गाथा अभंग ३३७
आसुरी स्वभाव निर्दय अंतर । मानसीं निष्ठ अतिवादी ॥१॥
याति कुळ येथें असे अप्रमाण । गुणाचें कारण असे अंगीं ॥ध्रु.॥
काळकुट पितळ सोनें शुद्ध रंग । अंगाचेंच अंग साक्ष देतें ॥२॥
तुका म्हणे बरी जातीसवें भेटी । नवनीत पोटीं सांटविलें ॥३॥
अर्थ :- एखादा मनुष्य राक्षसी स्वभावाचा, निर्दयी असा आहे ।।1।।
तो किती श्रेष्ट, उच्च कुलातील असाला तरी व्यर्थ! कारण कुलापेक्षा गुणांना ज्यास्त महत्त्व आहे ।ध्रु।।
पीतल आणि सोने पिवळ्या रंगाचे असले तरी पितळाला डांग पडतात, सोन्याला नाही, त्याच्या अंगाचे गुणच येथे श्रेष्ट ठरतात ।।2।।
तुकोबा म्हणतात, ज्याने भक्तीचे नवनीत साथविले आहे, तो श्रेष्ट, उच्च जातिकुळातील माणवा, त्याची भेट घ्यावी ।।3।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा