घे ।।2।।

वैराग्याच्या मुठिने मनरूपी मेंढा मारून, त्यातील आशा, तृष्ण, मोह आशा सार्यना बाजूला काढून, भक्तिभावाच्या ताटात नैवयद्य भरून मी हाकार करत आहे ।।3।।

तुकाराम महाराज म्हणतात, अखंड हरिनामाचा डंका गर्जत आहे; तरी माझ्या आंगात संचारुण माझ्या पुजेचा स्वीकार करा आणि माला भवरोगापासून मुक्त, निरोगी करा ।।4।।

४१२गाईन ते लीळा चरित्र पवाडे

गौळणी

गाथा अभंग ४१२

गाईन ते लीळा चरित्र पवाडे । राखिले संवगडे सहित गाई ॥१॥

चोरिलें नवनीत बांधविला गळा । जे तुम्हीं गोपाळा छंद केले ॥ध्रु.॥

मोहिल्या गोपिका पांवयाच्या छंदें । केली ते गोविंदें क्रीडा गाऊं ॥२॥

मायबापा लाड दाखविलें कौतुक । तें या आणूं सुख अंतरासी ॥३॥

निर्दाळिले दुष्ट भक्तां प्रतिपाळी । ऐसा म्हणों बळी आमुचा स्वामी ॥४॥

तुका म्हणे सरसी असों येणें वोघें । लागोनि संबंधें सर्वकाळ ॥५॥

अर्थ :- श्रीकृष्णने आपले सवंगडी गोळा करुण गई राखल्या. त्या ठिकाणी लीला केल्या, पराक्रम केले, त्याचे चरित्र मी गात आहे ।।1।।

ज्याने लोन्याची चोरी केली, आपला गळा बांधून घेतला. गोपाळांबरोबर वेगवेगळे छंद (खेळ) केले ।।ध्रु।।

त्याने पावा वाजवुन त्या ध्वनीने गोपीना मोहित केले. गोविंदाने तेथे जी क्रीड़ा केली, ती मी गातो ।।2।।

आपल्या आइवडिलांना त्याने लाड़ाने जे नवल दाखविले. त्यामुळे जे सुख निर्माण झाले , ते मी आठवित आहे ।।3।।

देवाने दृष्टांचे निर्दालन केले आणि भक्तांना वाचवीले. असा हा सामर्थ्यशाली भगवंत आमचा स्वामी आहे ।।4।।

तुकाराम महाराज म्हणतात, आशा या बोधाने संपन्न बनून सदासर्वकाळ त्याच्याजवळ राहु ।।5।।

४११बहुतांचे संगती । बहु पावलों फजिती

मृदंग पाट्या

गाथा अभंग ४११

बहुतांचे संगती । बहु पावलों फजिती ॥१॥

बरें केलें नंदबाळें । मागिलांचें तोंड काळें ॥ध्रु.॥

माझा करितील तंटा । लपती आलिया बोभाटा ॥२॥

तुका म्हणी काई । किती म्हणों बाप आई ॥३॥

अर्थ :- अनेकांच्या संगतिमध्ये माझी अनेकदा खुप फजीती झाली आहे ।।1।।

या नंदाच्या बाळाने फार चांगले काम केले मागे जे विकार होते, त्यांचे तोड़ काळे केले ।।ध्रु।।

माझ्याशी ज्याणी भांडण केले, ते लपून बसले. बोभाता झाला ।।2।।

तुकोबा म्हणतात, लौकिक आईबापांना 'आई-बाप' असे का आणि किती दिवस म्हणजे ? खरे आईबाप तर नंदनंदनच आहे ।।3।।

४०३तंव ते म्हणे ऐका हृषीकेशी वो

गौळणी

गाथा अभंग ४०३

तंव ते म्हणे ऐका हृषीकेशी वो । नवाजिलें तुम्ही म्हणां आपणांसि वो ।

तरी कां वंचनुक सुमनासि वो । नट नाट्य बरें संपादूं जाणतोसि वो ॥१॥

सर हो परता परता हो आतां हरी । म्हणे सत्राजिताची कुमरी ।

जाणतें मी या शब्दाच्या कुसरी । ऐसें च करून ठकविलें आजिवरी ॥ध्रु.॥

भावें गेलें म्हुण न व्हावा वियोग । मनिचे आर्त जन्मांतरीं व्हावा संग ।

तों तों केलें हें पाठमोरें जग । ऐसें काय जाणें हे तुझे रंग ॥२॥

काय करूं या नागविलें कामें । लागलें तयास्तव इतुकें सोसावें ।

नाहीं तरी कां नव्हती ठावीं वर्में । परद्वारीं ऐसा हाकलिती प्रसिद्ध नांवें ॥३॥

काय किती सांगावे तुझे गुण । न फुटे वाणी निष्ठ‍ ऐसा निर्गुण ।

आप पर न म्हणसी माय बहीण । सासूसुनास लावुनि पाहासी भांडण ॥४॥

इतुकियावरी म्हणे वैकुंठिंचा राणा । होऊन गेलें तें नये आणूं मना ।

आतां न करीं तैसें करी क्रिया आणा । भक्तवत्सल म्हणे तुकयाबंधु कान्हा ॥५॥

अर्थ :- देवाचे ते बोल एकूण सत्यभामा म्हणते,  देवा , एका. तुम्ही स्वताचा लौकिक सांगा किव्हा चांगले म्हणा. जर आपली दृष्ट सर्वत्र सामान आहे, तर अशी वंचना का होते? तर हे तुमचे सारे सोंग आहे आणि त्याचे संपादन करणे तुम्ही अगदी चांगल्या प्रकार जानता ।।1।।

असे कृत्य करुण तुम्ही मला आजपर्यंत फसविले ।।ध्रु।।

हे देवा, तुमचा कधीही वियोग होवू नये म्हणून भावपूर्वतेने मी तुमच्याकडे आले. पूर्वजन्मी माझी अशी इच्छा होती, की उत्तरजन्मात आपली साथ-संगत लाभावी; पण तुम्ही मला जगाला पारखे केले. तुम्ही असे कराल असे तुमचे ढंग काय मी जानत होते ? ।।2।।

त्यंकरिता मला इतके दुःख सोसावे लागले. देवाची अशी कृती मला ठाऊक नव्हती का? कारण 'व्यभिचार' म्हणून त्याची ख्यातिच् आहे ।।3।।

तुमचे गुन किती म्हणून सांगावे! तुमच्या संबंधाने वाचा फूटत नाही;  कारण तुम्ही निर्गुण व निष्ठुर आहात. तुमच्याकडे आपले-परके, आई-बहिन असे काही नाते नाही. सासवा-सुनाचे भांडण लावून देतात व ते पाहत बसता! ।।4।।

सत्यभामेचे अशा प्रकारचे बोलने एकूण वैकुंठाधिपति भगवान म्हणतात, जे काही पूर्वी होऊन गेले ते पुन्हा मनात आणु नये. आता मात्र मी तसे करणार नाही, अगदी शपत घेवून सांगतो. भक्तावर दया करणारा देव असे म्हणाला, असे तुकारामबंधू म्हणतात ।।5।।