मंगळवार, २६ जानेवारी, २०१६

३५२गर्भाचें धारण । तिनें वागविला सिण

गाथा अभंग ३५२

गर्भाचें धारण । तिनें वागविला सिण ॥१॥

व्याली कुर्हा डीचा दांडा । वर न घली च तोंडा ॥ध्रु.॥

उपजला काळ । कुळा लाविला विटाळ ॥२॥

तुका म्हणे जाय । नरका अभक्ताची माय ॥३॥

अर्थ :- नास्तिकाचा गर्भ धारण करून त्याच्या मातेने निष्कारन कष्ट केले ।।1।।

तिने जणू काही कुर्हाडीच्या दंडयाला जन्म दिला आहे, जन्मल्या बरोबर तिने त्याला मारून का टाकले नाही? ।।ध्रु।।

तिच्या पोटी जणूकाही काळ जन्माला आला आहे आणि त्याने कुळाला बट्टा लावला आहे ।।2।।

तुकोबा म्हणतात, अश्या अभक्ताची आई नरकात जाते ।।3।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा