शुक्रवार, ७ ऑगस्ट, २०१५

७१गेली वीरसरी । मग त्यासि रांड मारी

अभंग ७१

गेली वीरसरी । मग त्यासि रांड मारी ॥१॥

मग नये तैसी सत्ता । गेली मागील आणितां ॥ध्रु.॥

भंगलिया चित्ता । न ये काशानें सांदितां ॥२॥

तुका म्हणे धीर । भंगलिया पाठीं कीर ॥३॥

अर्थ :- एखाद्या मनुष्याच्या स्वभावातील वीरत्व गेले तर त्याला कोणीही मान देत नाही. एखादी क्षुद्र स्त्रीसुद्धा त्याला मारते ।।1।।

एकदयाची जगात नाचक्की झाली तर पुन्हा त्याला समाजात कोणत्याही प्रकारचा मन सन्मान मिळत नाही ।।ध्रु।।

एखादी व्यक्ति मनमधुन उतरली म्हणजे पुन्हा चित्तामधे ती बसत नाही ।।2।।

तुकोबा म्हणतात, की एखाद्या मनुष्याने आत्मविश्वास गमवला तर त्याला जगात सर्वठिकानि हार पत्कारावि लागते ।।3।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा