शुक्रवार, ७ ऑगस्ट, २०१५

७०भोरप्यानें सोंग पालटिलें वरी । ध्यान धरी मत्स्या

अभंग ७०

भोरप्यानें सोंग पालटिलें वरी । ध्यान धरी मत्स्या जैसें ॥१॥

टिळे माळा मैंद मुद्रा लावी अंगीं । देखों नेदि जगीं फांसे जैसे ॥ध्रु.॥

ढीवर या मत्स्या चारा घाली जैसा । भीतरील फांसा कळों नेदी ॥२॥

खाटिक हा स्नेहवादें पशु पाळी । कापावया नळी तया साठीं ॥३॥

तुका म्हणे तैसा भला मी लोकांत । परी तूं कृपावंत पांडुरंगा ॥४॥

अर्थ :- बहुरूपी विविध सोंग घेऊन दखवितो अथवा बगला मासा पकडण्यासाठी डोळे बंद असल्याचे सोंग करतो ।।1।।

त्या प्रमाणे भक्तीचे ठोंग करनारा टिळा, माळ, मुद्रा लाउन जगाला फसवित असतो ।।ध्रु।।

कोळी मासे पकडण्याआधी गळाला खाद्य लावतो, त्या खादयामधील फासा माश्याला समजून येत नाही ।।2।।

खाटिक बकर्याला कापण्याआधी प्रेमाने पाळत असतो ।।3।।

तुकोबा म्हणतात, हे देवा, तू माझा अव्हेर करू नको; कारण तू दयाळू, प्रेमळ असा तारणहार आहेस ।।4।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा