शुक्रवार, ७ ऑगस्ट, २०१५

७९विश्वाचा जनिता । म्हणे यशोदेसि माता

अभंग७९

विश्वाचा जनिता । म्हणे यशोदेसि माता ॥१॥

ऐसा भक्तांचा अंकित । लागे तैसी लावी प्रीत ॥ध्रु.॥

निष्काम निराळा । गोपी लावियेल्या चाळा ॥२॥

तुका म्हणे आलें । रूपा अव्यक्त चांगलें ॥३॥

अर्थ :- या विश्वाचा जनक यशोधेला माता म्हणतो ।।1।।

तो भक्तांचा अंकित आहे, भक्ताला त्याच्या भक्तिप्रमाणे प्रेम देत असतो ।।ध्रु।।

परमेश्वर वासनाहीत, कामनाहित असूनही गोपीनां त्याचा वेध लागला आहे ।।2।।

तुकोबा म्हणतात, आपल्या भक्तिसाठी तो अव्यक्तातुं व्यक्त, सगुन साकार रूपामधे आला आहे ।।3।।.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा