रविवार, २ ऑगस्ट, २०१५

५१आहाकटा त्याचे करिती पितर

अभंग ५१

आहाकटा त्याचे करिती पितर । वंशीं दुराचार पुत्र जाला ॥१॥

गळे चि ना गर्भ नव्हे चि कां वांज । माता त्याची लाजलावा पापी ॥ध्रु. ॥

परपीडें परद्वारीं सावधान । सादर चि मन अभाग्याचें ॥२॥

न मळितां निंदा चाहडी उपवास । संग्रहाचे दोष सकळ ही ॥३॥

परउपकार पुण्य त्या वावडें । विषाचें तें कीडें दुग्धीं मरे ॥४॥

तुका म्हणे विटाळाचीच तो मूर्ति । दया क्षमा शांति नातळे त्या ॥५॥

अर्थ :- ज्या घरामधे दुर्वर्तनी पुत्र जन्माला येतो, त्याचे पीतर स्वर्गात दुःखाने आक्रोश करत असतात ।।1।।

अश्या पुत्रांचा त्याच्या मतेच्या उदरात अस्तांनाच गर्भपात का झाला नाही? त्याची माता वांझ का राहिली नाही? अश्या पुत्राला तिने का बारे जन्म दिला? ।।ध्रु।।

अशा अभाग्याचे मन सतत परपीड़ा, परनिंदा करण्यात रमते ।।2।।

त्याला एखाद्या दिवशी निंदा, चहाडी करण्यास मिळाली नाही तर उपवास घाडल्याप्रमाने वाटते ।।3।।

परोपकार, पूण्य यांचे त्याला ववदे असते. जशे विषारी कीड़े दुधात तकल्यावर मरून जातात ।।4।।

तुकोबा म्हणतात, असा मनुष्य साक्षात विटाळाची मूर्ति भसतो; त्याच्या मनामधे दया, क्षमा, शांति लवलेश नसतो ।।5।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा