शनिवार, २८ डिसेंबर, २०१९

४७१ पुरविले आळी

४७१ पुरविले आळी

पुरविली आळी । जे जे केली ते ते काळीं ॥१॥

माय तरी ऐसी सांगा । कृपाळुवा पांडुरंगा ॥ध्रु.॥

घेतलें नुतरी । उचलोनि कडियेवरी ॥२॥

तुका म्हणे घांस । मुखीं घाली ब्रम्हरस ॥३॥


अर्थ :- पांडुरंगा आम्ही बालकांनी केलेले हट्ट तू वेळोवेळी पुरविले ll१ll

माझ्या विठाई सारखी आई दुसरी कीं आहे, सांगा llध्रुll 

एकदा कडेवर उचलून घेतल्यावर , स्वीकार केल्यावर ती पुन्हा कडेवरून (आम्हाला) खाली उतरवत नाही. त्याग करीत नाही ll २ll

तुकाराम महाराज म्हणतात , माझी माऊली मला ब्रह्मरासाचा घास भरवते  ll३ll

शनिवार, २२ एप्रिल, २०१७

४७०तुझें दास्य करूं आणिका मागों खावया

शेजारतीचे अभंग

गाथा अभंग ४७०

तुझें दास्य करूं आणिका मागों खावया । धिग् जालें जिणें माझें पंढरीराया ॥१॥

काय गा विठोबा तुज म्हणावें । थोराच्या दैवें गोड शुभअशुभ ॥ध्रु.॥

संसाराचा धाक निरंतर आम्हांसी । मरण भलें परि काय अवकळा तैसी ॥२॥

तुझे शरणागत शरण जाऊं आणिकांसी । तुका म्हणे कवणा लाज हें कां नेणसी ॥३॥

 

अर्थ :- हे पंढरीराया, तुझे आम्ही दास व्हावे व पोटासाठी दुसर्याच्या तोंडाकडे पाहावे ? धिक्कार असो या अश्या जगण्याचा! ॥१॥

 

हे विठ्ठला, तुला आता काय म्हणावे बरे ? तुम्हा थोरामोठ्यांच्या दैवाने अशुभाही शुभ होते. (मग आमच्याच बाबतीत असे का?) ॥ध्रु.॥

 

प्रपंच्याचा धाक नेहमीचा आमच्या मागे लागला आहे. अशी अवकळा येण्यापेक्षा मरण आलेले बरे ! ॥२॥

 

तुकाराम महाराज म्हणतात, देवा आम्ही तुला शरण आलो आहेत. इतरांचे शरणागत प्रसंग आल्यास त्याची लाज कोणाला आहे, हे तुम्ही जाणत नाही काय ? ॥३॥

४६९वाट पाहें बाहे निडळीं ठेवुनियां हात

शेजारातीचे अभंग

गाथा अभंग ४६९

वाट पाहें बाहे निडळीं ठेवुनियां हात । पंढरीचे वाटे दृष्टी लागलें चित्त ॥१॥

कई येतां देखें माझा मायबाप । घटिका बोटें दिवस लेखीं धरूनियां माप ॥ध्रु.॥

डावा डोळा लवे उजवी स्फुरते बाहे । मन उतावळि भाव सांडुनियां देहे ॥२॥

सुखसेजे गोडचित्तीं न लगे आणीक । नाठवे घर दार तान पळाली भूक ॥३॥

तुका म्हणे धन्य दिवस ऐसा तो कोण । पंढरीचे वाटे येतां मूळ देखेन ॥४॥
 

अर्थ :- मस्तकाला हाथ लाऊन मी विठ्ठलाची वाट पाहत आहे. माझी नजर आमी मन पूर्णपणे पंढरीच्या वाटेला लागले आहे ॥१॥

 

माझा मायबाप माझ्याकडे  येत असलेला कधी एकदा पाहतो, असे मला झाले आहे. दिवस, घटका चालल्या आहेत. मी बोटावर त्याची मोजणी करीत आहे ॥ध्रु.॥

 

दावा डोळा लावतो आहे, उजवा बाहू स्पुरून पाहतो आहे. देहभाव विसरून माझे मन उतावीळ झाले आहे ॥२॥

 

सुखाच्या अंथरुणावर अंग टाकले असता मन सुखावतनाही. घरदार नकोसे वाटत आहे. तहान-भूक हरपली आहे ॥३॥

 

तुकाराम महाराज म्हणतात, माला नेण्यासाठी पंढरीच्या वाटेवरून येणारे मूळ माझे आई बाप (विठ्ठल) कधी पाहीन? असा धान्य दिवस कधी उगवेल ? ॥४॥

४६८तुम्ही तरी सांगा कांहीं

शेजारातीचे अभंग

गाथा अभंग ४६८

तुम्ही तरी सांगा कांहीं । आम्हांविशीं रखुमाबाई ॥१॥

कांहीं उरलें तें ठायीं । वेगीं पाठवुनी देई ॥ध्रु.॥

टोकत बैसलों देखा । इच्छीतसें ग्रासा एका ॥२॥

प्रेम देउनि बहुडा जाला । तुका म्हणे विठ्ठल बोला ॥३॥
 

अर्थ :- हे रखुमाई, तुम्ही विठ्ठलाला आमच्या संधार्भात काहीतरी सांगा ॥१॥

 

जे काही उषाठांना त्यांच्याकडे उरले असेल तर ते तात्काळ आम्हाला द्यावे, असे सांगा ॥ध्रु.॥

 

एकतरी घास मिळावा अशी अपेक्षा धरून मी बसलो आहे ॥२॥

 

तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही विनंती केल्याबरोबर रुक्मिमी मातेने आम्हाला ब्रह्मरसाचे रुचक भोजन दिले. आता फक्त ‘विट्ठल-विट्ठल’ म्हणू ॥३॥

४६७आजी दिवस जाला

शेजारातीचे अभंग

गाथा अभंग ४६७

आजी दिवस जाला । धन्य सोनियाचा भला ॥१॥

जालें संताचे पंगती । बरवें भोजन निगुती ॥ध्रु.॥

रामकृष्णनामें । बरवीं मोहियेलीं प्रेमें ॥२॥

तुका म्हणे आला । चवी रसाळ हा काला ॥३॥
 

अर्थ :- आजचा दिवस सोन्याचा, उत्तम आहे. धान्य आहे ॥१॥

 

संतसज्जनांच्या सहवासात उत्तम, व्यवस्तीत ब्रह्मरसाचे भोजन झाले ॥ध्रु.॥

 

रामकृष्ण नामाच्या प्रेमामुळे भोजनातही प्रत्येक पदार्थ स्निग्ध आणि मधुर झाला होता ॥२॥

 

तुकाराम महाराज म्हणतात, हा अभेदरुपी काला अत्यंत रसाळ व मधुर झाला होता ॥३॥

४६६अनंत जुगाचा देव्हारा

वाघा - अभंग १

४६६

अनंत जुगाचा देव्हारा । निजबोधांचा घुमारा । अवचिता भरला वारा । या मल्लारी देवाचा ॥१॥

शुद्धसत्वाचा कवडा मोठा । बोधबिरडें बांधला गांठा । गळां वैराग्याचा पट्टा । वाटा दावूं या भक्तिच्या ॥२॥

हृदय कोटंबा सांगातें । घोळ वाजवूं अनुहातें । ज्ञानभांडाराचें पोतें । रितें नव्हे कल्पांतीं ॥३॥

लक्ष चौर्यां शी घरें चारी । या जन्माची केली वारी । प्रसन्न जाला देव मल्लारी । सोहंभावीं राहिलों ॥४॥

या देवाचें भरतां वारें । अंगीं प्रेमाचें फेंपरें। गुरुगुरु करी वेडे चारें । पाहा तुकें भुंकविलें ॥५॥

अर्थ :- वाघ्या म्हणतो, आपले मन म्हणेजे युगा युगांचे देव्हारे असून त्यात आत्मज्ञानाचा संचार झाला आहे आणि मल्हारी देवाचे वारे अवचितपणे या देव्हाऱ्यात शिरत आहे ॥१॥

 

शुद्ध सात्विक तत्वाची कवड्याची माळ घालून, गाठीला बोधाचे, ज्ञानाचे बिरडे बांधून, गळ्यात वैराग्याचा पट्टा बांधन भक्तीच्या संपूर्ण वाटा जगाला दाखून देऊ ॥ध्रु.॥

 

लाकडी भिक्षापात्र म्हणजे मन किंवा ह्र्दय असून अनुहाताच्या संगतीने घोळ वाजवून, आमच्या जवळचे ज्ञान भांदार्यासारखे पोत्यात उधळले तरी ते शेवट पर्यंत पूर्ण रिकामे होत नाही ॥२॥

 

या संपूर्ण आयुशातच लक्ष चुर्यांऐशीची वारी पूर्ण केल्यानंतर मल्हारी देव प्रसन्न झाला आहे ॥३॥

 

अहंकार फक्त राहिला. या देवाचे भक्तीचे वारे अंगात भरले, देवाच्या भक्तीच्या लाटा अंगात भरल्या कि प्रेमाचे उमाळे आपोआप येतात. आनंदून मन वेडेपिसे होते ॥४॥

४६५जन्मा आलिया गेलिया परी

४६५

जन्मा आलिया गेलिया परी । भक्ति नाहीं केली ।

माझें माझें म्हणोनियां । गुंतगुंतों मेलीं ॥१॥

येथें कांहीं नाहीं । लव गुरूच्या पायीं । चाल रांडें टाकी रुका ।

नकों करूं बोल । गुरुविण मार्ग नाहीं । करिसी तें फोल ॥२॥

खाउनी जेउनि लेउनि नेसुनि । म्हणती आम्ही बर्याे । साधु संत घरा आल्या । होती पाठमोर्या ॥३॥

वाचोनि पढोनि जाले शाहणे । म्हणती आम्ही संत । परनारी देखोनि त्यांचें । चंचळ जालें चित्त ॥४॥

टिळा टोपी घालुनि माळा । म्हणती आम्ही साधु । दयाधर्म चित्तीं नाहीं । ते जाणावे भोंदु ॥५॥

कलियुगीं घरोघरीं । संत जाले फार । वीतिभरी पोटासाठीं । हिंडती दारोदार ॥६॥

संत म्हणती केली निंदा । निंदा नव्हे भाई । तुका असे अनन्यें भावें शरण संतां पायीं ॥७॥

अर्थ :- फिरून फिरून मनुष्यधर्म लाभला: पण एकाही जन्मात तुझी भक्ती नाही केली, चांगला गुरु केला नाही. त्यामुळे परमेश्वर प्राप्तीचा योग्य मार्ग सापडला नाही. उलट हे माझे, ते माझे अशा हव्यासात जीवन कधी संपले, ते कळालेच नाही. जेऊन-खाऊन, वस्त्रलांकार घालून सुगृहीनिप्रमाने बसलेल्या, पण साधू-संत आल्यावर निघून जाणार्या वेश्याप्रमाने किवा मनामध्ये दयाधर्म नसनार्या, पण वाराकार्याचा वेश घालणार्या भोन्दुप्रमाने यांची स्तीती झाली आहे. असे भोंदू संत येऊन दारोदार फिरतात; पण जे अंतर्बाह्य संत-सज्जन आहेत, त्यांना मात्र मी अनन्यभावाने शरण जातो ॥१ते७॥