४७१ पुरविले आळी
पुरविली आळी । जे जे केली ते ते काळीं ॥१॥
माय तरी ऐसी सांगा । कृपाळुवा पांडुरंगा ॥ध्रु.॥
घेतलें नुतरी । उचलोनि कडियेवरी ॥२॥
तुका म्हणे घांस । मुखीं घाली ब्रम्हरस ॥३॥
अर्थ :- पांडुरंगा आम्ही बालकांनी केलेले हट्ट तू वेळोवेळी पुरविले ll१ll
माझ्या विठाई सारखी आई दुसरी कीं आहे, सांगा llध्रुll
एकदा कडेवर उचलून घेतल्यावर , स्वीकार केल्यावर ती पुन्हा कडेवरून (आम्हाला) खाली उतरवत नाही. त्याग करीत नाही ll २ll
तुकाराम महाराज म्हणतात , माझी माऊली मला ब्रह्मरासाचा घास भरवते ll३ll