पांगुळ
गाथा अभंग ४२३
पांगुळ जालों देवा नाहीं हात ना पाय । बैसलों जयावरी सैराट तें जाय ।
खेटितां कुंप कांटी । खुंट दरडी न पाहे । आधार नाहीं मज कोणी । बाप ना माये ॥१॥
दाते हो दान करा । जातें पंढरपुरा । न्या मज तेथवरी । अखमाचा सोयरा ॥ध्रु.॥
हिंडतां गव्हानें गा । शिणलों दारोदारीं । न मिळे चि दाता कोणी । जन्मदुःखातें वारी ।
कीर्ति हे संतां मुखीं । तो चि दाखवा हरी । पांगळां पाय देतो । नांदे पंढरपुरीं ॥२॥
या पोटाकारणें गा । जालों पांगीला जना । न सरे चि बापमाय । भीक नाहीं खंडणा ।
पुढारा म्हणती एक । तया नाहीं करुणा । श्वान हें लागे पाठीं । आशा बहु दारुणा ॥३॥
काय मी चुकलों गा । मागें नेणवे कांहीं । न कळे चि पाप पुण्य । तेथें आठव नाहीं ।
मी माजी भुललों गा । दीप पतंगासोयी । द्या मज जीवदान । संत महानुभाव कांहीं ॥४॥
दुरोनि आलों मी गा । दुःख जालें दारुण । यावया येथवरी होतें । हें चि कारण ।
दुर्लभ भेटी तुम्हां । पायीं जालें दरुषन । विनवितो तुका संतां । दोन्ही कर जोडून ॥५॥
अर्थ :- देवा, मी पांगळा झालो आहे. माला हातपाय नाहीत. ज्यावर मी विसंगुण आहे ते मन सैरावैरा धावत आहे. कुंपनाला, काटयाला खेटत आहे. खूंट-दरडी यांचाही विचार ते करीत नाही. त्या परिस्तितित माला कोणाचाच आधार नाही ।।1।।
पंधारीला जाणाऱ्या दात्यांनो, संतांनो, माला मदत करा. माला पंधारीला न्या. हो! तुम्ही आणि पुंडलिक आंधळ्या-पांगळ्या लोकांचे सोयरे आहेत ।।ध्रु।।
प्रपंचाच्या हातात एरझार व्हालुन, हिंडून मी शिनून गेलो आहे. जन्माचे दुःख निवारनारा कोन्हि डाटा आजपर्यंत माला भेटला नाही. संत ज्यांचे गुण गातात तो हरी माला भेटावा. पंगुला पाय देणारा देव पंढरित राहत आहे ।।2।।
पोटासाठी मी लोकाधीन बनालो आहे. प्रत्येकाला मायबाप म्हणावे लागते. माझे भिक मागने संपत नाही. पुढारी म्हणावणाऱ्या कित्येक लोकांना माझी दया येत नाही. आशारूपि मोठे कुत्रे माझ्यापाठी लागले आहे ।।3।।
संतम्हणतांनी आता माला जीवदान द्यावे. पतंग ज्या प्रमाणे दिव्यावर पडतो, तासा मी देहादि उपाधिनमध्ये गुंतून पडलो आहे ।।4।।
तुकोबा म्हणतात, संतजनाहो, दोन हात जोडून , जन्मापासून भटकत भटकत मी तुमच्या पर्यंत येवून पोहचलो आहे . माला फार दुःख झाले आहे. तुमची भेट दुर्लभ आहे; पण आज तुमचे दर्शन झाले आहे. इथवर एण्याचे हेच कारण होते. दोन्ही हात जोडून माझी तुम्हाला विनंती आहे, की माला पांडुरंगाचे दर्शन घडवा ।।5।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा