गुरुवार, २८ जानेवारी, २०१६

३८३भलो नंदाजीको डिकरो

गौळणी

गाथा अभंग ३८३

भलो नंदाजीको डिकरो । लाज राखीलीन हमारो ॥१॥

आगळ आवो देवजी कान्हा । मैं घरछोडी आहे म्हांना ॥ध्रु.॥

उन्हसुं कळना वेतो भला । खसम अहंकार दादुला ॥२॥

तुका प्रभु परवली हरी । छपी आहे हुं जगाथी न्यारी ॥३॥

अर्थ :- नंदराज्याचा पुत्र फार चांगला आहे. त्याने आमची लाज राखलि ।।1।।

कृष्ण देवा, तुम्ही अलीकडे या तुमच्या साथी मूळ वस्तिस्तान सोडून देहरूपी आरण्यात आले आहे ।।ध्रु।।

शपतेवर सांगते, माझा अहंकाररूपी नवरा फार दृष्ट आहे. मी इकडे आल्याचे त्याला काळाले नाही तर फार बारे होईल ।।2।।

मी तुमच्या आड़ लपून जगापासून अलग झाले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हरी माझा स्वामी सर्वान् पेक्षा बलवान आहे ।।3।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा