रविवार, २ ऑगस्ट, २०१५

३३मज दास करी त्यांचा । संतदासांच्या दासांचा

अभंग ३३

मज दास करी त्यांचा । संतदासांच्या दासांचा ॥१॥

मग होत कल्पवरी । सुखें गर्भवास हरी ॥ध्रु.॥

नीचवृत्तिकाम । परी मुखीं तुझें नाम ॥२॥

तुका म्हणे सेवे । माझे संकल्प वेचावे ॥३॥

अर्थ :-  मला संत सज्जनांचा दास कर भगवंता ।।1।।

त्यासाठी उगानुयूगलगे मला गर्भवासाला यायला आवडेल ।।ध्रु।।

हलके काम करने माझ्या नाशिबि आले तर मुखाने सतत हरिनाम उच्यारले जावे ।।2।।

तुकोबा म्हणतात, तुजी सेवाभक्ति हाच माझ्या जीवनाचा संकल्प असावा ।।3।।

राम कृष्ण हरी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा