४७१ पुरविले आळी
पुरविली आळी । जे जे केली ते ते काळीं ॥१॥
माय तरी ऐसी सांगा । कृपाळुवा पांडुरंगा ॥ध्रु.॥
घेतलें नुतरी । उचलोनि कडियेवरी ॥२॥
तुका म्हणे घांस । मुखीं घाली ब्रम्हरस ॥३॥
अर्थ :- पांडुरंगा आम्ही बालकांनी केलेले हट्ट तू वेळोवेळी पुरविले ll१ll
माझ्या विठाई सारखी आई दुसरी कीं आहे, सांगा llध्रुll
एकदा कडेवर उचलून घेतल्यावर , स्वीकार केल्यावर ती पुन्हा कडेवरून (आम्हाला) खाली उतरवत नाही. त्याग करीत नाही ll २ll
तुकाराम महाराज म्हणतात , माझी माऊली मला ब्रह्मरासाचा घास भरवते ll३ll
व्वा छानं, स्तुत्य आहे.... जसंतु तुकोबारायांचा अभंग.. योगाची धारणा नाही प्राणायम, सांडी यम नेम नित्यादिक... जसंतु बद्दलची उदासीनता कमी झाली पाहिजे, प्रत्येकानी तुकोबारायाचा फोटो घरी लावायला पाहिजे... जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय
उत्तर द्याहटवा