रविवार, २ ऑगस्ट, २०१५

४१माया तें चि ब्रम्ह ब्रम्ह तेंचि माया

अभंग ४१

माया तें चि ब्रम्ह ब्रम्ह तेंचि माया । अंग आणि छाया तया परी ॥१॥

तोडितां न तुटे सारितां निराळी । लोटांगणांतळीं हारपते ॥ध्रु.॥

दुजें नाहीं तेथें बळ कोणासाठीं । आणिक ते आटी विचाराची ॥२॥

तुका म्हणे उंच वाढे उंचपणें । ठेंगणीं लवणें जैसीं तैसीं ॥३॥

अर्थ :- माया म्हणजे ब्रम्ह आहे आणि ब्रह्म म्हणजेच माया आहे यांचा संमंध देह आणि सावली यांच्या सारखा आहे।।1।।

देहाचि सावली शस्राच्या अघाताने तुटत नाही, देहाला सोडून दूर सरत नाही,लोटांगण घातले असता देहाखाली ती नाहीशी होते।।ध्रु।।

ब्रम्ह आणि माया एकरूप असतील तर तेथे बाळाचा वापर कश्यासाठी करायचा।।2।।

जसा देह असेल तशी सावली असेते, लोटांगनाने ती नाहिशि होते तशे ब्रम्हाला लोटांगण घातले, शरण गेले अस्ता माया नहिषी होते, असे तुकोबा म्हणतात।।3।।    

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा