रविवार, २ ऑगस्ट, २०१५

२७आहे तें सकळ कृष्णा चि अर्पण । न कळतां मन दुजें

अभंग २७

आहे तें सकळ कृष्णा चि अर्पण । न कळतां मन दुजें भावी ॥१॥

म्हणउनी पाठी लागतील भूतें । येती गवसीत पांचजणें ॥ध्रु.॥

ज्याचे त्या वंचलें आठव न होतां । दंड या निमित्ताकारणें हा ॥२॥

तुका म्हणे काळें चेंपियेला गळा । मी मी वेळोवेळा करीतसे ॥३॥

अर्थ:- या विश्वात जे कही आहे, ते श्री कृष्णमुळेच आहे; परंतु हे न समजल्यामुळे मनात द्वैतभाव निर्माण होतो ।।1।।

अश्या द्वैतभाव निर्माण झालेल्या मनुष्याला पंचमहाभूते शोधत असतात, त्या मुले जीवाला वारंवार देहप्राप्ति होत असते ।।ध्रु।।

हां जिव परमेश्वराला विसरून जीवनाचे कर्तेपणा स्वतकडे घेतो; म्हणून त्याला जन्म-मृत्यु अशी शिक्षा भोगवि लगते ।।2।।

तुकोबा म्हणतात, जो मी पना विसरला नहीं त्याला काळ योग्य ती शिक्षा देतो ।।3।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा