शनिवार, १ ऑगस्ट, २०१५

२०आम्ही जरी आस । जालों टाकोनि उदास २०

अभंग २०

आम्ही जरी आस । जालों टाकोनि उदास ॥१॥

आतां कोण भय धरी । पुढें मरणाचें हरी ॥ध्रु.॥

भलते ठायीं पडों । देह तुरंगीं हा चढो ॥२॥

तुमचें तुम्हांपासीं । आम्ही आहों जैसीं तैसीं ॥३॥

गेले मानामान । सुखदुःखाचें खंडन ॥४॥

तुका म्हणे चित्तीं । नाहीं वागवीत खंती ॥५॥

अर्थ :- आम्ही प्रपंच्यातील सर्व आशा- अपेक्षा, विषयवासना सोडून प्रपंच्याविषयी उदासीन झालो आहो ।।1।।

हे परमेश्वरा, त्यामुळे आता आम्हाला मरणाची भीति वाटत नाही ।।ध्रु।।

जीवनात आम्ही विठ्ठलाचे दास बनूण राहु; मग भले सुख येवु वा दुःख येवो ।।3

माणपान, सुखदुःखाचे आमच्या जीवनातून उच्च्याटन झाले आहे ।।4।।

तुकोबा म्हणतात, या माझ्या प्रपंच्याविषयीच्या उदासिनतेचि मला खंत वाटत नाही ।।5।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा