रविवार, २ ऑगस्ट, २०१५

४५आशाबद्ध जन । काय जाणे नारायण

अभंग४५

आशाबद्ध जन । काय जाणे नारायण ॥१॥

करी इंद्रियांची सेवा । पाहे आवडीचा हेवा ॥ध्रु.॥

भ्रमलें चावळे । तैसें उचित न कळे ॥२॥

तुका म्हणे विषें । अन्न नाशियलें जैसें ॥३॥

अर्थ :-  प्रपंच्याविषयी आसक्त असणारे जिव परमेस्वराला जाणून घेऊ शकत नाहीत।।1।।

त्यांना स्वताच्या इन्द्रियाची सेवा करण्यास आनंद वाटतो ।।ध्रु।।

तो भेमिष्ट स्वताच्या जीवनाचे हित जानू शकत नाही ।।2।।

तुकाराम महाराज म्हणतात, सुग्राम अन्नात विश कालवले असता ते सर्व अन्न वाया जाते, त्या प्रमाणे मनात भोगलालसा असणाऱ्या जीवाचे जीवन व्यर्थ जाते।।3।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा