गुरुवार, २० ऑगस्ट, २०१५

८६आतां उघडीं डोळे । जरी अद्यापि न कळे ॥ तरी मातेचिये खोळे । दगड आला पोटासि

गाथा अभंग ८६

आतां उघडीं डोळे । जरी अद्यापि न कळे ॥ तरी मातेचिये खोळे । दगड आला पोटासि ॥१॥

मनुष्यदेहा ऐसा निध । साधिली ते साधे सिद्ध ॥ करूनि प्रबोध । संत पार उतरले ॥ध्रु.॥

नाव चंद्रभागे तीरीं । उभी पुंडलीकाचे द्वारीं ॥ कट धरूनियां करीं । उभाउभी पालवी ॥२॥

तुका म्हणे फुकासाठीं । पायीं घातली या मिठी ॥ होतो उठाउठी । लवकरी च उतार ॥३॥

अर्थ :- मायामोहाने भ्रमीष्ट झालेल्या जीवा, अता तरी तू डोळे उघड, मातेच्या उदारतुं जन्म घेतला तू, फक्त दगड आहेस ।।1।।

हा मनुष्य देह तुला मिळालेला आहे. त्याचे तू सार्थक करून घे, संतांनी जसा भक्तिचा मार्ग धरला आणि ते भवसागरातून तरल , तसा तू भक्तिमार्ग धरुण नारादेहाचे सार्थक करुन घे ।।ध्रु।।

हां भवसागर तरुण जाणारी नाव चंद्रभागेतीरि, पुंडलिकाच्या द्वारि कमरेवर हात ठेऊन उभी आहे, उभ्या उभ्या ती सर्वांना बोलविते आहे ।।2।।

तुकोबा म्हणतात या नावेला कुठालेही मोल द्यावे लागत नाही, अनन्य भावाने त्याला शरण जाणे, हा एकच उपाय या भवसागरातून तरुंजान्यासाठी आहे ।।3।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा