रविवार, २ ऑगस्ट, २०१५

२१निंदी कोणी मारी । वंदी कोणी पूजा करी २१

अभंग २१

निंदी कोणी मारी । वंदी कोणी पूजा करी ॥१॥

मज हें ही नाहीं तें ही नाहीं । वेगळा दोहीं पासुनी ॥ध्रु.॥

देहभोग भोगें घडे । जें जें जोडे तें बरें ॥२॥

अवघें पावे नारायणीं । जनार्दनीं तुक्याचें ॥३॥

अर्थ :- या जगात आपली कुणी स्तुति करो वा निंदा करो, मला त्याचे कही सुखदुःख वाटत नाही ।।1।।

कारण निंदा व स्तुति या दोन्ही गोष्टीं पासून मी निराळा आहे. ।।ध्रु।।

पूर्वसंचितानुसार या देहाला सुखदुःख प्राप्त होतात, ते देहभोग मी निमुटपने भोगतो।।2।।

मी विठ्ठलरूप असल्यामुळे माझे देह भोग मी विट्ठलालाच अर्पण करीत आहे, असे तुकाराम महाराज म्हणतात ।।3।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा