शनिवार, १ ऑगस्ट, २०१५

धर्माची तूं मूर्ती । पाप पुण्य तुझे हातीं

अभंग १७

धर्माची तूं मूर्ती । पाप पुण्य तुझे हातीं ॥१॥

मज सोडवीं दातारा । कर्मापासूनि दुस्तरा ॥ध्रु.॥

करिसी अंगीकार । तरी काय माझा भार ॥२॥

जिवींच्या जीवना । तुका म्हणे नारायणा ॥३॥

अर्थ :- हे परमेश्वरा, तू प्रतक्ष धर्माची मूर्ति आहेस, पाप-पूण्य घडवुन आणणे हे सर्वस्व तुमच्या हाती आहे ।।1।।

या प्रपंच्यातील कर्मापासून माझी सोडवनुक करा ।।ध्रु।।

हे परमेश्वरा, माझा स्वीकार केल्याने तुम्हाला माझा भार होईल काय? ।।2।।

जीवाचे जीवन असलेल्या नारारनाला तुकोबा विनती करीत आहे ।।3।।

।राम कृष्ण हरी।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा