रविवार, २ ऑगस्ट, २०१५

४४पवित्र सोंवळीं । एक तीं च भूमंडळीं

अभंग ४४

पवित्र सोंवळीं । एक तीं च भूमंडळीं ॥१॥

ज्यांचा आवडता देव । अखंडित प्रेमभाव ॥ध्रु.॥

तीं च भाग्यवंतें । सरतीं पुरतीं धनवित्तें ॥२॥

तुका म्हणे देवा । त्यांची केल्या पावे सेवा ॥३॥

अर्थ:- या भुमडळी संतसज्जन पवित्र, शुद्ध आहे।।1।।

त्यांच्या मनात फक्त परमेस्वराविषयिची प्रेम, भक्ति असते।।ध्रु।।

धनद्रव्याने समृद्ध, बुद्धिने तल्लख ते या जगात भाग्यवंत आहेत ।।2।।

तुकोबा म्हणतात अशा संतसज्जनाची सेवा केलि तर ती देवाला पवते।।3।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा