शुक्रवार, ७ ऑगस्ट, २०१५

७२युक्ताहार न लगे आणिक साधनें । अल्प नारायणें दाखविलें

अभंग ७२

युक्ताहार न लगे आणिक साधनें । अल्प नारायणें दाखविलें ॥१॥

कलियुगामाजी करावें कीर्तन । तेणें नारायण देइल भेटी ॥ध्रु.॥

न लगे हा लौकिक सांडावा वेव्हार । घ्यावें वनांतर भस्म दंड ॥२॥

तुका म्हणे मज आणि उपाव । दिसती ते वाव नामाविण ॥३॥

अर्थ :- परमार्थ साधन्यासाठी विविध युक्त्ताहार, साधानांची गरज नाही; कारं परमार्थ थड़क्या कष्टाने साध्य होतो, हे नारायनाने सांगितले आहे ।।1।।

या कलियुगात कीर्तना सारखे दूसरे साधन नाही, त्यामुळे त्या भगवंतची भेट घडते ।।ध्रू।।

त्यासाठी प्रपंच्याचा त्याग करून, वनामधे जावुन, भस्म-दंड धारण कन्याची काहीही आवशकता नाही ।।2।।

तुक9बा म्हणतात की विठ्ठलाच्या नामस्मरनाशिवाय इतर कोणतेही उपाय मला दिसत नाही ।।3।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा