गुरुवार, २० ऑगस्ट, २०१५

१०७ माकडें मुठीं धरिलें फुटाणे । गुंतले ते नेणे हात तेथें

अभंग १०७

माकडें मुठीं धरिलें फुटाणे । गुंतले ते नेणे हात तेथें ॥१॥

काय तो तयाचा लेखावा अन्याय । हित नेणे काय आपुलें तें ॥ध्रु.॥

शुकें नळिकेशीं गोवियेले पाय । विसरोनि जाय पक्ष दोन्ही ॥२॥

तुका म्हणे एक ऐसे पशुजीव । न चले उपाव कांहीं तेथें ॥३॥

अर्थ :- एका माणसाने माकडाल पकडण्यासाठी अरुंद तोंडाच्या भांड्यात फुटाने ठेवले, माकड़ाने हॉट घालून फुटांयाची मुठ भरली, त्यामुळे मुठ बाहेर निघेणा ।।1।।

मुठ सोडून हात बाहर काढवा, हे त्या मकडाला सुचले नाही ।।ध्रु।।

पाराध्याने लावलेल्या नळितील खाद्य खान्यासाथी पोपट नळिवर बसतो, नळि उलटी फिरते, पॉपटही उलटा होतो, आपण पडू, या भीतीने तो तसाच बसून राहतो ।।2।।

जे लोक पशुपक्षांप्रमाने असतात, त्यांच्यापुढे काही उपाय नसतो ।।3।।
.

१०६बोललों तें कांहीं तुमचिया हिता

अभंग १०६

बोललों तें कांहीं तुमचिया हिता । वचन नेणतां क्षमा कीजे ॥१॥

वाट दावी तया न लगे रुसावें । अतित्याई जीवें नाश पावे ॥ध्रु.॥

निंब दिला रोग तुटाया अंतरीं । पोभाळितां वरि आंत चरे ॥२॥

तुका म्हणे हित देखण्यासि कळे । पडती आंधळे कूपा माजी ॥३॥

अर्थ :- मी तुम्हाला तुमच्या हिताची काही सांगतांना अधिक-उणे बोललो असेल तर तुम्ही मला क्षमा करा ।।1।।

जो योग्य मार्ग दाखवितो तो काही अधिक बोलला तर त्याच्यावर रुसु नये; नाहीतर आपलेच नुक्सान होते।।ध्रु।।

वैद्याने पोटशूलावर कडूनिंबाचा रस दिला, तर तो पोटात न घेता पाटा  वर चोळला तर रोग बरा होणार नाही ।।2।।

तुकोबा म्हणतात, डोळस मनाच्या माणसाला आपले हित कळते, मुर्ख मात्र संकताच्या गर्तेत कोसळतात ।।3।।

१०५शुकसनकादिकीं उभारिला बाहो

गाथा अभंग १०५

शुकसनकादिकीं उभारिला बाहो । परिक्षितीला हो दिसां सातां ॥१॥

उठाउठी करी स्मरणाचा धांवा । धरवत देवा नाहीं धीर ॥ध्रु.॥

त्वरा जाली गरुड टाकियेला मागें । द्रौपदीच्या लागें नारायणें ॥२॥

तुका म्हणे करी बहु च तांतडी । प्रेमाची आवडी लोभ फार ॥३॥

अर्थ :- शुक-सनकादिक वृषिणी तपस्या केलि, पण परिक्षितिला मात्र त्याच्या साधनेमुळे सात दिवसांत भेट दिली ।।1।।

तसे तुम्ही उठता-बसता हरिनाम स्मरण करा, मग डी3वालाहै तुमच्या भेटिसाठी धीर धरणार नाही ।।ध्रु।।

द्रोपदीच्या आर्त मनाने केलेला धावा एकूण गरुङ्गति मंद आहे, हे जानवल्यावर श्रीकृष्ण स्वतः धावत आले ।।2।।

तुकोबा म्हणतात, आपल्यावर नीतांत प्रेम करणाऱ्या भक्ताला भेटन्याची आतुरता देवाला लागलेली आहे ।।3।।

१०४देती घेती परज गेली । घर खालीं करूनियां

जोहार अभंग 02

गाथा अभंग१०४

देती घेती परज गेली । घर खालीं करूनियां ॥१॥

धांवणियाचे न पडे हातीं । खादली राती काळोखी ॥ध्रु.॥

वघियांचे अवघें नेलें । काहीं ठेविलें नाहीं मागें ॥२॥

सोंग संपादुनि दाविला भाव । गेला आधीं माव वरि होती ॥३॥

घराकडे पाहूं नयेसें जालें । अमानत केलें दिवाणांत ॥४॥

आतां तुका कोणा न लगे चि हातीं । जाली ते निश्चिती बोलों नये ॥५॥

अर्थ :- जी देती-घती होती, ती घर खली करून निघुन गेली ।।1।।

अज्ञानरूपी अंधाराची रात्र सरली. आता माझ्या माघे धवत येणाऱ्या काळाच्या हाती मी पडणार नाही ।।ध्रु।।

त्याने सर्वाच सर्वकाही नेले, काहीही मागे ठेवले नाही ।।2।।

सांग संपादन करून जो मायेचा देखावा होता , तो गेला ।।3।।

पुन्हा वळून घराकडे पाहू नये, असे झाले आहे ।।4।।

तुकाराम महाराज म्हणतात, त्याविषयी मी निच्छित झालो आहे. या अवस्तेचे वर्णनहि करता येत नाही ।।5।।

१०३येऊं द्या जी कांहीं वेसकरास

१०३

येऊं द्या जी कांहीं वेसकरास । आंतून बाहेर वोजेचा घास ॥१॥

जों यावें तों हात चि रिता नाहीं । कधीं तरीं कांहीं द्यावें घ्यावें ॥२॥

तुका म्हणे उद्यां लावीन म्हनेरा । जे हे दारोदारांभोंवतीं फिरा ॥३॥

अर्थ :- यमाचा एक प्रेषित वेसकराच्या रूपाने, कधीही दानधर्म न करणाऱ्या, हरिनाम न घेणाऱ्या, सदैव संसारात आसक्त असणाऱ्या मांणसास उपदेश करतो. 'अहो, मायबापहो, वेसकरासाठी कही पक्कन्नाचा, हरिनामाचा, दांधर्मचा घास अपल्याघरातून बाहर येउ द्या ।।1।।

मी जेव्हा-जेव्हा येथे येतो, तेव्हा-तेव्हा (तुम्ही काहीतरी कामत व्यग्र असतात); तुमचा हात रिकामा नासतोच, कधीतरी काहीतरी द्यावे, घ्यावे हे चांगले असते ।।ध्रु।।

तुकाराम महाराज म्हणतात, तुमच्या देहरूपी गावाचा मनरूपी दरवाजा मी उद्या बंद करिन. मग तुम्ही पशु-पक्षाच्या देहाच्या दारासभोति फिरत राहल (जन्ममृत्युच्या फेऱ्यात फिरत राहल ) मायबापा ! ।।2।।

१०२मायबाप जोहार । सारा साधावया आलों

जोहार - अभंग ३

गाथा अभंग १०२

मायबाप जोहार । सारा साधावया आलों वेसकर ॥१॥

मागील पुढील करा झाडा । नाहीं तरी खोडा घालिती जी ॥ध्रु.॥

फांकुं नका रुजू जालिया वांचून । सांगा जी कोण घरीं तीं धण्या ॥२॥

आजि मायबाप करा तडामोडी । उद्यां कोणी घडी राहेना हो ॥३॥

तुका म्हणे कांहीं न चले ते बोली । अखरते सालीं झाडा घेती ॥४॥

अर्थ :-मायबापहो, जोहार करतो. मी आपणास जोहार करतो. तुमच्याकडील कर्म-आकर्मचा सारा मागण्यांसाठी मी सेवक आलो आहे ।।1।।

तुम्हाला नम्र विनंती अशी की, मागील संचित कर्माचा आणि पुढील क्रियमाण कर्माचा प्रमेश्वरासमोर झाड़ा करावा. सारे भगवंतार्पन करावे. स्वत:जवळ काहीही ठेवण्याचा मोह धरु नये; नाहीतर आमचे धनि तुम्हाला जन्ममृतुच्या खोड्यात अडकवतील जी, मायबाप! ।।ध्रु।।

तुम्ही धन्यासमोर हजर न होता इतरत्र पळु नका. हा कर (सारा) भरला नाही तर धनि शिक्षा करतील. आमच्या धन्याचा हात धरु शेकेल ऐसा जगात कोण आहे का सांगा ! ।।2।।

ततरी मयबापहो, आज तुम्ही संचितकर्माचे किडूकमिडूक मोडून तडजोड करावी; कारण उद्या आजचिवेळ राहणार नाही. अखेरीस जर भगवंताचे शरण झाले नाही तर सारा भरन्याचे राहून जाईल आणि खोडा घातल्या जान्याचे चुकनार नाही; म्हणून लगेच सारा भरुन टाका ।।4।।

१०१घरीं रांडा पोरें मरती उपवासीं

अभंग १०१

घरीं रांडा पोरें मरती उपवासीं । सांगे लोकांपासीं थोरपण ॥१॥

नेऊनियां घरा दाखवावें काय । काळतोंडा जाय चुकावूनि ॥२॥

तुका म्हणे आम्ही जाणों त्या प्रमाण । ठकावे हे जन तैसे नहों ॥३॥

अर्थ :- समाज्यात कही लोक असे असतात की, घरात बायका-पोर उपवाशि असतात; पण बाहर मात्र हे श्रीमंतीचा तोरा मिरवत असतात ।।1।।

कुणी खरच त्याच्या घरी येतो म्हंटला तर ते तोड़ चुकवितात ।।ध्रु।।

तुकोबा म्हणतात, अश्या माणसांचा दंभिकपना आम्ही ओळखून आहेत, आम्ही मात्र तसे दांभिक नाही ।।2।।

१०० वक्त्या आधीं मान । गंध अक्षता पूजन

अभंग १००

वक्त्या आधीं मान । गंध अक्षता पूजन । श्रोता यति जाला जाण । तरी त्या नाहीं उचित ॥१॥

शीर सर्वांगा प्रमाण । यथाविधि कर चरण । धर्माचें पाळण । सकळीं सत्य करावें ॥ध्रु.॥

पट्ट पुत्र सांभाळी । पिता त्याची आज्ञा पाळी । प्रमाण सकळीं । ते मर्यादा करावी ॥२॥

वरासनीं पाषाण । तो न मानावा सामान्य । येर उपकरणें । सोनियाचीं परी तीं नीच ॥३॥

सोनियाचा पैंजण । मुगुटमणि केला हीण । जयाचें कारण । तया ठायीं अळंकार ॥४॥

सेवका स्वामीसाठीं मान । त्याचें नाम त्याचें धन । तुका म्हणे जाण । तुम्ही संत तदर्थी ॥५॥

अर्थ :- परमार्थाविषयी बोलणाऱ्यास गंध, फुल, अक्षतादि पुजेचा मान दिला पाहिजे ल. श्रोता जरी यति सन्यासी असेल त्तरी वक्त्याच्या आधी त्याचा मांसन्मान करू नये ।।1।।

ज्याप्रमाणे देहामधे मस्तक श्रेष्ट आहे, म्हणून त्याचे पूजन प्रथम करावे; नंतर क्रमशः हात, पाय यांचे पूजन करावे; असा धर्मादेश आहे आणि तोच सर्वांनी पाळावा ।।ध्रु।।

ज्याप्रमाणे पुत्र वयान जरी बापापेक्षा लहान असला आरी श्रेष्ठ स्तनावर्ति असेल तर बाप त्याची आज्ञा पाळतो; त्या प्रमाणे संतांचे वय न पाहता श्रेष्ठत्व पहावी ।।2।।

देवाची मूर्ति जरी पाषाणांची असेल तरी ती देवहार्यातच ठेवावी, देवाची उपकरन चांदी, सोन्याची असली तरी ती खाली ठेवावित. देव्हार्यात देव ठेवतात, मौल्यावान भांडी नव्हे ।।3।।

एकान सोन्याचे पैजनी केलि आणि काचेचा मुकुटमणि केला तरी पैंजन पायातच आणि मुकुट डोक्यावरच घातला पाहिजे. जेथला अलंकार त्या जागीच घातला पाहिजे ।।4।।

सेवकांना मलकामुळे नावलौकिक मिळतो, तेच त्याचे धन आहे; त्याच प्रमाणे संतांनाही परमेश्वरामुळेच मवलोकिक मिळतो, असे तुकाराम महाराज म्हणतात ।।5।।

९९हरिहरां भेद । नाहीं करूं नये वाद

अभंग ९९

हरिहरां भेद । नाहीं करूं नये वाद ॥१॥

एक एकाचे हृदयीं । गोडी साखरेच्या ठायीं ॥ध्रु.॥

भेदकासी नाड । एक वेलांटी च आड ॥२॥

उजवें वामांग । तुका म्हणे एक चि अंग ॥३॥

अर्थ :- हरी (विष्णु) आणि हर (शिव) यांच्यामधे भेद करून अकारण वाद निर्माण करू नये।।1।।

कारण ते दोन्ही एकच आहे, जसे साखर आणि तिची गोडी ।।ध्रु।।

फरक करणारयांच्या डोळ्याला एका वेलांटिचा फरक दिसतो ।।2।।

तुकोबा म्हणतात, उजवे व डावे दोन भाग एकत्र येऊन त्याचा देह बनतो ।।3।।

९८कन्या गो करी कथेचा विकरा

अभंग ९८

कन्या गो करी कथेचा विकरा । चांडाळ तो खरा तया नांवें ॥१॥

गुण अवगुण हे दोन्ही प्रमाण । यातिशीं कारण नाहीं देवा ॥२॥

आशाबद्ध नये करूं तें करिती । तुका म्हणे जाती नरकामधीं ॥३॥

अर्थ :- जी व्यकि आपली कन्या, गाय आणि हरिकथा यांची विक्री करुण धन मिळवतो, ती जातीने ब्रम्हाण असली तरी तिच्या वृत्तिने ती चांडाळ संजावि ।।1।।

मनुष्या मधील गुण-अवगुण परमेश्वर पाहतो, जाट पाहत नाही. ज्या व्यक्तिच्या अंगी परमार्थ गुण आहे, ती व्यक्ति भगवंतला अतिप्रिय आहे, आणि ज्या व्यक्तीच्या अंगी प्रमार्थाचे गुण नाही; ती व्यक्ति देवाल अप्रिय आहे; मग ती व्यक्ति कोणत्याही जातीची असली तरी देव त्याच्याकडे पाहत नाही ।।ध्रु।।

तुकाराम महाराज म्हणतात, अश अश्यावादि लोक लालसेने नको त्या गोष्टी करतात आणि नरकात जातात ।।2।।

९७कांहीं नित्यनेमाविण

अभंग ९७

कांहीं नित्यनेमाविण । अन्न खाय तो श्वान ॥ वांयां मनुष्यपण । भार वाहे तो वृषभ ॥१॥

त्याचा होय भूमी भार । नेणे यातीचा आचार ॥ जाला दावेदार । भोगवी अघोर पितरांसि ॥ध्रु.॥

अखंड अशुभ वाणी । खरें न बोले स्वप्नीं ॥ पापी तयाहुनी । आणीक नाहीं दुसरा ॥२॥

पोट पोसी एकला । भूतीं दया नाहीं ज्याला ॥ पाठीं लागे आल्या । अतिताचे दाराशीं ॥३॥

कांहीं संतांचे पूजन । न घडे तीर्थांचें भ्रमण ॥ यमाचा आंदण । सीण थोर पावेल ॥४॥

तुका म्हणे त्यांनीं । मनुष्यपणा केली हानी ॥ देवा विसरूनी । गेलीं म्हणतां मी माझें ॥५॥

अर्थ :- दररोज कही पारमार्थिक नित्यनेम केल्यावाचुन जो अन्न खातो, तो कुत्र्या सामान असतो, मनुष्यदेहाचा भार वाहनारा तो निव्वळ बैल असतो ।।1।।

त्याचा भूमिला भार होतो, त्याचे आचरण शुद्ध नसते; त्यामुळे त्याचे पितर नारकवासना भोगत असतात ।।ध्रु।।

त्याची वाणी अमंगळ असते, तो स्वप्नारसुधा खरे बोलत नाही, त्याच्यासारखा पापी शोधून सपडनार नाही ।।2।।

तो फक्त आपल्या कुटुंबाचे पोट भरतो, त्याच्याजवळ भूतदया नाही, दाराशि आलेल्या अतिथिला हाकलुन देतो ।।3।।

त्याच्या हातून संतसेवा, तीर्थयात्रा घडत नाही, तो म्हणजे यमाला दिलेला एक ठेवा आहे, यम त्याला भरपूर दुःख देईल ।।4।।

तुकोबा म्हणतात, अश्या व्यक्ति जन्माला येऊन स्वत:चेच नूकसान करून घेतात;  कारण प्रपंच्यायत ते रामुन जातात, त्यांना परमेश्वराची आठवण येत नाही ।।5।।.

९६मांडवाच्या दारा । पुढें आणिला म्हातारा

अभंग ९६

मांडवाच्या दारा । पुढें आणिला म्हातारा ॥१॥

म्हणे नवरी आणा रांड । जाळा नवर्‍याचें तोंड ॥ध्रु.॥

समय न कळे । काय उपयोगीं ये वेळे ॥२॥

तुका म्हणे खरा । येथूनिया दूर करा ॥३॥

अर्थ :- एका विवाही प्रसंगी नवरा-नवरी वेळेवर आले नाहीत म्हणून एक म्हातारा मधे बोलू लागला ।।1।।

नवृ वेळेवर एत नाहीसे पाहुन तो म्हातारा त्या नवरीला 'त्या रांडेला आना' आणि त्या 'नावर्याचे तोड़ पेंटून दया' अशी अशुभ वार्ता करू लागला ।।ध्रु।।

कोणत्या वेळी काय बोलावे हे त्या म्हातार्याला कळाले नाही ।।2।।

तुकाराम महाराज म्हणतात, आशा मुर्ख महतर्याला मंडवातून प्रथम दूर करा ।।3।।.

९५चोरें चोरातें करावा उपदेश

९५

चोरें चोरातें करावा उपदेश । आपुला अभ्यास असेल तो ॥१॥

शिंदळीच्या मागें वेचितां पाउलें । होईल आपुलें तिच्या ऐसें ॥ध्रु.॥

तुका म्हणे भितो पुढिलिया दत्ता । म्हणऊनि चिंता उपजली ॥२॥

अर्थ :- एक चोर दुसऱ्या चोराला चोरिच्या, घरफहोडीच्या युक्तया शिकवितो. जैसा त्याचा आभ्यास असेल तसाच उपदेश करतो ।।1।।

एखाद्या वेश्येच्या सहवासात एखादी घरन्दाज स्त्री आली तर तिहि कालांतराने वाममार्गी बनते. वाइट व्यक्तींच्या संगतिला राहून वाइट होते ।।ध्रु।।

तुकाराम महाराज म्हणतात, वाइट लोकांच्या संगती माला नाको. कारण माला पुढील भविष्यकाळात  त्यामुळे होणाऱ्या दुस्परिनामांचे भय वाटते ।।2।।.

९४शब्दा नाहीं धीर । ज्याची बुद्धि नाहीं स्थिर

अभंग ९४

शब्दा नाहीं धीर । ज्याची बुद्धि नाहीं स्थिर ॥१॥

त्याचें न व्हावे दर्शन । खळा पंगती भोजन ॥ध्रु.॥

संतास जो निंदी । अधम लोभासाठीं वंदी ॥२॥

तुका म्हणे पोटीं । भाव अणीक जया होटीं ॥३॥

अर्थ :-ज्याच्या शब्दाला स्थैर्य नाही, ज्याची बुद्धि अस्तीर आहे ।।1।।

आशा पापी व्यक्तींचे चुकुनहि दर्शन घेऊ नये, त्याच्या पंगतिला भोजनाचे लाभ घेऊ नये ।।ध्रु।।

तो दुर्जन संतांची निंदा करतो व द्रव्यालाभासाठी अधम श्रीमंतांच्या पाया पडतो ।।2।।

तुकाराम महाराज म्हणतात, अश्या व्यक्तींच्या पोटातील (हृदयातील) व ओठातील (वानीतिल) भाव वेगवेगळा असतो ।।3।।.

९३अतिवादी नव्हे शुद्ध या बीजाचा । ओळखा जातीचा अंत्यज तो

अभंग ९

अतिवादी नव्हे शुद्ध या बीजाचा । ओळखा जातीचा अंत्यज तो ॥१॥

वेद श्रुति नाहीं ग्रंथ ज्या प्रमाण । श्रेष्ठाचें वचन न मानी जो ॥ध्रु.॥

तुका म्हणे मद्यपानाचें मिष्टान्न । तैसा तो दुर्जन शिवों नये ॥२॥

अर्थ :- प्रपंच्यामधे कारनाशिवाय वादविवाद करणारा हा शुद्ध बिज्याचा नाही असे संजावर, तो विद्वान ब्रम्हण असला तरी त्याला अंत्यज पुराण संजावे ।।1।।

वेद, श्रुतिज यांना जो प्रमाण मानत नाहीत नाही, श्रेष्ठानचे वचन जो मानित नाही ।।ध्रु।।

अश्या मद्यपान करणाऱ्या व्यक्तीच्या घरी मिष्टान्न सेवन करू नये, त्याला स्पर्शही करू नये ।।2।।.

९२दुर्जनाची गंधी विष्ठेचिया परी । देखोनियां दुरी व्हावें तया

अभंग९२

दुर्जनाची गंधी विष्ठेचिया परी । देखोनियां दुरी व्हावें तया ॥१॥

अइका हो तुम्ही मात हे सज्जन । करूं संघष्टन नये बोलों ॥ध्रु.॥

दुर्जनाचे अंगीं अखंड विटाळ । वाणी रजस्वला स्रवे तैशी ॥२॥

दुर्जनाचें भय धरावें त्यापरी । पिसाळलेवरी धांवे श्वान ॥३॥

दुर्जनाचा भला नव्हे अंगसंग । बोलिलासे त्याग देशाचा त्या ॥४॥

तुका म्हणे किती सांगावें पृथक । अंग कुंभीपाक दुर्जनाचें ॥५॥

अर्थ :- दुर्जनंचा सहवास हा विष्टेप्रमाने दुर्गंधीयुक्त असतो. तेव्हा सज्जनानि त्या पासून दूर राहावे ।।1।।

हे सज्जन हो, तुम्ही माझे एवढे ऐका, अश्या दुर्जनंचि संगत तुम्ही करू नका ।।ध्रु।।

अशी दुर्जनंचि वाणी विटाळशी स्त्रीप्रमाणे आहे ।।2।।

हे दुर्जन लोक एखाद्या कुत्र्यासारखे आहे असतात ।।3।।

दुर्जनंचि संगती करू नये, त्यांचा त्याग करावा; एवढेच नव्हे तर त्यांच्या देशाचाहि त्याग करावा, असे श्यास्त्र सांगते ।।4।।

तुकोबा म्हणतात, हे दुर्जन लोक म्हणजे साक्षात कुंभीपाक नरकाचे उदाहरण आहेत ।।5।।.

९१देखोनि पुराणिकांची दाढी । रडे स्फुंदे नाक ओढी

अभंग ९१

देखोनि पुराणिकांची दाढी । रडे स्फुंदे नाक ओढी ॥१॥

प्रेम खरें दिसे जना । भिन्न अंतरीं भावना ॥ध्रु.॥

आवरितां नावरे । खुर आठवी नेवरे ॥२॥

बोलों नयें मुखावाटां । म्हणे होतां ब्यांचा तोटा ॥३॥

दोन्ही सिंगें चारी पाय । खुणा दावी म्हणे होय ॥४॥

मना आणितां बोकड । मेला त्याची चरफड ॥५॥

होता भाव पोटीं । मुखा आलासे शेवटीं ॥६॥

तुका म्हणे कुडें । कळों येतें तें रोकडें ॥७॥

अर्थ :- एका मंदिरात पुराणिकाचे पुराण ऐकतांना एक धनगर स्फुंदुन   स्फुंदुन रडत असे ।।1।।

लोकांना वाटे, तो पुरानीकांनवरील श्रद्धेमुळे राड़तो आहे, पण त्याला पुरानीकांची दाढ़ी पाहुन आपल्या बोकदयाची आठवां येत असे ।।ध्रु।।

त्याला बोकदयाचे खुर, पाय आठवत असत ।।2।।

इतर सर्व शेळ्यांन मधे हां एकच बोकड़ा होता ।।3।।

पुरानीकांनी माया आणि ब्रम्ह अशी दोन बोटे वर केलि की त्याला वाते, बोकदाडाचि दोन शिंदे, चार वेदांसाठी त्यांनी च्यार बोते वर केलि की त्याला वाते, बोकड़याचे चार पाय; या साठी या खुना आहेत ।।4।।

धनगराला मेलेल्या बोकदयाची आठवां येत असे ।।5।।

तुरानीकांना पाहुन ढंगराला मेलेला बोकड अठवला, हां त्याच्या मनातील भाव शेवटी बाहर पडला ।।6।।

तुकोबा म्हणतात, प्रपंचिक मनुष्याच्या अंत:करणात काही मपुन राहत नाही, सत्य बाहर पड़ते ।।7।।.

९०घेऊनियां चक्र गदा । हा चि धंदा करी तो

अभंग ९०

घेऊनियां चक्र गदा । हा चि धंदा करी तो ॥१॥

भक्ता राखे पायापासीं । दुर्जनासी संहारी ॥ध्रु.॥

अव्यक्त तें आकारलें । रूपा आलें गुणवंत ॥२॥

तुका म्हणे पुरवी इच्छा । जया तैसा विठ्ठल ॥३॥

अर्थ :- हातामधे चक्र, गदा घेऊन परमेश्वर सतत भक्ताचे रक्षण करण्याचा धंदा करत असतो ।।1।।

भक्तांच रक्षण करुण त्यांना आपल्या पायजवर स्तान देतो; पण दृष्टांचा मात्र नाश करतो ।।ध्रु।।

भक्तांसाठी तो अव्यक्त रूपातुन व्यक्त रुपात येतो ।।2।।

तुकोबा म्हणतात, भक्ताच्या सर्व ईच्या तो पूर्ण करतो ।।3।।.

८९तिर्थी धोंडा पाणी । देव रोकडा सज्जनीं

अभंग८९

तिर्थी धोंडा पाणी । देव रोकडा सज्जनीं ॥१॥

मिळालिया संतसंग । समर्पितां भलें अंग ॥ध्रु.॥

तिर्थी भाव फळे । येथें आनाड तें वळे ॥२॥

तुका म्हणे पाप । गेलें गेल्या कळे ताप ॥३॥

अर्थ :- सर्व तीर्थक्षेत्रांवर दगाडाचा देव व तीर्थाचे पानी दिसते; पण तुकोबा  संतसज्जनांमधे देव दिसतो ।।1।।

अश्या संतांचा सहवास मिळाला तर तिथे देहहि अर्पण करावा ।।ध्रु।।

तीर्थस्नानाने पापक्षालन होत नाही. जर मनमधे भक्ति भावना असेल तरच तीर्थक्षेत्री त्याचे फळ मिळते, म्हणून संतसज्जन नास्तिक लोकांना आपल्या संगतित बदलून टाकतात ।।2।।

तुकोबा म्हणतात, संतसज्जनांमद्धे जीवनातील त्रिविध तापांची होळी होते ।।3।।.

८८पंढरीचा महिमा । देतां आणीक उपमा

अभंग ८८

पंढरीचा महिमा । देतां आणीक उपमा ॥१॥

ऐसा ठाव नाहीं कोठें । देव उभाउभी भेटे ॥ध्रु.॥

आहेति सकळ । तीर्थे काळें देती फळ ॥२॥

तुका म्हणे पेठ । भूमिवरी हे वैकुंठ ॥३॥

अरथ :- पंढरी या तीर्थक्षेत्राचा महिमा किती बर्णन करावा टेवाढा थोडाच् आहे ।।1।।

या ठिकाणी भक्तांना भेटन्यासाठी देव आतुर होऊन उभा राहिला आहे ।।ध्रु।।

इतर क्षेत्र बर्याच कालानंतर फळ देणारी आहे ।।2।।

तुक9बा म्हणतात, पंढरी ही साक्षात भक्तीची पेठ, वैकुंठच आहे ।।3।।.

८७न करीं रे संग राहें रे निश्चळ । लागों नेदीं मळ ममतेचा

अभंग ८७

न करीं रे संग राहें रे निश्चळ । लागों नेदीं मळ ममतेचा ॥१॥

या नांवें अद्वैत खरें ब्रम्हज्ञान । अनुभवावांचून बडबड ते ॥ध्रु.॥

इंद्रियांचा जय वासनेचा क्षय । संकल्पा ही न ये वरी मन ॥२॥

तुका म्हणे न ये जाणीव अंतरा । अंतरीं या थारा आनंदाचा ॥३॥

अर्थ :- हे परमार्थी जीवा, तू संसाराचा संग करू नको, नीश्चिल रहा, मनाला माया- माहाचा मळ लागू देऊ नको ।।1।।

अशी मनाची निसं:ग अवस्था म्हणजेच खरे आत्मज्ञान, ब्रम्हज्ञान होय, बाको सर्व अनुभवावाचुन केलेले निष्फल बड़बड़ आहे ।।ध्रु।।

इंद्रियांचे दमन करूँ त्यांच्यावर विजय मिळविने, वासना, कामना, नाहीशी करणे, प्रपंच्याची आसक्ति मनमधुन काढून टाकने ।।2।।

तुकोबा म्हणतात, अश्या व्यक्तीच्या ठिकाणी अहंणकार नाहिसा होतो आणि आनंडीआनंद निर्माण होतो ।।3।।

८६आतां उघडीं डोळे । जरी अद्यापि न कळे ॥ तरी मातेचिये खोळे । दगड आला पोटासि

गाथा अभंग ८६

आतां उघडीं डोळे । जरी अद्यापि न कळे ॥ तरी मातेचिये खोळे । दगड आला पोटासि ॥१॥

मनुष्यदेहा ऐसा निध । साधिली ते साधे सिद्ध ॥ करूनि प्रबोध । संत पार उतरले ॥ध्रु.॥

नाव चंद्रभागे तीरीं । उभी पुंडलीकाचे द्वारीं ॥ कट धरूनियां करीं । उभाउभी पालवी ॥२॥

तुका म्हणे फुकासाठीं । पायीं घातली या मिठी ॥ होतो उठाउठी । लवकरी च उतार ॥३॥

अर्थ :- मायामोहाने भ्रमीष्ट झालेल्या जीवा, अता तरी तू डोळे उघड, मातेच्या उदारतुं जन्म घेतला तू, फक्त दगड आहेस ।।1।।

हा मनुष्य देह तुला मिळालेला आहे. त्याचे तू सार्थक करून घे, संतांनी जसा भक्तिचा मार्ग धरला आणि ते भवसागरातून तरल , तसा तू भक्तिमार्ग धरुण नारादेहाचे सार्थक करुन घे ।।ध्रु।।

हां भवसागर तरुण जाणारी नाव चंद्रभागेतीरि, पुंडलिकाच्या द्वारि कमरेवर हात ठेऊन उभी आहे, उभ्या उभ्या ती सर्वांना बोलविते आहे ।।2।।

तुकोबा म्हणतात या नावेला कुठालेही मोल द्यावे लागत नाही, अनन्य भावाने त्याला शरण जाणे, हा एकच उपाय या भवसागरातून तरुंजान्यासाठी आहे ।।3।।

शुक्रवार, ७ ऑगस्ट, २०१५

८५थोडें आहे थोडें आहे । चित्त साहे जालिया

अभंग ८५

थोडें आहे थोडें आहे । चित्त साहे जालिया ॥१॥

हर्षामर्ष नाहीं अंगीं । पांडुरंगीं सरलें तें ॥ध्रु.॥

अवघ्या साधनांचें सार । न लगे फार शोधावें ॥२॥

तुका म्हणे लटिकें पाहें । सांडीं देह अभिमान ॥३॥

अर्थ :- भक्तिमार्गाची वाटचाल करतांना मनाची परमेश्वराला एकरूपता साधली पाहिजे ।।1।।

हर्ष आणि खेद हे दोन्ही ज्यांना सामान भासताटी, तेच भक्तीचे अधिकारी होतात ।।ध्रु।।

सर्व भक्तिमार्गाचे सार एकच आहे, ते फारसे शोधवे लगत नाही ।।2।।

तुकोबा म्हणतात, हा प्रपंच्य खोटा आहे, हे ओळखून अहंकार, देहसक्तीचा त्याग म्हणजेच परमार्थ होय ।।3।।