रविवार, २ ऑगस्ट, २०१५

५०स्मशान ते भूमि प्रेतरूप जन

अभंग ५०

स्मशान ते भूमि प्रेतरूप जन । सेवाभक्तिहीन ग्रामवासी ॥१॥

भरतील पोट श्वानाचिया परी । वस्ति दिली घरीं यमदूतां ॥ध्रु.॥

अपूज्य लिंग तेथें अतित न घे थारा । ऐसी वस्ती चोरां कंटकांची ॥२॥

तुका म्हणे नाहीं ठावी स्थिति मती । यमाची निश्चिती कुळवाडी ॥३॥

अर्थ :- ज्या गावामधे परमेश्वराची सेवा व भक्ति घडत नाही ते गाव स्मशानवत व तेथील रहिवाशि प्रेतरूप असतात ।।1।।

कुत्र्यप्रमाने भटकुन ते पोट भारतात, त्यामुळे त्यांच्या घरामधे यमदूताचि वस्ति असते ।।ध्रु।।

जेथे हरिहरांची पूज्या भक्ति घडत नाही, ते स्तान चोरांचे, नास्तिकांचे वस्तिस्तान बनते ।।2।।

तुकोबा म्हणतात, त्यांना आपले हित विठ्ठलभक्ति आहे हे न काळाल्यामुळे ते यमचे कुलवाडी बनले आहेत ।।3।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा