सीताशोक
गाथा अभंग ३३९
अशोकाच्या वनीं सीता शोक करी । कां हों अंतरले रघुनाथ दुरी ।
येउनि गुंफेमाजी दुष्टें केली चोरी । कांहो मज आणिले अवघड लंकापुरी ॥१॥
सांगा वो त्रीजटे सखिये ऐसी मात । देईल कां नेदी भेटी रघुनाथ ।
मन उतावळि जाला दुरी पंथ । राहों न सके प्राण माझा कुडी आंत ॥ध्रु.॥
काय दुष्ट आचरण होतें म्यां केलें । तीर्थ व्रत होतें कवणाचें भंगीलें ।
गाईवत्सा पत्नीपुरुषा विघडिलें । न कळे वो संचित चरण अंतरले ॥२॥
नाडियेलें आशा मृगकांतिसोने । धाडिलें रघुनाथा पाठिलागे तेणें ।
उलंघिली आज्ञा माव काय मी जाणें । देखुनी सूनाट घेउनि आलें सुनें ॥३॥
नाहीं मूळ मारग लाग अणीक सोये । एकाविण नामें रघुनाथाच्या माये ।
उपटी पक्षिया एक देउनि पाये । उदकवेढ्यामध्यें तेथें चाले काये ॥४॥
जनकाची नंदिनी दुःखें ग्लानी थोरी । चुकली कुरंगिणी मेळा तैशा परी ।
संमोखी त्रीजटा स्थिर स्थिर वो करी । घेइल तुकयास्वामी राम लंकापुरी ॥५॥
अर्थ :- लंकेशया अशोकाच्या वनात सीता शोक करत होती. ती त्रिजतेला म्हणाली, रघुनाथ, मला येथे टाकून दूर का गेले ? गुहेत येऊन दृष्ट रावनाने माला चोरून आणून या लंकापुरित का आडवळनावर आणले ? ।।1।।
'हे सखी त्रिजटे, रघुनाथ मला भेटतील की नाही, ते सांग. मी त्यांच्यापासून फार दूर आहे, त्यामुळे त्याना भेटन्यासाठी मन आतुर झाले आहे. त्यांच्या वियोगाने माझ्या शरीरात आता प्राणही राहु शकत नाही ।।ध्रु।।
मी असे कोणते दृष्ट आचरण केले ? कोणत्या तीर्थ वृतांचा-भंग केला? गाय-वत्स, पती-पत्नी यांची ताटातूट केलि का? अशी कोणती गोष्ट केली, की ज्यामुळे रागुनाथाचे चरण मला अंतरले, माझ्या नशिबात काय आहे, काही कळत नाही ।।2।।
सुवर्णमृगाच्या कांतिने मला आकर्षित काले व मी फसले. रघुनाथाला त्याच्या माघे पाठविले . लक्ष्मण रेशा ओलांडून , लक्षमनाची आज्ञा मोडली. राक्षसाची फसवाफसव मी कशी जाननार? मोकळे घर पाहुन रावण नामक कुत्र्याने मला इथे आणले ।।3।।
हे त्रिजटे, रघुनाथाच्या नामाशिवाय दूसरे मार्ग , दूसरी सोय माल राहिली नाही. जटायू माझी सुटका करण्यासाठी आला. रावनाने त्याचे पंख आपले. पाण्याच्या वेडयात अडकल्याने त्याचे काही चालले नाही ।।4।।
तुकाराम माहाराज म्हणतात, दुःखामुळे सितेला ग्लानि आली . हरिणी आणि पाडस यांची ताटातुट व्हावी , अशी तीची अवस्ता झाली. त्रिजटा तिला धीर देवून शांत करत होती. भक्तांचा स्वामी प्रभु श्रीरामचंद्र आता लंकापुरिस येवून लंका जाळून घेईल ।।5।।
हाच खरा सीताशोक......
उत्तर द्याहटवा