रविवार, २ ऑगस्ट, २०१५

५६उपाधीच्या नांवें घेतला सिंतोडा

अभंग ५६

उपाधीच्या नांवें घेतला सिंतोडा । नेदूं आतां पीडा आतळों ते ॥१॥

काशासाठीं हात भरूनि धुवावे । चालतिया गोवे मारगासि ॥ध्रु.॥

काय नाहीं देवें करूनि ठेविलें । असें तें आपुलें ते ते ठायीं ॥२॥

तुका म्हणे जेव्हां गेला अहंकार । तेव्हां आपपर बोळविले ॥३॥

अर्थ :- प्रायश्चित्ताने अस्पृश्यता निवारण करता येते, तद्ववत प्रपंच्यातील उपाधिनपासून सुटका हान्यासाठी मी ज्ञानशिंतोडा उडवुन घेतला. अता प्रपंच्याची पीड़ा मला दुःख डेत नाही।।1।।

भक्तिमार्ग हाती घेतलेला असतांना कश्य साथी एखाद्या अमंगळ वस्तुस स्पर्श करुण हात धुवावे ।।ध्रु।।

या विश्वामधे भगवंतने जे जे निर्माण केले आहे ते ज्ञानदृष्टीने पाहिले असता आपल्या हिताचे आहे हे कळते ।।2।।

तुकोबा म्हणतात, अशी ज्ञानदृष्टि प्राप्त होण्यासाठी अहंकाराचा नाश झाला पाहिजे. माझा अहंकार गेला म्हणजे आपले-परके हां भेदच संपला ।।3।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा