रविवार, २ ऑगस्ट, २०१५

२४आलिंगनें घडे । मोक्ष सायुज्यता जोडे

अभंग २४

आलिंगनें घडे । मोक्ष सायुज्यता जोडे ॥१॥

ऐसा संताचा महिमा । जाली बोलायाची सीमा ॥ध्रु.॥

तीर्थे पर्वकाळ । अवघीं पायांपें सकळ ॥२॥

तुका म्हणे देवा । त्यांची केली पावे सेवा ॥३॥

अर्थ :- संतांच्या अलिंगनाने, सहवासाने सायुज्य मोक्षाची प्राप्ति होते ।।1।।

अश्या संतसहवासाचा महिमा  शब्दआतून वर्णन क़रतांना शब्द अपुरे पडतात ।।ध्रु।।

संतांच्या पायाशि सर्व तीर्थ व पर्वकाळ एकवटलेले असतात ।।2।।

तुकोबा म्हणतात, म्हणूनच संतचरणाची सेवा करावी ।।3।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा