गाथा अभंग ३३५
पूजा समाधानें । अतिशयें वाढे सीण ॥१॥
हें तों जाणां तुम्ही संत । आहे बोलिली ते नीत ॥ध्रु.॥
पाहिजे तें केलें । सहज प्रसंगीं घडलें ॥२॥
तुका म्हणे माथा । पायीं ठेवीं तुम्हां संतां ॥३॥
अर्थ :- साधुची वृत्ति समाधानी असली पाहिजे अन्यथा अन्य जनांकडून अपमान होतो ।।1।।
हे संतसज्जनहो, तुम्हीही अशीच वृत्ति ठेवा. नितिन वागणे हेच साधुत्व आहे ।।ध्रु।।
परमार्थ तुम्ही सहजपणे केला पाहिजे ।।2।।
तुकोबा म्हणतात, अश्या नीतिमान संतांच्या पायांवर मी माझा माथा ठेवतो ।।3।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा