गुरुवार, २० ऑगस्ट, २०१५

१०४देती घेती परज गेली । घर खालीं करूनियां

जोहार अभंग 02

गाथा अभंग१०४

देती घेती परज गेली । घर खालीं करूनियां ॥१॥

धांवणियाचे न पडे हातीं । खादली राती काळोखी ॥ध्रु.॥

वघियांचे अवघें नेलें । काहीं ठेविलें नाहीं मागें ॥२॥

सोंग संपादुनि दाविला भाव । गेला आधीं माव वरि होती ॥३॥

घराकडे पाहूं नयेसें जालें । अमानत केलें दिवाणांत ॥४॥

आतां तुका कोणा न लगे चि हातीं । जाली ते निश्चिती बोलों नये ॥५॥

अर्थ :- जी देती-घती होती, ती घर खली करून निघुन गेली ।।1।।

अज्ञानरूपी अंधाराची रात्र सरली. आता माझ्या माघे धवत येणाऱ्या काळाच्या हाती मी पडणार नाही ।।ध्रु।।

त्याने सर्वाच सर्वकाही नेले, काहीही मागे ठेवले नाही ।।2।।

सांग संपादन करून जो मायेचा देखावा होता , तो गेला ।।3।।

पुन्हा वळून घराकडे पाहू नये, असे झाले आहे ।।4।।

तुकाराम महाराज म्हणतात, त्याविषयी मी निच्छित झालो आहे. या अवस्तेचे वर्णनहि करता येत नाही ।।5।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा