गौळणी
गाथा अभंग ३८७
घाली कवाड टळली वाड राती । कामें व्यापिलीं कां पडिली दुश्चित्ती ।
कोणे लागला गे सदैवेचे हातीं । आजि शून्य शेजे नाहीं दिसे पती वो ॥१॥
बोले दूतिकेशीं राधा हें वचन । मशीं लाघव दाखवी नारायण ।
म्हणे कोमळ परी बहु गे निर्गुण । याशीं न बोलें कळला मज पूर्ण वो ॥ध्रु.॥
धाडिलें गरुडा आणिलें हनुमंता । तैं पाचारिलें होउनि ये वो सीता ।
लाजिनली रूप न ये पालटितां । जाला भीमकी आपण राम सीता वो ॥२॥
सत्यभामा दान करी नारदासी । तैं कळला वो मज हृषीकेशी ।
तुळे घालितां न ये कनक वो रासी । सम तुके एक पान तुळसी वो ॥३॥
मज भुली पडली कैशापरी । आम्हां भोगूनि म्हणे मी ब्रम्हचारी ।
दिली वाट यमुने मायें खरी । तुम्हां आम्हां न कळे अद्यापवरी वो ॥४॥
जाणे जीवींचें सकळ नारायण । असे व्यापूनि तो न दिसे लपून ।
राधा संबोखिली प्रीती आलिंगून । तुका म्हणे येथें भाव चि कारण वो ॥५॥
अर्थ :- श्रीकृष्णची वाट पाहताना रात्र वाढली. त्याच्या येण्याची वेळ तळून गेली; राधेने दार लाउन घेतले; पण तिचे मन हरिविषयीच्या विचारांने व्यापले होते. निराश होऊन ती अंथरुणावर पडली; परंतु झोप येइना, म्हणून ती सखिला म्हणाली, सखे, आज हा श्रीकृष्ण कोण भाग्यवंतीच्या हाती लागला असेल बरे? आज माझी शय्या पतिविन शून्य आहे ।।1।।
राधा सखिला सांगत आहे, श्रीकृष्ण माझ्याशी कापटाने वागतो. वरवर तो फार कोमल दिसतो; अंतर्मनि निर्गुण, निष्ठुर आहे. मी त्याच्याशी बोलणार नाही. तो किती नाटकि आहे, ते आता मला पूर्णपणे काळाले आहे ।।ध्रु।।
द्वाराकेमध्ये मारुतिराया आले. त्याना रामरूपात श्रीकृष्णचे दर्शन हवे होते म्हणून श्रीहरिणे रामरूप घेतले आणि सितेच्या भूमिकेसाठी सत्यभामेला सांगितले. ती लज्जित झाली. सितेचे रूप तिला घेता येइना. तेव्हा रुक्मिणी सीता झाली ।।2।।
सत्यभामेने पतीला दीर्घायुष्य , आरोग्य, संपत्ति, यश मिळावे म्हणून नाराडाला श्रीहरिचे दान केले. त्या वेळी ह्रषिकेशी कसा आहे, हे मला समजले. श्रीकृष्णचि सुवर्ण तुला करण्याच्या वेळी सत्यभामेनि स्यमंतक मण्याकरवि सोन्याच्या राशि प्राप्त केल्या आणि पार्ड्यात टाकल्या; तरीही तुला होईना. रुकमिनीने एक तुळशीपत्रक पारडयात टाकले व लगेच पारडे समपातळीत आले ।।3।।
दुर्वासादि वृषिसाठी भोजन नेताना सर्वांचा भोग नेवून मी 'ब्रह्मचारी' असे श्रीकृष्ण म्हणाला. त्याचा माला कसा बारे विचार पडला? एकदा यमुनेच्या पैलतीरावर जायचे होते; परंतु खुप पुर आला. तेव्हा आम्हा सर्व गोपिकांच्या बरोबर श्रीकृष्ण होता. तो म्हणाला, मी खरच निष्ठीक ब्रह्मच्यारी असेन, तर यमुना मला पैलतिरि जायल वाट तयार करुण देईल, आणि खरोखर यमुनेने वाट तयार करुण दिली. तुमच्याआमच्यासारख्याना ही गोश्त कळत नाही ।।4।।
तुकाराम महाराज म्हणतात, हां नारायण सर्वांच्या अंतरिच्या ईच्या जाणतो. तो सर्वत्र व्यापूण उरलेला आहे. मात्र मायेच्या आवरणात लपून बसलेला असाल्यांमुळे दृष्टिस् पडत नाही. राधा सखिशी सव्वाद करत होती त्या वेळी कृष्ण प्रकट झाले व तिचे मन त्याने शांत केले. तुकाराम महाराज म्हणतात, श्रीहरिच्या प्राप्तिसाठी ऐसा भाव पाहिजे ।।5।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा