सोमवार, ७ डिसेंबर, २०१५

३२६पुण्यवंत व्हावें । घेतां सज्जनांची नांवें

गाथा अभंग ३२६

पुण्यवंत व्हावें । घेतां सज्जनांची नांवें ॥१॥

नेघे माझे वाचे तुटी । महा लाभ फुकासाठी ॥ध्रु.॥

विश्रांतीचा ठाव । पायीं संतांचिया भाव ॥२॥

तुका म्हणे जपें । संतांचिया जाती पापें ॥३॥

अर्थ :- संतसज्जनांची फक्त नावे उच्चारल्याने पुण्यसंचय होतो ।।1।।

त्यामुळे माझी वाणी पुण्यसंचय करुण घेणार आहे, हां लाभ दवडण्यास ती तयारी नाही ।।ध्रु।।

संतचरणाजवळ जीवाला विसावा मिळतो ।।2।।

तुकोबा म्हणतात, अश्या प्रकारचे संतांच्या नामस्मरामुळे पाप नाहीसे होते ।।3।।

३२५गहूं एकजाती । परी त्या पाधाणी नासिती

गाथा अभंग ३२५

गहूं एकजाती । परी त्या पाधाणी नासिती ॥१॥

वर्म जाणावें तें सार । कोठें काय थोडें फार ॥ध्रु.॥

कमाईच्या सारें । जाति दाविती प्रकार ॥२॥

तुका म्हणे मोल । गुणा मिथ्या फिके बोल ॥३॥

अर्थ :- गवहाचे अनेक खाद्य प्रकार तयार करता येतात ।।1।।

स्वयंपाक करणारी जर सुगरण नसेल तर ती गव्हाचा नास करेल ।।ध्रु।।

म्हणून ज्या ज्या पदार्थाचे गुणधर्म ओळखून कुशलतेने त्याचा उपयोग करून घ्यावा ।।2।।

तुकोबा म्हणतात, की प्रत्येकातील गुणाला महत्त्व दिल पाहिजे, तेथे नुसती बड़बड़ उपयोगाची नाही ।।3।।