शुक्रवार, ७ ऑगस्ट, २०१५

७७आतां तरी पुढें हाचि उपदेश । नका करूं नाश

अभंग७७

आतां तरी पुढें हाचि उपदेश । नका करूं नाश आयुष्याचा ॥१॥

सकळांच्या पायां माझें दंडवत । आपुलालें चित्त शुद्ध करा ॥ध्रु.॥

हित तें करावे देवाचें चिंतन । करूनियां मन एकविध ॥२॥

तुका म्हणे लाभ होय तो व्यापार । करा काय फार शिकवावें ॥३॥

अर्थ :- तुकोबा प्रपंचिक मनुष्याला विनउंन सांगता, की या आयुष्याच्या स्व:ताच्या हाताने नाश करू नका ।।1।।

या जीवनाचे सार्थक करण्यासाठी आपले च्चित्त शुद्ध ठेवा; या साठी ते सर्वांना दंडवत घालून विनंती करतात ।।ध्रु।।

एकाग्र मन करुण भगवंतचे चिंतन करा ।।2।।

तुक9बा म्हणतात की जीवनाचे, नरदेहाचे सार्थक होईल ऐसा व्यापार करा ।।3।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा