गाथा अभंग ३४८
याजसाठीं भक्ति । जगीं रूढवावया ख्याति ॥१॥
नाहीं तरी कोठें दुजें । आहे बोलाया सहजें ॥ध्रु.॥
गौरव यासाटीं । स्वामिसेवेची कसोटी ॥२॥
तुका म्हणे अळंकारा । देवभक्त लोकीं खरा ॥३॥
अर्थ :- या जगातील सामान्य जीवांना तारण्यासाठी साधा-सोपा भक्तिमार्ग वृढ करणगाची गरज आहे ।।1।।
नाहीतर या जगामध्ये एका विठ्ठला शिवाय दूसरे दैवत कोठे आहे ? ।।ध्रु।।
या साध्या सोप्या भक्तीच्या किर्तीसाठी स्वामीसेवेचि कसोटी आहे ।।2।।
तुकोबा म्हणतात, असा देवभक्त हा समाजातील एक खरा अलंकार आहे ।।3।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा