शुक्रवार, ७ ऑगस्ट, २०१५

७५मृगजळ दिसे साचपणा ऐसें । खोटियाचें पिसें ऊर फोडी

अभंग ७५

मृगजळ दिसे साचपणा ऐसें । खोटियाचें पिसें ऊर फोडी ॥१॥

जाणोन कां करा आपुलाले घात । विचारा रे हित लवलाहीं ॥ध्रु.॥

संचित सांगातीं बोळवणें सवें । आचरलें द्यावें फळ तेणें ॥२॥

तुका म्हणे शेखी श्मशान तोंवरी । संबंध गोवरी अंगीं सवें ॥३॥

अर्थ :- उन्हाच्या झळया हरणीला पान्याप्रमाने भासतात म्हणून तो तहानलेला हरिण ऊर फोडून त्याच्या पाठी धावत असतो म्हणून त्याला मृगजळ म्हणतात, मृगजळ हां एक भास आहे ।।1।।

मंनविजिवन हे तसेच आहे, प्रपंचिक मनुष्य हा सुखाच्या मृगजळामाघे धावतो ।।ध्रु।।

आपले पूर्वसंचित ज्या प्रमाणे आहे त्याप्रमानेच आपल्याला जीवनातील सुखे मिळतात ।।2।।

तुकोबा म्हणतात, मानवी देहाचा शेवट श्मशानात होतो. तेथे अग्नि, गोवरयांशी त्याचा समंध येतो तेव्हा मनवाने नारदेहाचे सार्थक करून घ्यावे ।।3।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा