रविवार, २ ऑगस्ट, २०१५

४९नव्हे आराणूक संवसारा हातीं

अभंग ४९

नव्हे आराणूक संवसारा हातीं । सर्वकाळ चित्तीं हा चि धंदा ॥१॥

देवधर्म सांदीं पडिला सकळ । विषयीं गोंधळ गाजतसे ॥ध्रु. ॥

रात्रि दीस न पुरे कुटुंबाचें समाधान । दुर्लभ दर्शन ईश्वराचें ॥२॥

तुका म्हणे आत्महत्या रे घातकी । थोर होते चुकी नारायणीं ॥३॥

अर्थ:- सदा-सर्वकाळ संसाराची चिंता करतात त्यांना क्षणभराचिसुद्धा विश्रांति मिळत नाही ।।1।।

देव धर्म त्यांनी कोपर्यात टाकले आहेत, संसारातील कामपुर्तिसाठी जेव्हा हवे तेव्हा त्यांचा उपयोग करतात ।।ध्रु।।

रात्रन दिवस कष्ट केले तरी कुटुंबाचे समाधान होत नाही, त्यामुळे त्यांचे देवाकडे लक्ष जात नाही ।।2।।

तुकोबा म्हणतात, अशे प्रपंचिक लोक स्वत:च स्वत:चि हत्या करतात ।।3।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा