मृदंग पाट्या
गाथा अभंग ४१०
आणीक काय थोडीं । परि तें फार खोटीं कुडीं ॥१॥
सदा मोकळीं च गुरें । होती फजीत तीं पोरें ॥ध्रु.॥
सदा घालिता हुंबरी । एक एकांचे न करी ॥२॥
तुका म्हणे घरीं माय । वेळोवेळां मारी ॥३॥
अर्थ :- जगात इतर गौळयांची मुले काय थोड़ी आहे का ? परंतु ती खोट्या, वाइट बुद्धिची आहेत ।।1।।
त्यांची इंद्रियरूपी गुरे नेहमीच मोकाट असतात; त्यामुळे सतत फजीती होते ।।ध्रु।।
त्यांच्यात नेहमीच तंटे-वाद होतात. कोणीही कोणाचे एकत नाही. ती काम करीत नाहीत ।।2।।
तुकाराम महाराज म्हणतात, त्यांची घरी असलेली मायारुपी आई त्यांना नेहमी नाराते ।।3।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा