रविवार, २ ऑगस्ट, २०१५

२२जन विजन जालें आम्हां । विठ्ठलनामा प्रमाणें

अभंग २२

जन विजन जालें आम्हां । विठ्ठलनामा प्रमाणें ॥१॥

पाहें तिकडे बापमाय । विठ्ठल आहे रखुमाई ॥ध्रु.॥

वन पट्टण एकभाव । अवघा ठाव सरता जाला ॥२॥

आठव नाहीं सुखदुःखा । नाचे तुका कौतुकें ॥३॥

अर्थ :- भक्तिप्रेमचि प्राप्ति झाल्यामुळे जन आणि अरण्य आम्हाला समान भासते ।।1।।

जिकडे पहावे तिकडे आम्हाला विठ्ठल-रखमाईच दिसते ।।ध्रु।।

जनात आणि वनात आम्हाला काहीच फरक जाणवत नाही; कारण तुकोबाचे मन देहावर नाही ।।2।।

विट्ठलाच्या नामसंकीर्तनामधे तन्मय झालेल्या तुकोबांना सूखदुःखाची आठवनहि राहत नाही ।।3।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा