रविवार, २ ऑगस्ट, २०१५

४७करावी ते पूजा मनें चि उत्तम

अभंग ४७

करावी ते पूजा मनें चि उत्तम । लौकिकाचें काम काय असे ॥१॥

कळावें तयासि कळे अंतरींचें । कारण तें साचें साचा अंगीं ॥ध्रु.॥

अतिशया अंतीं लाभ किंवा घात । फळ देतें चित्त बीजा ऐसें ॥२॥

तुका म्हणे जेणें राहे समाधान । ऐसें तें भजन पार पावी ॥३॥

अर्थ :- लौकिकदृष्टया पुजेचे अवडंबर माजविन्यापेक्षा मांसपूज्या सर्वात उत्तम ।।1।।

अशी मनसपूज्या ज्याच्यासाठी केले जाते त्याला ती कळते ।।ध्रु।।

सत्कृत्य करणार्याला चांगले फळ मिलते, तर दुष्कृत्य करणार्याचा घात होतो; अशी बिज्याप्रमाने फळप्राप्ति होते ।।2।।

तुकोबा म्हणतात, जे जीवाला समाधान समाधान मिळउन देते तच खरे हरिभजन होय, तेच जीवाला भवसागर पार करून नेट ।।3।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा