रविवार, २ ऑगस्ट, २०१५

६१वळितें जें गाई

अभंग ६१

वळितें जें गाई । त्यासि फार लागे काई ॥१॥

निवे भावाच्या उत्तरीं । भलते एके धणी वरी ॥ध्रु.॥

न लगती प्रकार । कांहीं मानाचा आदर ॥२॥

सांडी थोरपणा । तुका म्हणे सवें दीना ॥३॥

अर्थ:- गाई-गुरे वळणाऱ्या गुराख्याला परमेश्वर भक्ति करण्यासाठी कष्ट करावे लगत नाहीटी किवह त्यांना कर्मकांडाची आवशकता भासत नाही ।।1।।

त्याच्या मनातील भक्तिभाव व शुद्ध आचरण पाहुन परमेश्वर त्याच्यावर प्रसन्न होतो  ।।ध्रु।।

परमेश्वराला वश करुण घेण्यासाठी कोणत्याही दिखाऊ पाण्याची त्यांना गरज नसते ।।2।।

तुकोबा म्हणतात, जो आपला अहंकार, मनपान, मोठेपणा विसरून त्याला शरण जातो, त्याला परमेस्वर वश होतो ।।3।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा