गुरुवार, २० ऑगस्ट, २०१५

९५चोरें चोरातें करावा उपदेश

९५

चोरें चोरातें करावा उपदेश । आपुला अभ्यास असेल तो ॥१॥

शिंदळीच्या मागें वेचितां पाउलें । होईल आपुलें तिच्या ऐसें ॥ध्रु.॥

तुका म्हणे भितो पुढिलिया दत्ता । म्हणऊनि चिंता उपजली ॥२॥

अर्थ :- एक चोर दुसऱ्या चोराला चोरिच्या, घरफहोडीच्या युक्तया शिकवितो. जैसा त्याचा आभ्यास असेल तसाच उपदेश करतो ।।1।।

एखाद्या वेश्येच्या सहवासात एखादी घरन्दाज स्त्री आली तर तिहि कालांतराने वाममार्गी बनते. वाइट व्यक्तींच्या संगतिला राहून वाइट होते ।।ध्रु।।

तुकाराम महाराज म्हणतात, वाइट लोकांच्या संगती माला नाको. कारण माला पुढील भविष्यकाळात  त्यामुळे होणाऱ्या दुस्परिनामांचे भय वाटते ।।2।।.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा