गुरुवार, २० ऑगस्ट, २०१५

९८कन्या गो करी कथेचा विकरा

अभंग ९८

कन्या गो करी कथेचा विकरा । चांडाळ तो खरा तया नांवें ॥१॥

गुण अवगुण हे दोन्ही प्रमाण । यातिशीं कारण नाहीं देवा ॥२॥

आशाबद्ध नये करूं तें करिती । तुका म्हणे जाती नरकामधीं ॥३॥

अर्थ :- जी व्यकि आपली कन्या, गाय आणि हरिकथा यांची विक्री करुण धन मिळवतो, ती जातीने ब्रम्हाण असली तरी तिच्या वृत्तिने ती चांडाळ संजावि ।।1।।

मनुष्या मधील गुण-अवगुण परमेश्वर पाहतो, जाट पाहत नाही. ज्या व्यक्तिच्या अंगी परमार्थ गुण आहे, ती व्यक्ति भगवंतला अतिप्रिय आहे, आणि ज्या व्यक्तीच्या अंगी प्रमार्थाचे गुण नाही; ती व्यक्ति देवाल अप्रिय आहे; मग ती व्यक्ति कोणत्याही जातीची असली तरी देव त्याच्याकडे पाहत नाही ।।ध्रु।।

तुकाराम महाराज म्हणतात, अश अश्यावादि लोक लालसेने नको त्या गोष्टी करतात आणि नरकात जातात ।।2।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा