गुरुवार, २० ऑगस्ट, २०१५

१०७ माकडें मुठीं धरिलें फुटाणे । गुंतले ते नेणे हात तेथें

अभंग १०७

माकडें मुठीं धरिलें फुटाणे । गुंतले ते नेणे हात तेथें ॥१॥

काय तो तयाचा लेखावा अन्याय । हित नेणे काय आपुलें तें ॥ध्रु.॥

शुकें नळिकेशीं गोवियेले पाय । विसरोनि जाय पक्ष दोन्ही ॥२॥

तुका म्हणे एक ऐसे पशुजीव । न चले उपाव कांहीं तेथें ॥३॥

अर्थ :- एका माणसाने माकडाल पकडण्यासाठी अरुंद तोंडाच्या भांड्यात फुटाने ठेवले, माकड़ाने हॉट घालून फुटांयाची मुठ भरली, त्यामुळे मुठ बाहेर निघेणा ।।1।।

मुठ सोडून हात बाहर काढवा, हे त्या मकडाला सुचले नाही ।।ध्रु।।

पाराध्याने लावलेल्या नळितील खाद्य खान्यासाथी पोपट नळिवर बसतो, नळि उलटी फिरते, पॉपटही उलटा होतो, आपण पडू, या भीतीने तो तसाच बसून राहतो ।।2।।

जे लोक पशुपक्षांप्रमाने असतात, त्यांच्यापुढे काही उपाय नसतो ।।3।।
.

1 टिप्पणी: